Home /News /lifestyle /

Bone Weakening Habits : या 5 चुकीच्या सवयी वय होण्यापूर्वीच हाडांना बनवतात कमकुवत; अशी घ्या काळजी

Bone Weakening Habits : या 5 चुकीच्या सवयी वय होण्यापूर्वीच हाडांना बनवतात कमकुवत; अशी घ्या काळजी

वाढत्या वयाबरोबर हाडांमध्ये कमकुवतपणा येणं स्वाभाविक आहे, परंतु आजकाल हाडे कमकुवत (Bone Weakening Habits) झाल्याच्या तक्रारी अगदी तरुणांमध्येही दिसून येत आहेत.

    नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : जर तुम्हाला जास्त काळ तंदुरुस्त राहायचे असेल तर तुमची हाडे मजबूत असणं खूप महत्त्वाचे आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वाढत्या वयाबरोबर हाडांमध्ये कमकुवतपणा येणं स्वाभाविक आहे, परंतु आजकाल हाडे कमकुवत (Bone Weakening Habits) झाल्याच्या तक्रारी अगदी तरुणांमध्येही दिसून येत आहेत. जेव्हा हाडे कमकुवत होतात तेव्हा शरीरात वेदना, कडकपणा जाणवतो. हाडे कमकुवत होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा अभाव देखील असू शकतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीशी संबंधित काही वाईट सवयी देखील हाडे कमकुवत होण्यास कारणीभूत आहेत. जाणूनबुजून किंवा नकळत आपण अशा चुका करतो, ज्यामुळे हाडे खराब होतात, त्याबद्दल जाणून घेऊया. हाडे कमकुवत करण्याच्या सवयी 1. अल्कोहोलचा जास्त वापर आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त अल्कोहोल पिल्यानं तुमच्या हाडांमध्ये कमकुवतपणा येतो, कारण जास्त अल्कोहोल पिल्याने कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होते आणि त्याचा परिणाम हाडांवर होऊ शकतो. 2. अधिक कॉफी पिणे जास्त कॉफीचे सेवन केल्याने हाडे कमकुवत होतात. कारण कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हाडांमध्ये कॅल्शियमची पातळी कमी होते. त्यामुळे कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करावे. 3. जास्त मीठ सेवन जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हाडे कमकुवत होऊ शकतात, कारण जास्त मीठ खाल्ल्याने लघवीद्वारे कॅल्शियम शरीरातून बाहेर पडते. यामुळे हाडे हळूहळू कमकुवत होऊ लागतात. म्हणून आपण जास्त प्रमाणात मीठाचे सेवन टाळावे. हे वाचा - Explainer: दिवाळीपर्यंत देश होणार ‘मास्कमुक्त? या तारखेपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य 4. अधिक शीतपेयांचे सेवन शीतपेयांचे सेवन केल्यानं हाडे कमकुवत होऊ शकतात, कारण शीतपेयांमध्ये सोडा खूप जास्त असतो. जास्त शीतपेय पिल्याने तुमच्या रक्तात कॅल्शियमचे प्रमाण कमी होते आणि फॉस्फेटचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हाडांना पुरेसे कॅल्शियम मिळत नाही, यामुळे हाडे कमकुवत होतात. 5. धूम्रपान व्यसन बदलत्या जीवनशैलीमध्ये धूम्रपान ही एक फॅशन बनली आहे. पण ही सवय तुमची हाडे कमकुवत करू शकते. धूम्रपानामुळे हाडांच्या पेशी खराब होतात, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. हे वाचा - ऑक्टोबरमध्येही अनेक राज्यांत का पडतोय पाऊस? वाचा. बदललेल्या चक्रामागचं वैज्ञानिक कारण हाडे निरोगी ठेवणे महत्वाचे का आहे? आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शरीराची रचना राखण्याबरोबरच हाडे देखील स्नायूंना योग्य ठेवतात. तसेच अनेक अवयवांचे रक्षण करतात. म्हणूनच हाडांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. वयाच्या 30 वर्षांनंतर, बहुतेक लोकांच्या हाडांची घनता कमी होते आणि हाडे कमकुवत होतात. हाडे कमकुवत होऊ लागल्यानं  ऑस्टियोपोरोसिस धोका निर्माण होतो आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. म्हणूनच हाडे निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Healthy bones

    पुढील बातम्या