नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं, वय वाढलं तरी तरुण दिसावं असच वाटत असतं. बॉलिवूडमध्येही अनेक सेलिब्रिटींनी अधिक सुंदर दिसण्यासाठी, वाढत्या वयातही तरुण दिसण्यासाठी अनेक गोष्टी केल्याचं समोर आहे. पण इतक्या महागड्या सर्जरी किंवा इतर काही गोष्टी सर्वांनाच परवडतील असं नाही. त्यामुळे घरच्या-घरी आणि घरातील वस्तूंचाच वापर करुन अधिक सुंदर दिसता येऊ शकतं. वाढत्या वयात काही Home Made ब्यूटी सिक्रेट्स तुमच्यासाठी (Beauty Secret Tips) नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.
पाणी आणि हेल्दी खाणं -
आपलं शरीर सतत हायड्रेटेड राहण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यासह एजिंग साइन्स (Aging Signs) दूर ठेवण्यास मदत होते. त्याशिवाय घरात बनवलेलं जेवण, विटॅमिनयुक्त जेवण फायदेशीर ठरतं. यामुळे त्वचेसह केसांचंही आरोग्य स्वस्थ राहण्यास मदत होते. तेलकट आणि जंक फूडपासून दूर राहणं, हे सर्वात महत्वाचं ठरतं.
Homemade Face Mask -
बेसन, मलई आणि हळदीचा फेस पॅक चेहऱ्यासाठी फायद्याचा ठरतो. त्याशिवाय केळं, दूध आणि बदाम तेलाचा मास्कही चेहऱ्याचं सौंदर्य कायम राखण्यास मदत करतो. स्किन मसाजसाठी दही आणि मधाच्या मिश्रणाने त्वचेची निगा राखण्यास मदत होते. अँटीएजिंग आणि अँटिइन्फ्लॅमटरी गुणधर्म असलेल्या गोष्टी चेहऱ्यासाठी गुणकारी ठरतात.
अरोमा थेरपी -
ताण-तणाव चेहऱ्यासाठी, शरीरासाठी सर्वात घातक ठरतो. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स सारख्या समस्यांसह, Aging Signs ही वाढतात. तणाव कमी करण्यासाठी Aroma Therapy फायदेशीर ठरू शकते. जाणकारांनुसार, अरोमा थेरपी स्ट्रेस-तणाव कमी करुन, व्यक्तीचा दृष्टीकोनही बदलण्यास मदत करते. यामुळे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात.
Head मसाज -
वाढत्या वयासह महिलांमध्ये केस गळण्याची समस्या वाढताना दिसते. केसांचं आरोग्य राखण्यासाठी तेलाने मसाज करणं फायद्याचं ठरतं. हेल्दी हेअरसाठी ऑइन नरिशमेंट अर्थात केसांचं पोषण महत्त्वाचं आहे. तेलामुळे केसांच्या फॉलिकल्स आणि क्यूटिकल सेल्सचं संरक्षण होतं. तसंच ड्रँड्रफची समस्याही दूर होते. परिणामी केस गळणं कमी होण्यास मदत होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Health Tips