मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Propose Day 2023 : DDLJ चे शाहरुख खान होऊ नका; प्रपोज करताना या 5 गोष्टी लांबच ठेवा!

Propose Day 2023 : DDLJ चे शाहरुख खान होऊ नका; प्रपोज करताना या 5 गोष्टी लांबच ठेवा!

अनेक जण व्हॅलेंटाइन्स डेचं निमित्त साधून आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात. काही जणांचं प्रेम केवळ योग्य वेळी व्यक्त न झाल्यामुळे सफल होत नाही. म्हणूनच प्रपोज करताना काही गोष्टी टाळल्या पाहिजेत.

अनेक जण व्हॅलेंटाइन्स डेचं निमित्त साधून आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात. काही जणांचं प्रेम केवळ योग्य वेळी व्यक्त न झाल्यामुळे सफल होत नाही. म्हणूनच प्रपोज करताना काही गोष्टी टाळल्या पाहिजेत.

अनेक जण व्हॅलेंटाइन्स डेचं निमित्त साधून आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात. काही जणांचं प्रेम केवळ योग्य वेळी व्यक्त न झाल्यामुळे सफल होत नाही. म्हणूनच प्रपोज करताना काही गोष्टी टाळल्या पाहिजेत.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 6 फेब्रुवारी : फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना समजला जातो. अनेक जण व्हॅलेंटाइन्स डेचं निमित्त साधून आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात. काही जणांचं प्रेम केवळ योग्य वेळी व्यक्त न झाल्यामुळे सफल होत नाही, तर काहींना ते चुकीच्या पद्धतीनं व्यक्त झाल्यानं मिळू शकत नाही. खऱ्या प्रेमाची जाणीव होणं जितकं अवघड असतं, त्यापेक्षा जास्त कठीण असतं त्या व्यक्तीला योग्य वेळी व योग्य पद्धतीनं प्रपोज करणं. म्हणूनच प्रपोज करताना काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. यामुळे तुमचं नातं तुटण्याची शक्यता निश्चित कमी होईल. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याच्या काही ठरावीक पद्धती लोकप्रिय आहेत. गुलाबाचं फूल देऊन, फिल्मी पद्धतीनं गुडघ्यावर बसून हातात अंगठी घेऊन, पत्र किंवा ग्रीटिंग कार्ड देऊन, डिनरला नेऊन अशा वेगवेगळ्या पद्धतींनी प्रपोज करता येतं; मात्र समोरच्या व्यक्तीला ते आवडेल की नाही याची खात्री देता येत नाही. म्हणूनच प्रपोज करताना काही गोष्टी टाळलेल्याच बऱ्या.

  व्हॅलेंटाइन डेसाठी तुमच्या पार्टनरला द्या 'हे' डिजिटल गिफ्ट!

  प्रपोज करण्याची घाई नको

  समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना सांगण्याआधी त्या व्यक्तीला तुमच्याविषयी काय वाटतंय याचा अंदाज घ्या. प्रपोज करण्याची वेळ योग्य असेल, तरच पुढे जा. खूप घाई केली, तर भविष्यात फुलू शकणारं नातंही तुटून जाऊ शकतं. तुमच्यातल्या नात्याला थोडा वेळ द्या. त्यानंतरच प्रपोज करण्याचा विचार करा.

  खूप उशीरही घातक

  नातं फुलू देण्याआधीच प्रपोज करणं जसं धोकादायक ठरू शकतं, तसंच खूप उशीर करणंही घातक ठरू शकतं. एकमेकांशी चांगली मैत्री झाली असेल, एकमेकांचा सहवास आवडत असेल, तर जास्त विचार करून थांबू नका. त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीत रस नाही असं समोरच्याला वाटू शकतं. कदाचित दुसरी एखादी व्यक्ती याचा फायदा घेऊ शकते.

  सरप्राइज देणं टाळा

  प्रपोज करताना सरप्राइज देण्याचा विचार अनेकदा केला जातो; मात्र तसं करणं धोकादायक ठरू शकतं. कारण प्रत्येक व्यक्तीला सरप्रायजेस आवडतातच असं नाही. काहींना त्यामुळे मानसिक धक्का बसू शकतो. त्यामुळे सरप्राइजचा विचार करताना ज्या व्यक्तीसाठी ते करत आहात, तिला ते आवडेल का याचा शंभर वेळा विचार करा. नाही तर मनात असल्याप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत.

  शारीरिक जवळीक टाळा

  मनातल्या नाजूक भावना समोरच्यापुढे व्यक्त करताना किस करणं, गळाभेट घेणं, उगाचच जवळीक साधणं या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या असतात. समोरच्या व्यक्तीला सुरक्षितही वाटणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे प्रेम व्यक्त करताना गैरवर्तन वाटणार नाही, याची काळजी घ्यावी.

  सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होऊ नका

  हॉटेल, रस्ता, बस किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी प्रेमी प्रेमिकेला फूल देऊन प्रपोज करतो हे सिनेमात पाहायलाच ठीक वाटतं. खऱ्या आयुष्यात त्यामुळे अवघडलेपण येऊ शकतं. तसंच इतर नागरिकांना त्यात काहीच रस नसतो. त्यामुळे अशा ठिकाणी प्रेम व्यक्त करताना पूर्ण विचार करावा.

  'व्हॅलेंटाइन डे'साठी IRCTC ची जबरदस्त ऑफर! कमी पैशात करा बँकॉक दौरा 

  प्रेम कशा प्रकारे व्यक्त करता ही प्रेमाची एक कसोटी असते. त्यात यशस्वी झालं तर पुढची वाट सुकर होते. त्यामुळे प्रपोज करण्याआधी अनेक गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं असतं.

  (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

  First published:

  Tags: Lifestyle, Proposal, Valentine Day, Valentine day plans, Valentine week