मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हे देवा! झोपेत जोडीदाराचा नको तो त्रास, 70% भारतीय हैराण; तुमचाही लाइफ पार्टनर असाच आहे का?

हे देवा! झोपेत जोडीदाराचा नको तो त्रास, 70% भारतीय हैराण; तुमचाही लाइफ पार्टनर असाच आहे का?

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

भारतातील काही कपलचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे, त्यातील 70 टक्के लोक आपल्या जोडीदाराच्या या सवयीला वैतागले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 17 मार्च : कोणतंही नातं म्हटलं की त्यात थोडी अॅडजस्टमेंट येते. विशेषतः पती-पत्नीचं नातं, ज्यात आपल्या जोडीदाराला त्याच्या चांगल्या आणि वाईटासह स्वीकारावं लागतं. संसार सुखात चालवण्यासाठी एकमेकांच्या सुखदुःख, त्रासही सहन करावा लागतो. आता हा त्रास कपलनुसार वेगवेगळा असू शकतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल भारतातील तब्बल 70 टक्के लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून होणारा त्रास सारखाच आहे. या व्यक्तींमुळे झोपेत असा काही त्रास होतो ज्यामुळे त्यांचे जोडीदार हैराण झाले आहेत. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

17 मार्च जागतिक निद्रा दिनानिमित्त सेन्चुरी मॅट्रेसेस एक सर्वेक्षण केलं. भारतीय झोपेच्या गुणवत्तेला किती महत्त्व देतात याचे मूल्यांकन करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणातून मोठी माहिती समोर आली आहे.  हे सर्वेक्षण दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, जयपूर, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, पटणा आणि गुवाहाटीत झालं. 27 ते 50 वर्षे वयोगटातील 2700 हून अधिक लोकांचा यात समावेश होता.

'तिची कस्टडी मला द्या', विवाहित GF साठी BF ची पुराव्यासह कोर्टात धाव; प्रकरणाचा निकाल काय पाहा

भारतातील 70 टक्के विवाहित जोडपी जोडीदाराच्या घोरण्यामुळे त्रासलेली असून झोपेच्या चक्रात त्यांच्या जोडीदारांनी किमान एकदा तरी झोपमोड केली असल्याचं  या सर्वेक्षणातून निदर्शनास आलं. आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 32 टक्के विवाहित जोडप्यांना वाटते की, त्यांच्या जोडीदाराचे घोरणे हे मोटरसायकलच्या आवाजासारखे आहे.

सर्वेक्षणातील 67 टक्के प्रतिसादकांना वाटते की दिवसभरातील कामाच्या थकव्यामुळे जोडीदार घोरतात आणि त्याचा आरोग्य आणि झोपेच्या दर्जाशी काही संबंध आहे. तसेच जवळपास 45 टक्के व्यक्तींनी घोरण्यासाठी लठ्ठपणाला कारणीभूत मानले. याशिवाय इतर काही घटक देखील होते.

सेन्चुरी मॅट्रेसेसचे कार्यकारी संचालक उत्तम मलानी म्हणाले, "सर्वेक्षणाच्या निष्पत्ती व्यक्तींना घोरण्यासारख्या झोपेसंबंधित समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्यास जागरूक करतात, कारण त्यांचा आरोग्य व परस्पर संबंधावर परिणाम होऊ शकतो. अपुरी झोप आणि त्याचा आरोग्य आणि परस्पर संबंधावर होणाऱ्या परिणामाकडे दुर्लक्ष केले जाते, ज्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. जागतिक निद्रा दिनानिमित्त या सर्वेक्षणाद्वारे व्यक्तींची झोपमोड करणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही व्यक्तींना झोपेचा दर्जा सुधारण्यासाठी अॅण्टीमायक्रोबियल ट्रिटेड मॅट्रेस व उशांसह उत्तम झोप देणारी उत्पादने देऊन चांगली झोप घेण्यास मदत करत आहोत"

'ब्रेकअप के बाद' व्हाल मालामाल; तुम्ही तुमचं Heartbreak Insurance काढलंय का?

बंगळुरूमधील नोज अॅण्ड सायनस सर्जन डॉ. जगदीश चतुर्वेदी म्हणाले, "सर्वेक्षणामधून स्पष्टपणे दिसून येते की, अधिकाधिक व्यक्तींना घोरण्यासारख्या त्यांच्या झोपेसंबंधित समस्यांबाबत माहित आहे आणि त्याचा स्वीकार देखील करत आहेत. व्यक्तींनी वैद्यकीय उपचार, अॅण्टीमायक्रोबियल ट्रिटेड व मॅट्रेसेससह उत्तम झोप देणारी उत्पादने अशा हस्तक्षेपांसह झोपेचा दर्जा सुधारत या समस्येच्या निराकरणास सुरूवात करण्याची हीच योग्य वेळ आहे. दीर्घकाळापर्यंत घोरण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यास आरोग्यावर इतर परिणाम होऊ शकतात."

First published:
top videos

    Tags: Couple, Lifestyle, Relationships, Sleep