मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पावसाळ्यात ‘हा’ मसाल्याचा पदार्थ रोजच्या जेवणात वापरा; Immunity होईल Strong

पावसाळ्यात ‘हा’ मसाल्याचा पदार्थ रोजच्या जेवणात वापरा; Immunity होईल Strong

जावित्री हा मसाल्याचा पदार्थ जेवणाची चव वाढवण्याबरोबर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

जावित्री हा मसाल्याचा पदार्थ जेवणाची चव वाढवण्याबरोबर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

जावित्री हा मसाल्याचा पदार्थ जेवणाची चव वाढवण्याबरोबर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

नवी दिल्ली,19 ऑगस्ट : स्वयंपाकामध्ये वापरल्या जाणाऱ्या खड्या मसाल्यांपैकीच (Spices) एक जावित्री आहे. जावित्रीचा (Mace) सुगंध सुंदर असतो. त्यामुळे वर्षभरासाठी तयार केल्या जाणाऱ्या मसाल्यात याचा वापर होतो. शिवाय बिर्यानी सारख्या पदार्थात तर, जावित्री आवर्जून घातली जाते. पण, भारतीय जेवणात (Indian Food) वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचं औषधीय महत्व (Medicinal Importance) असतंच. जसं जायफळ औषधी आहे. वेलची, लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र यांचंही महत्व आहे. तसच जावित्रीही औषधी आहे. जावित्री आरोग्यासाठी देखील (Beneficial For Health) खूप उपयुक्त आहे. रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत करण्याबरोबरच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. जाणून घेऊयात जावित्रीचे वापर आणि फायदे.

रोगप्रतिकार शक्ती

कोरोनापासूनच (Covid 19 ) नाही तर, कोणताही विषाणू आणि रोग टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती मजबूत असणं खूप महत्वाचं आहे. यासाठी जावित्री वापरता येते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत झाल्य़ाने वारंवार आजारी पडण्याचा धोका कमी होतो.

(रात लावलेल्या झाडांमुळेही मिळते Positive Energy; गुलाब, चमेली लावून तर बघा)

सर्दिमध्ये आराम मिळतो

सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी जावित्री देखील खूप मदत करते. अ‍ॅन्टी-एलर्जीक, अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट आणि अ‍ॅन्टी-एम्फ्लामेट्री गुणधर्म आहेत. एवढेच नाही तर, सर्दीत शरीरात उष्णता आणण्यातही जवित्रीची विशेष भूमिका असते.

लिव्हरच्या समस्या कमी करते

तळलेले आणि मसालेदार अन्न आरोग्यासाठी हानिकारक असतात. यामुळे यकृताचं नुकसान होतं. तेलकट, मसालेदार खाणाऱ्यांनी जावित्री वापरल्यास लिव्हर डिटॉक्स होतं. त्यामुळे यकृताशी संबंधित समस्या कमी होतात.

(मुलांना धूम्रपानापासून दूर ठेवण्याचे मार्ग; कधीच Smoking करणार नाहीत तुमची मुलं)

किडनीच्या समस्या कमी

जावित्री वापरल्याने किडनीशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. कारण जावित्री कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून किडनीचं संरक्षण करण्यास मदत करते. तर, शरीरातील विषारी घटक काढून टाकून आणि रक्ताभिसरण सुधारण्याचं काम करते.

(मुलांसाठी थोडासा त्रास सहन करा पण, Joint Family मध्येच रहा; बघा किती फायदे आहेत)

जावित्राचे उपयोग समजून घेतल्यावर त्याचा वापर कसा करायचा याचीही माहिती जाणून घ्या.

(कोणत्याही सप्लिमेन्टची गरज पडणार नाही, ’या’ कारणांसाठी माहिलांनी रोज केळं खावंच)

जवित्री वापर करण्याची पद्धत

औषधी म्हणून त्याचा काढा म्हणून वापर करायला हवं असं नाही. आपल्या रोजच्या जेवणातही वापर करता येतो. मसाला चहा किंवा मसाला दूध तयार करताना वापरू शकता. पुलाव, बिर्याणी सारख्या डिशमध्ये खडा मसाला म्हणून करता येतो. तर, कोणत्याही भाजीमध्ये मसाला म्हणून वापरलं जाऊ शकतं. याबरोबर मिठाई, पुडिंग, मफिन, केक आणि ब्रेड बनवण्यासाठी देखील जावित्री वापरला जाऊ शकते.

First published:

Tags: Food, Immun, Lifestyle