सतत घरातच राहिल्यामुळे बऱ्याच लोकांना स्ट्रेस जाणवत आहे. मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी आणि घरात शांतता राखण्यासाठी स्वत:ला काही कामात व्यस्त ठेवणं फार महत्वाचं असतं. ज्यामुळे मन डायव्हर्ट होईल आणि सकारात्मक विचार वाढायला लागतील. याकरता स्वत:ला कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरातलं वातावरण देखील अशा प्रकारे केले पाहिजे की विचार सकारात्मक राहतील आणि उत्साह वाटेल. काही झाडंही सकारात्मक उर्जेचे सर्वात महत्त्वाचे स्त्रोत ठरू शकतात.