कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिला आपल्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात मात्र, पुरुषांच्या तुलनेत महिलांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. पाळीच्या चक्रामधून महिलांना दर महिन्याला जावं लागतं. शिवाय प्रेग्नेन्सीमुळे देखील महिलांच्या शरीरावर परिणाम होत असतो.
2/ 9
महिलांनी दररोज 1 केळं खाल्लं तर, त्यांचे अनेक त्रास संपू शकतात. थकवा येण, अशक्तपणा वाटणं आणि स्ट्रेस या वरती केळं हे रामबाण औषध आहे.
3/ 9
केळं इन्स्टंट एनर्जी बूस्टर आहे. त्यामुळे त्याला कम्प्लिट फूड मानलं जातं. केळं खाल्ल्यामुळे शरीरात ग्लुकोज लेव्हल वाढते आणि आपल्याला लगेचच उत्साही वाटायला लागतं.
4/ 9
महिलांनी सकाळी केळं खाल्लं तर, त्यांना दिवसभर उत्साही वाटतं राहतं. यामुळे शरीराला पोषक घटक मिळतात.
5/ 9
केळ्यामध्ये पोटॅशियम असतं. त्यामुळे तणाव कमी होतो पोटॅशियम आपल्या शरीरामध्ये तणाव निर्माण करणारे हार्मोन्स म्हणजेच कोर्टिसोल नियंत्रित करतं.
6/ 9
यामुळे जेव्हाही तणाव वाटत असेल तेव्हा एक केळं खावं. केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स,पोटॅशियम,व्हिटॅमिन बी 6, प्री-बायोटिक फायबर आणि मॅग्नेशियम असतं. जे ब्लड शुग कंट्रोल करण्याबरोबर मूडही चांगला करतं.
7/ 9
प्रेग्नेन्ट महिलांनी रोज 1 केळं खाणं आवश्यक आहे. यामध्ये फॉलिक ऍसिड असतं. ज्यामुळे नवीन पेशींची निर्मिती होत असते. याशिवाय गर्भाची वाढ चांगली होते. बाळामध्ये गर्भदोष राहण्याची भीती राहत नाही.
8/ 9
महिलांमध्ये ॲनिमियाचा त्रास जास्त प्रमाणामध्ये असतो. दररोज 1 केळं खाण्यामुळे ॲनिमियामध्ये फायदा होतो. रक्त निर्मितीला चालना देतं.
9/ 9
ज्या महिलांना मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी केळं खावं. खेळामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे डोकेदुखी कमी होते. डोकं दुखायला लागल्यानंतर महिलांनी केळं जरूर खावं.