मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पुरुषांनो! महिलांना माहिती असतं दीर्घायुषी जगण्याचं Secret; या सवयी वय कमी करतात

पुरुषांनो! महिलांना माहिती असतं दीर्घायुषी जगण्याचं Secret; या सवयी वय कमी करतात

यापूर्वी पुरूष आणि स्त्रियांमधील आयुष्यमानातील अंतर एवढं जास्त कधीच नव्हतं. 20व्या शतकापर्यंत महिला पुरूषांपेक्षा जास्त जगत नव्हत्या. या शतकाच्या सुरूवातीच्या काळात पुरूष आणि महिलांना संर्गजन्य आजारांचा धोका समान प्रमाणात असायचा. आता यात फरक पडला आहे. असं नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च सांगतं.

यापूर्वी पुरूष आणि स्त्रियांमधील आयुष्यमानातील अंतर एवढं जास्त कधीच नव्हतं. 20व्या शतकापर्यंत महिला पुरूषांपेक्षा जास्त जगत नव्हत्या. या शतकाच्या सुरूवातीच्या काळात पुरूष आणि महिलांना संर्गजन्य आजारांचा धोका समान प्रमाणात असायचा. आता यात फरक पडला आहे. असं नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च सांगतं.

पुरूषांना स्त्रियांपेक्षा जास्त व्यसनं आणि वाईट सवयी असतात. त्यामुळेच आरोग्य विषयक समस्यांही (Health Related Problem) जास्त असतात.

नवी दिल्ली,29 जुलै: अमेरिकेतील पुरुषांपेक्षा स्त्रियांचं सरासरी आयुर्मान जास्त असल्याचं आढळून आलं आहे. सेन्ट्रल फॉर डिसीस कंट्रोल अ‍ॅन्ड प्रिव्हेन्शन (CDC) यांच्यामते, महिलांचं सरासरी आयुर्मान 81 वर्षे आहे, तर पुरुषांचं 76 वर्षे आहे. पुरूष महिलांपेक्षा पिछाडीवर आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न (University of Southern Denmark) डेन्मार्कच्या डेमोग्राफीचे सह-प्राध्यापक व्हर्जिनिया झारुली  (Virginia Zarulli) यांच्या मते, यामागील कारण दोन मुख्य कारणांमुळे आहेत.जगभरातील महिलांचं आयुर्मान जास्त असण्यामागे बायलॉजिकल कारणं (Biological Causes) आहेत. सेक्स हार्मोन्समधली फरक (Difference Between Sex Hormones) हे पहिलं कारण आहे. जन्माच्या वेळीच लिंग ठरतं. स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी टेस्टोस्टेरॉन आणि जास्त इस्ट्रोजेन (Testosterone & estrogen)तयार करतात.

(घरातल्या पदार्थांनी करा ‘Weight loss Drink’तयार; जेवणानंतर घेण्याने व्हाल सडपातळ)

बायोलॉजी ऑफ सेक्स डिफरन्स(Biology of Sex Differences) जर्नलमधील 2017च्या अभ्यासानुसार, इस्ट्रोजेन हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसह अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतं. नेचर मेडिसिन जर्नलमधील 2020च्या अभ्यासानुसार टेस्टोस्टेरॉनचं जास्त प्रमाण काही आजारांमध्ये आरोग्याला जास्त धोका निर्माण करू शकतं हे सिद्ध झालं आहे.

(तुम्ही तुमच्या बाळाला गुदगुल्या करता का? 6 महिन्यांपर्यंत ठरू शकतं घातक)

टेस्टोस्टेरॉन पुरुषांमध्ये कर्करोग आणि स्त्रियांमध्ये एंडोमेट्रियल आणि स्तनाचा कर्करोग होतो. व्हर्जिनिया झारुली यांच्यमते, टेस्टोस्टेरॉनचा संबंधांमुळे धोका जास्त वाढतो. त्यामुळे लहान वयात मृत्यूचं प्रमाण वाढतं.झारुली सांगतात की स्त्रियांना पुरूषांपेक्षा कमी व्यसनं असल्याने  स्त्रिया पुरुषांपेक्षा सरासरी 4 ते 5 वर्षे जास्त जगतात. स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त मद्यपान करतात, सिगारेट ओढतात. त्याचाही परिणाम शरीरावर आणि पर्यायाने आयुष्यावर होत असतो.

(गरीब कुटुंबात जन्मलेले IPS ऑफिसर प्रेमसुख डेलू; 12 वेळा मिळवली सरकारी नोकरी)

क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल मेडिसिन अ‍ॅडव्हान्सेस या जर्नलमधील 2020च्या अभ्यासानुसार,पुरुष हेल्दी डाएट घेण्यापेक्षा हाय फॅट असलेला आहार घेतात. यापूर्वी पुरुष आणि स्त्रियांमधील आयुष्यमानातील अंतर एवढं जास्त कधीच नव्हतं. 20व्या शतकापर्यंत महिली पुरूषांपेक्षा जास्त जगत नव्हत्या. या शतकाच्या सुरूवातीच्या काळात पुरुष आणि महिलांना संर्गजन्य आजारांचा धोका समान प्रमाणात असायचा. आता यात फरक पडला आहे. असं नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च सांगतं.

(वर्किंग कपल्ससाठी एकत्र कुटुंबपद्धती ठरतेय वरदान; हे आहेत 4 फायदे)

याचा अर्थ स्त्रिया भरपूर जगतात असा होत नाही. केवळ स्त्री आणि पुरूषांचं आयुर्मान फरक वाढला आहे. एका अंदाजानुसार 2005 पासून स्त्रियांनीही धुम्रपान करायला सुरूवात केल्यापासून आयुष्य कमी झालंय. 2011च्या एका अहवालात असं दिसून आलं आहे की,सिगारेट स्त्रियांमध्येही आजार वाढलेल आहेत. स्त्रिया अपेक्षेपेक्षा 2.3 वर्षे कमी आयुष्य जगत आहेत.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle