मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वर्किंग कपल्ससाठी एकत्र कुटुंबपद्धती ठरतेय वरदान; हे आहेत 4 फायदे

वर्किंग कपल्ससाठी एकत्र कुटुंबपद्धती ठरतेय वरदान; हे आहेत 4 फायदे

एकत्र कुटुंबपद्धती (Joint Family) भारतात पुरातन काळापासून चालत आलेली आहे.

एकत्र कुटुंबपद्धती (Joint Family) भारतात पुरातन काळापासून चालत आलेली आहे.

एकत्र कुटुंबपद्धती (Joint Family) भारतात पुरातन काळापासून चालत आलेली आहे.

नवी दिल्ली, 28 जुलै: एकत्र कुटुंबपद्धती (Joint Family) भारतात पुरातन काळापासून चालत आलेली आहे. एकापेक्षा जास्त पिढ्या (Generations) ज्या घरात एकत्र राहतात, त्याला एकत्र कुटुंब असं म्हणतात. छोटी मुलं, त्यांचे आई-वडील, काका-काकू आणि आजी-आजोबा (Big Indian Family) असे सगळे एकाच घरात राहत असतील, तर ते एकत्र कुटुंब. आजही भारतात अनेक एकत्र कुटुंबं पाहायला मिळतात; मात्र काळानुसार त्यांची संख्या घटत जाताना दिसतेय. आज न्यूक्लिअर अर्थात छोटी कुटुंबांची (Nuclear Families) संख्या सर्वांत जास्त आहे; मात्र आजही एकत्र कुटुंबपद्धतीचे फायदे आणि महत्त्व नाकारता येत नाही.

एकत्र कुटुंबाचा फायदा असा असतो, की मुलांना आपली चुलत भावंडं (Cousins), काका-काकू (Uncle-Aunt), आजी-आजोबा (Grandparents) यांच्यासह राहिल्यामुळे सर्वांसोबत त्यांची सुदृढ नाती विकसित होतात. मुलांना मोठ्या माणसांचं प्रेम मिळतं. त्यांचा आदर कसा करायचा, याची शिकवण घेत ती मोठी होतात. एकत्र कुटुंबपद्धतीचे काही फायदे पाहू या.

कौटुंबिक मूल्यं (Family Values) : आई-वडिलांना आपल्या मुलांना अनेक गोष्टी शिकवायच्या असतात. अशा अनेक गोष्टी एकत्र कुटुंबातली मुलं आपोआप आणि चांगल्या प्रकारे शिकतात. एकमेकांसोबत विचारांचं-भावनांचं शेअरिंग करणं, एकमेकांना सांभाळून घेणं, जपणं, आदर करणं या गोष्टी मुलं शिकतात. त्यामुळे मुलं आपल्या आजूबाजूच्या लोकांप्रति संवेदनशील बनतात.

इतकं सुंदर दिसणं कसं शक्य आहे? महिलेचा Before-After look पाहून व्हाल शॉक

वर्किंग पॅरेंट्ससाठी (Working Parents) फायद्याचं : आई-वडील दोघेही नोकरी करत असतील, तर मुलांना सांभाळायचं कसं, त्यांच्यावर लक्ष कसं ठेवायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. कारण यासाठी विश्वासू व्यक्तीची गरज असते. त्यामुळेच अशा परिस्थितीत एकत्र कुटुंबपद्धती वरदान ठरते. अशा कुटुंबात मुलांना ठेवून आपण कामासाठी बाहेर पडताना आई-वडिलांना कोणतीही चिंता असत नाही. तसंच, आई-वडिलांना स्वतःसाठीही थोडा वेळ मिळू शकतो.

कोणा एकावर भार नाही : मोठं कुटुंब एखाद्या मोठ्या टीमसारखं असतं. स्वयंपाक करण्यापासून स्वच्छतेपर्यंतची घरातली कामं घरातल्या सदस्यांमध्ये वाटली जातात. त्यामुळे कोणा एकावर कामांचा भार पडत नाही. त्यामुळे कोणा एकालाच कामांचा ताण येत नाही.

चिनी लोक गर्भनाळही सोडत नाहीत; बाळाला जन्म देताच आईसुद्धा पिते प्लेसेंटा सूप

आर्थिक मदत : एकत्र कुटुंबातली सगळी कमावती मंडळी आर्थिक योगदान करतात. त्यामुळे खर्चांचा भार सर्वांमध्ये वितरित केला जातो. कोणा एकावर तो भार पडत नाही. तसंच, दुर्दैवाने कोणाची नोकरी गेली किंवा आर्थिक नुकसान झालं, तरी ती व्यक्ती एकदम रस्त्यावर येत नाही. घरातली बाकीची मंडळी त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करतात.

First published:

Tags: FAMILY, Relation, Relationship