नवी दिल्ली, 28 जुलै: छोटी बाळं (Baby) कुणाला आवडत नाहीत बरं? बाळांना खेळवणं, त्यांना हसवणं यातून खूप आनंद मिळतो. आई-वडिलांना (Parents) यातून मिळणारं समाधान तर निराळंच असतं. बाळाच्या चेहऱ्यावर खुललेलं निरागस हसू (Baby Smile) पाहिलं, की आपल्या सगळ्या अडी-अडचणींचा, त्रासांचा काही काळासाठी तरी विसर पडतो. बाळांना हसवण्यासाठी अगदी छोटंसं कारणही पुरतं. एखाद्या खेळण्यातून आलेला आवाज असो किंवा आपण वाजवलेली शीळ असो, बाळं खुदकन हसतात. बाळांना हसवण्यासाठी सर्रास वापरला जाणारा एक मार्ग म्हणजे गुदगुल्या. पोटावर किंवा तळपायाला गुदगुल्या केल्या, की बाळं लगेचच अगदी खदखदून हसतात; पण त्या गुदगुल्यांचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं तरी बाळांच्या हसण्याचं रूपांतर रडण्यात कधी होतं, ते कळतही नाही. त्याचं कारण त्या गुदगुल्या त्यांना वेदनादायी ठरतात. वास्तविक गुदगुल्या जास्त प्रमाणात केल्या तर बाळांसाठी घातकही ठरू शकतं. 'लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉम'ने याबद्दलची माहिती देणारा लेख प्रसिद्ध केला आहे.
गुदगुल्या म्हणजे शरीराला होणारी एक संवेदना आहे. पोटाला, तळपायाला, काखेत यांसारख्या काही विशिष्ट जागी स्पर्श केल्यास गुदगुल्या होतात. प्रत्येक व्यक्तीची यासाठीची संवेदनशीलता निराळी असते. नाइस्मिसिस (Knismesis) प्रकारच्या गुदगुल्या सुखद प्रकारची (Pleasure) संवेदना देतात. गार्गलेसिस (Gargalesis) प्रकारच्या गुदगुल्या मात्र त्रासदायक असतात.
बाळंतपणानंतर वाढलेलं वजन कमी करा; ही 5 योगासनं आहेत फायदेशीर
नाइस्मिसिस प्रकारच्या गुदगुल्या बालकांना सुखद संवेदना देतात. त्यामुळे त्यांना त्या हव्याहव्याशा वाटतात. आई (Mother) आणि बाळातलं नातं स्पर्शावर अवलंबून असतं. त्यामुळे कुरवाळणं, जवळ घेणं यांबरोबरच अशा हलक्या गुदगुल्यांचाही त्यात समावेश असतो. मात्र गार्गलेसिस प्रकारच्या म्हणजेच जास्त तीव्रतेने केल्या गेलेल्या गुदगुल्या हा बाळांसाठी त्रासदायक अनुभव ठरतो आणि त्यामुळे बाळांचं नुकसानही होऊ शकतं, असं बालरोग विशेषज्ञ डॉ. सालेहा अग्रवाल (बीएचएमएस, एमडी) यांनी लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉमला सांगितलं.
गर्भनिरोधक गोळी घेण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? Pregnancy टाळा
सहा महिन्यांपर्यंतच्या बाळाला गुदगुल्या समजतच नाहीत. त्यामुळे त्यापेक्षा लहान बाळाला गुदगुल्या केल्या तर त्यावर प्रतिक्रियेदाखल ते हसत नाही. त्यांच्यासाठी तो केवळ एक स्पर्श असतो; पण ते हसत नसल्याने आणखी गुदगुल्या केल्या गेल्या तर ते त्याला त्रासदायक ठरतं आणि तो अनुभव त्यांच्या भीतीदायक अनुभवांच्या यादीत टाकला जातो. त्यामुळे त्यांना स्पर्शाचीच भीती वाटू शकते. झोपेतून अशी बाळं घाबरून उठू शकतात. अशात अगदी डास चावला तरी त्यांना जास्त संवेदना होऊ शकते.
सहा महिन्यांपर्यंत करू नका गुदगुल्या
एवढी लहान बाळं बोलूही शकत नाहीत. त्यामुळे गुदगुल्यांमुळे आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल ती काही सांगू शकत नाहीत. त्यामुळे ती वैतागून रडूही शकतात. जास्त प्रमाणात गुदगुल्या केल्या गेल्या, तर त्यांचं शरीर दुखू शकतं. त्यांना उचक्या लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. घरातल्या व्यक्ती बाळाला थोड्या-थोड्या वेळाने गुदगुल्या करत असतील, तर ते दमूही शकतं. गुदगुल्यांदरम्यान बाळाने शरीराला मोठे झटके दिले, तर बाहेरून किंवा अंतर्गत जखमाही होऊ शकतात.
आलिया भटकडून जाणून घ्या तिचं Beauty Secret; चाहत्यांसाठी खास शेअर केला Video
त्यामुळे सहा महिन्यांपर्यंतच्या बाळांना गुदगुल्या करू नयेत, असा सल्ला डॉक्टर देतात. सहा महिन्यांनंतरही त्यांच्याशी खेळताना त्यांच्या प्रतिक्रिया कशा आहेत, याचा अंदाज घ्यावा आणि मगच आपला स्पर्श कसा असावा, हे आई-वडिलांनी ठरवावं, असं डॉक्टर म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Small baby