नवी दिल्ली, 29 जुलै : प्रेमसुख डेलू (IPS Officer Premsukh Delu) यांना पाहून गुन्हेगार कापायला लागतात. त्यांची ओळख एक निडर आयपीएस ऑफिसर (IPS Officer) म्हणून आहे. ‘डेली ने बोला तो फायनल’ अशी टॅगलाईन आता अमरेली जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे. राजस्थानच्या बीकानेर (Rajasthan, Bikaner) जिल्ह्यामधील नोखा तहसील क्षेत्रातील रासीसर मधल्या डेलू कुटुंबामध्ये 3 एप्रिल 1988 साली प्रेमसुख डेलू जन्म झाला.
प्रेमसुख यांचं कुटुंब अतिशय गरीब होतं. कपडे खरेदी करण्या इतकेही पैसे त्यांच्याकडे नसायचे. त्यामुळे आठवीपर्यंत त्यांनी फूल पॅन्टही माहिती नव्हती. प्रेमसुख यांचे आई-वडील अशिक्षित होते. पण, मुलांनी शिक्षण घ्यावं अशी त्यांची इच्छा होती. IPS डेलू सांगतात की त्यांनी आपल्या प्रत्येक नोकरी मधून चांगली शिकवण घेतलेली आहे.
(पहिल्याच प्रयत्नात टॉपर; IAS अनमोल सिंह बेदी 8 तास करायचे अभ्यास)
प्रेमसुख डेलू यांच्या हुशारीचा अंदाज या गोष्टीवरून लावता येऊ शकतो की त्यांनी 12 वेळा सरकारी नोकरी मिळवलेली आहे. ते गुजरात कॅडरचे IPS ऑफिसर आहेत. सध्या अहमदाबादमध्ये अमरेली जिल्ह्यातमध्ये DSP पदावर कार्यरत आहे प्रेमसुख डेलू यांनी 2010 मध्ये क्लार्क म्हणून पहिली सरकारी नोकरी लागली. यानंतर देखील त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला.
(Pecan Nuts आहेत न्युट्रिशनचं पॉवर हाऊस; झटपट एनर्जीसाठी रोज खा)
ग्रामसेवक परीक्षेमध्ये त्यांनी राजस्थानमध्ये दुसरा क्रमांक मिळवला. तलाठी म्हणून काम करण्याआधीच त्यांनी राजस्थानमध्ये असिस्टंट जेलर जॉईन केलं. त्याआधी राजस्थान पोलिसांमध्ये सब इन्स्पेक्टर पदासाठी ही त्यांची निवड झाली होती. त्यानंतर 2014 मध्ये RSS म्हणजेच राजस्थान प्रशासकीय सेवेमध्ये देखील त्यांची निवड झाली.
(त्वचेसाठी वरदान ठरतात किचन मधले ‘हे’ पदार्थ; फेस पॅक वापरून घालवा चेहऱ्याचे डाग)
मग त्यांनी रेवेन्यू सर्विस जॉईन केली. त्यानंतर यूपीएससी परीक्षेचा (UPSC Exam) अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये 117 रँक मिळवला. पुन्हा 2016 मध्ये परीक्षा देत IPS ऑफिसर बनले. त्यांची पहिली पोस्टिंग साबरकांठा जिल्ह्यामध्ये ASP पदावर झाली. आज ते जिगरबाज ऑफिर म्हणून प्रसिद्ध आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Inspiration, IPS Officer, Success stories, Upsc exam