मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /घरातले 2 पदार्थ वापरून बनवा ‘Weight loss Drink’; रोज जेवणानंतर घेण्याने वजन होईल कमी

घरातले 2 पदार्थ वापरून बनवा ‘Weight loss Drink’; रोज जेवणानंतर घेण्याने वजन होईल कमी

या वेट लॉस ड्रिंकने (Weight loss Drink) चरबी कमी व्हायला लागते. त्यामुळे पोटावरचा घेर कमी होतो.

या वेट लॉस ड्रिंकने (Weight loss Drink) चरबी कमी व्हायला लागते. त्यामुळे पोटावरचा घेर कमी होतो.

या वेट लॉस ड्रिंकने (Weight loss Drink) चरबी कमी व्हायला लागते. त्यामुळे पोटावरचा घेर कमी होतो.

दिल्ली,29 जुलैआजकाल वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problems) नॉर्मल झालेली आहे. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आपण कितीतरी उपाय करतो. पण, वाढलेलं वजन सहजासहजी कमी होत नाही. अशा वेळेस आहारात बदल (Change in Diet) किंवा एखाद्या वस्तूचं सवेन फायदेशीर (Benefit) ठरतं. वजन वाढल्यामुळे  (Weight Gain) अनेक शारीरिक समस्या (Problem) निर्माण होतात. अंगदुखी, पायदुखी, ब्लड प्रेशरचा त्रास,हृदयासंबंधी समस्या डोकं वर काढायला लागतात. अशा वेळी आपण वजन कमी (Weight Loss) करण्याकडे लक्ष देतो. वजन कमी करण्यासाठी आपण घरगुती पदार्थ (Home Made Food) ही वापरू शकतो. वाढलेल्या वजनासाठी केलेले अनेक उपाय थकले असतील तर, हे सोपं ड्रिंक तुम्हाला फायदा देऊ शकतं.

हे ड्रिंक नैसर्गिक वस्तूंपासून बनतं. त्यामुळे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. उलट शरीराला जास्त फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि गुळापासून वेट लॉस ड्रिंक (Weight loss Drink)  तयार करता येतं. यामुळे वेगाने वजन कमी होऊ शकतं. गुळ शरीरासाठी एक प्रकारे पॉवर हाउस आहे. गुळात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी, सुक्रोज, ग्लुकोज, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. गुळात फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक व्हिटॅमीन आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. गुळामध्ये असलेल्या आयर्न यामुळे शरीरात रक्ताची कमतरता दूर होते. शिवाय यात कॅलरीज खुप कमी असतात. गुळामुळे आपली पचनशक्ती सुधारते. बॉडी डीटॉक्स होते आणि मेटाबॉलिजम रेट वाढतो.

तर, लिंबामध्ये व्हिटॅमीन सी असतं. व्हिटॅमीन सीमुळे देखील मेटाबॉलिजम चांगलं होतं. पोटावरची चरबी कमी व्हायला लागते. त्यामुळेच वजन कमी करायचं असेल तर गुळ आणि लिंबाचा वापर करावा. दररोज योग्यप्रकारे वापर केल्यास शरीरातली अतिरिक्त चरबी कमी व्हायला लागेल.

(असे ओळखा 'होम रेमेडीज' करताना होणारे Side Effects; टाळा त्वचेचं नुकसान)

कसं काम करतं ?

गुळ आणि लिंबू यामध्ये शरीरासाठी फायदेशीरच असे महत्त्वाचे घटक आहेत. जेवणानंतर हे ड्रिंक प्यायलास मेटॅबॉलिझम वाढतं आणि अन्न चांगल्या प्रकारे पचण्यास मदत होते. शरीरातली चरबी कमी व्हायला लागते. शरीरात साठलेले टॉक्सिन्स बाहेर पडून शरीर डिटॉक्स होतं.

(दररोज अंघोळ करणं बरं नव्हे; हेल्दी राहण्याऐवजी उलट आजारीच पडाल)

यासाठी कोमट पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि गुळाचा एक छोटासा तुकडा घालून एकत्र करा. पूर्ण वितळेपर्यंत विरघळेपर्यंत एकत्र करा. हे ड्रिंक दररोज रिकाम्यापोटी घेतल्याने जास्त फायदा होतो. मात्र, जेवणानंतर देखील हे ड्रिंक घेतलं तर, अन्न पचनाला मदत मिळते. पोटाचे त्रास होत नाहीत.

(महिलांसाठी केळं आहे वरदान; पहा दररोज खाण्याचे फायदे)

पचनक्रिया सुरळीत होते

आयुर्वेदानुसार गुळाचे अनेक फायदे आहेत. गॅस, अपचन किंवा अ‍ॅसिडीटीसारखे त्रस्त असतील तर गळू खाऊ शकता. गूळ सैंधव मीठ, काळं मीठ एकत्र करून खाल्याने आंबट ढेकर येणं बंद होतं.

First published:
top videos

    Tags: Weight loss, Weight loss tips