मुंबई, 19 जून : जेवणानंतर शतपावली करणं फायद्याचं असल्याचं नेहमीच सांगितलं जातं. संशोधन सांगतं, की आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार जेवणानंतर 10 ते 30 मिनिटांचा वॉक तुम्ही करू शकता. हा वॉक कॅलरी बर्न करून तुमची ऊर्जा वाढवतो. (health tips) शिवाय यातून कॅन्सरसारख्या आजारांपासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. समजून घ्या, जेवणानंतर वॉक करणं का गरजेचं असतं. (walking after taking meals) पचन चांगलं होतं जेवल्यावर चालल्याने पचन चांगलं होतं. शरीराची हालचाल झाल्यानं आतड्यांची हालचाल होते. परिणामी जेवण लवकर आणि सहज पचतं. याशिवाय पेप्टिक अल्सर, छातीतली जळजळ, पोटात मुरडा येणं आणि कोलोक्टरल कॅन्सरचा धोकाही टळतो. (benefits of walking after eating) ब्लड शुगर नियंत्रणात राहते जेवणानंतर शतपावली केल्यास शरीराची हालचाल होते. यातून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. 2016 मध्ये झालेलं संशोधन सांगतं, जेवल्यावर दहा मिनिट वॉक केल्यानं रक्तातील साखर कमी होते. (why to walk after meals) हेही वाचा Shocking Video! एक्सरसाइज करताना फाटले मसल; बॉडी बिल्डरची झाली भयंकर अवस्था हृदयरोगाचा धोका कमी होतो गेल्या अनेक दशकांपासून सांगितलं जातं आहे, की शरीराची हालचाल हृदयासाठी चांगली असते. संशोधनात हे सिद्ध झालं आहे. अमेरिकेचा आरोग्य विभाग सांगतो, की जेवल्यावर दहा मिनिट चालल्यास हृदयरोगाचा धोका कमी होतो. हेही वाचा पुण्यात कोरोनाचा विस्फोट होत असतानाच अदार पूनावाला यांनी दिली GOOD NEWS वजन वाढत नाही तज्ज्ञ म्हणतात, जेवल्यावर शतपावली केल्यावर कॅलरी बर्न होते. दैनंदिनीत चालण्याचा समावेश केल्यास वजन वाढण्याचा धोका बराच कमी होतो. मात्र लक्षात ठेवा, की रोज तेलकट आणि मसालेदार खाऊ नका. हेही वाचा बापरे! नोकरीची अट म्हणून छातीचा X-Ray काढला आणि रिपोर्ट पाहून तरुण पुरता हादरला रक्तदाब वाढत नाही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने सांगितल्यानुसार, दहा मिनिटांचा वॉक वाढलेला रक्तदाब नियंत्रित करण्याचं काम करतो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की चालण्याच्या दरम्यान जास्त वेग वाढवू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.