जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Shocking Video! एक्सरसाइज करताना फाटले मसल; बॉडी बिल्डरची झाली भयंकर अवस्था

Shocking Video! एक्सरसाइज करताना फाटले मसल; बॉडी बिल्डरची झाली भयंकर अवस्था

Shocking Video! एक्सरसाइज करताना फाटले मसल; बॉडी बिल्डरची झाली भयंकर अवस्था

क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणं बॉडी बिल्डरला (body builder) चांगलंच महागात पडलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 27 मार्च : महिलांना जसं आपण अधिक सुंदर दिसावं असं वाटत असतं, तसं पुरुषांना आपली बॉडी (Body) उत्तम हवी असते. यासाठी ते एक्सरसाइज, सप्लिमेंट शक्य ते सर्वकाही करतात. कधी कधी तर लवकरात लवकर जास्तीत जास्त बॉडी व्हावी यासाठी जीममध्ये (GYM) आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलतात. असंच वजन उचलणं दुबईतील (Dubai) एका बॉडी बिल्डरला (Body builder) चांगलंच महागात पडलं आहे. दुबईतील रॉयन क्रॉली बेंच प्रेस एक्सरसाइझ करत होता. रॉयनने त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न त्याच्या जीवावर बेतता बेतता राहिला. वजन उचलत असताना रॉयनचं वजनावरील नियंत्रण सुटलं आणि त्याच्या उजव्या हाताचे मसल फाटले. रॉयनचे जीम ट्रेनर लॅरी व्हिल्स यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता किती बेंच प्रेस करताना रॉयन वरच्या दिशेने वजन नेत होता. रॉयनवर वजनाचा भार पडू नये, यासाठी त्याचा ट्रेनर मदत करत होता. पण तरी रॉयनच्या उजव्या हातावर ताण आला आणि त्याचे नियंत्रण सुटलं. तेव्हाच त्याच्या उजव्या हाताचे मसल फाटले. त्यावेळी त्याला तीव्र वेदना झाल्या. रायन वेदनेने अक्षरश: कळवळला. वेदनेने ओरडतच तो तिथून उठला. मिळालेल्या माहितीनुसार राययने तब्बल 180 किलोचं वजन उचललं होतं. हे वाचा -  बाईकवर करत होता खतरनाक स्टंट, हवेत उडाला तरुण आणि… अंगावर शहारा आणणारा VIDEO रॉयनला रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. काही कारणामुळे त्याला सर्जरीसाठी आवश्यक असलेले पैसे देणं शक्य नव्हतं, म्हणून त्याने क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसे जमवले. रॉननचा कोच लॅरीने क्राऊड फंडिंगच्या मदत मागितली. रॉयनसाठी तब्बल 27 लाख रुपये जमवले.

रॉयनची यशस्वी सर्जरी झाली. त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर याची माहिती दिली. फक्त एक तासाची सर्जरी होती पण त्यासाठी चार तास लागले. सर्जरी आधी मला खूप भीती वाटली होती. बॉडी बिल्डिंगचं करिअर सुरू होण्याआधीच संपतं की काय असंच वाटू लागलं. हे वाचा -   Shocking video : 12 व्या मजल्यावरून कोसळला, स्वत:च उठून बसला 5 वर्षांचा चिमुरडा ‘मला अजूनही खूप वेदना होत आहे. डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण शरीर सूजलं आहे. हळूहळू रिकव्हरी होते आहे. पण मला माझा हात नीट करण्यासाठी सर्वकाही नीट फॉलो कारवं लागेल. सध्या तरी मी घरात आराम करेन आणि हळूहळू जिममध्ये जाईन’, असंही रॉयन म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात