मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात कोरोनाचा विस्फोट होत असतानाच अदार पूनावाला यांनी दिली GOOD NEWS

पुण्यात कोरोनाचा विस्फोट होत असतानाच अदार पूनावाला यांनी दिली GOOD NEWS

देशात कोविशिल्ड कोरोना लस (Corona vaccine) उपलब्ध करून देणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum institute of india)  कोरोनाविरोधातील लढ्यात आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

देशात कोविशिल्ड कोरोना लस (Corona vaccine) उपलब्ध करून देणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum institute of india) कोरोनाविरोधातील लढ्यात आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

देशात कोविशिल्ड कोरोना लस (Corona vaccine) उपलब्ध करून देणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum institute of india) कोरोनाविरोधातील लढ्यात आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

पुणे, 27 मार्च : एकिकडे पुण्यात कोरोना (Pune coronavirus cases) रुग्णांची संख्या भरभर वाढते आहे. शुक्रवारी पुण्यातील कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum institute of india) सीईओ अदार पूनावाला (Adar poonawalla) यांनी आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी फक्त पुणेकरांसाठीच नाही तर सर्व भारतीयांसाठी महत्त्वाची अशी आहे.

देशात सध्या कोरोनाच्या दोन लशी दिल्या जात आहेत त्यात आता आणखी एका लशीची भर पडणार आहे. भारतात या तिसऱ्या कोरोना लशीचं ट्रायल सुरू झालं आहे आणि काही महिन्यांतच ही लसही सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमार्फत कोविशिल्ड लशीनंतर आता कोवोवॅक्स (Covovax) लस मिळणार आहे. अदार पूनावाला यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

ट्वीटमध्ये अदार पूनावाला यांनी सांगितलं की, कोवोव्हॅक्स लस आफ्रिकन आणि यूके वेरिएंटवरसुद्धा परिणामकारक आहे. ही लस 89% प्रभावी आहे. या लशीचं भारतात क्लिनिकल ट्रायल सुरू झालं आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत ही लस भारतात लाँच होण्याची आशा आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये अमेरिकेतील नोवोव्हॅक्स (Novavax) कंपनीशी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा करार झाला. त्यानुसार ही लस यावर्षी भारतात उपलब्ध होईल.

हे वाचा - पुणेकरांनो, आता तरी जागे व्हा! कोरोनाचं रौद्र रूप; मृत्यूचा भयावह आकडा समोर

देशभरातल्या कोरोना रुग्णसंख्येचा (Corona) आकडा गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढतो आहे. त्यात वेगवेगळ्या कोरोना स्ट्रेन्सची (Coronavirus strain) भर पडली आहे. इतर देशात आढळलेले कोरोनाचे नवे स्ट्रेन भारतातही आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढते आहे. भारतात आतापर्यंत यूके (UK Strain), दक्षिण आफ्रिका (South African Strain) आणि ब्राझीलमधल्या स्ट्रेनची (Brazilian Strain) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

केंद्र सरकारने बुधवारी (24 मार्च) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात नव्या कोरोनाचे 771 रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी 736 जणांना ब्रिटनमधील, 34 जणांना दक्षिण आफ्रिकेतील तर एकाला ब्राझीलमधल्या कोरोनाची लागण झालेली आहे.  हे तिन्ही स्ट्रेन महाराष्ट्रातही आहेत. महाराष्ट्रात ब्रिटन स्ट्रेनचे 56, दक्षिण आफ्रिकन स्ट्रेनचे 5 आणि ब्राझील स्ट्रेनचा एक रुग्ण आहे.

हे वाचा - कोरोनाचा प्रसार कसा झाला? WHO चा अहवाल येण्याआधीच चीननं दिलं उत्तर

सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस यूकेतील स्ट्रेनविरोधात प्रभावी आहे. तर आता नोवोवॅक्स लस दक्षिण आफ्रिकन आणि ब्राझील स्ट्रेनवर प्रभावी आहे. त्यामुळे कोरोनाच्या या स्ट्रेनविरोधातसुद्धा भारताकडे आता मोठं शस्त्र उपलब्ध झालं आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Coronavirus