मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ना डाग पडणार, ना ओरखडे; अशा पद्धतीने साफ करा तुमचा चष्मा

ना डाग पडणार, ना ओरखडे; अशा पद्धतीने साफ करा तुमचा चष्मा

चष्मा मायक्रोफायबर कपड्याने साफ करावा.

चष्मा मायक्रोफायबर कपड्याने साफ करावा.

बरेच लोक चष्मा चुकीच्या पद्धतीने साफ करतात.

नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : एकदा चष्मा लागला की डोळ्यांबरोबर त्याच्या स्वच्छतेची काळजीही (Cleaning care) घ्यावी लागते. हल्ली चष्मे काचेऐवजी प्लॅस्टिकचे असतात. प्लॅस्टिकवर सहज स्क्रॅच (Scratches) पडतात. चष्मा साफ करताना बरेच लोक चष्मा जोरात घासण्याची (Rubbing hard) चुका करतात. चष्मा साफ करताना जास्त घासला तर, ओरखडे पडू शकतात. चष्मावर (Eyeglasses) ओरखडे पडले आणि व्यवस्थित दिसत नसेल तर चिडचिड वाढते. धूळ (Dust) जमा झाली तर पाहताना अडथळे येतात.

चष्मा स्वच्छ करताना कमीत कमी दबाव (Low Pressure) टाकावा. घरगुती क्लिनरने (Cleaner) चष्मा साफ करण्याने त्यावरचं कोटिंग निघतं.  डोळ्यांसाठी महत्त्वाचा असणारा चष्मा नेमका कसा साफ करावा, त्याची काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या.

चष्मा साफ करण्यासाठी पद्ध

1. चष्मा मायक्रोफायबर कपड्याने साफ करावा. यामुळे चष्म्यावर कोणतेही ओरखडे पडणार नाहीत. साध्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने चष्मा पुसल्यास त्यावर जमा झालेली धूळ कमी होत नाही. केवळ ती सरकते आणि चष्म्याच्या फ्रेमध्ये अडकते. अशा वेळी पुन्हापुन्हा डाग पडत राहतात आणि काचा कायमच्या खराब होतात.

(निकोप वाढीसाठी, नको फक्त अभ्यास; खेळू द्या अंगणात)

2. आय ग्लास लेन्स क्लिनर बाजारात उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईनही मागवता येतात. त्यावर दिलेल्या सुचना पाहून आपला चष्मा साफ करावा. हे लोशन काचांवर लावून मायक्रोफायबर कपड्याने काचा पुसून घ्या.

3. बऱ्याचवेळा आपल्या नाकावर आणि चेहऱ्यावर जमा झालेलं ऑईल चष्म्याच्या काचांना लागल्याने त्या तेलकट होतात. त्यामुळे धुसर दिसतं. हा तेलकट पदार्थ सहज निघत नाही.

(Chanakya Niti: व्हा स्मार्ट! वेळीच ओळखा फसव्या माणसांना; रहा सावध)

त्यामुळे माईल्ड डिश सोप किंवा लिक्वीड सोपचा वापर करावा. असा साबण वापरताना काळजी घ्यावी. काचेच्या दोन्ही बाजूला साबण लावा. हलक्या हाताने घासून साफ करा. साध्या पाण्याने धुवा. यामुळे तेलकटणा जाईल. मात्र सेन्सेटिव्ह स्किन असलेल्यांनी ही पद्धत वापरू नयेत.

4. नेहमी कोमट पाण्याने चष्म्याच्या काचा धुवा. जास्त गरम पाणी वापरल्यास काचेवर तडे जाऊ शकतात, फ्रेमवरचं कोटिंग कमी होऊ शकतं आणि चष्म्याचं नुकसान होऊ शकतं.

5. एखादी रिकामी स्प्रे बॉटल घ्या. ज्यात केवळ हवा भरलेली असेल. या हवेचा वापर करून चष्म्यावर जमलेली धूळ उडवता येते. हा सोपा पर्याय फार फायदेशीर आहे.

(आता तरी ऐका! फ्रुट सॅलड अजिबात खाऊ नका; आधी ऋजुता दिवेकरचा हा Video पहा)

6. घरच्याघरी चष्मा साफ करताना जास्त काळजी घ्या, अ‍ॅसिटोन किंवा नेलपेन्ट रिमुव्हरचा मुळीच वापर करू नका. त्यामुळे काच किंवा फ्रेम पुसताना त्यातील केमिकलमुळे चष्मा कायमचा खराब होईल.

7. हे सगळे सोपे उपाय आहेत त्याशिवाय चष्मा जास्त खराब झाला असेल तर, ऑप्टिशियमकडे न्यावा. त्यांच्याकडील उपकरणांनी चष्मा सहज साफ होतो.

(Parenting : पाच वर्षांच्या लेकीच्या आयब्रोजवरून पती-पत्नीत रंगला वाद)

या शिवाय लेन्स वापरणाऱ्यांनाही जास्त काळजी घ्यावी लागते. लेन्सेस वापरणाऱ्या व्यक्तींनी वाहन चालवताना ‘फोटोक्रोमॅटिक’ झीरो नंबरचा चष्मा जरुर वापरावा. त्यामुळे धूळ, वारा, सूर्यप्रकाशाचा त्रास होणार नाही. लेन्श साफ करताना त्यासाठी मेडिकलमध्ये मिळणारं लिक्वीडच वापरावं.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Proper care