बरेचसे लोक चांगल्या माणसांना ओळखण्यात चूक करतात आणि चुकीच्या माणसावर भरोसा ठेवून नुकसान करतात.
2/ 7
म्हणूनच चाणक्य नीती प्रमाणे आयुष्य जगावं. चाणक्य सांगतात व्यक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी ओळखण्याची क्षमता येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही जगता येतं.त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं.
3/ 7
दगाबाज माणसांवर विश्वास नको- आचार्य चाणक्य सांगतात ज्या नद्यांवरचे पूल पक्के नाहीत. त्या नद्यांवर कधीच विश्वास ठेवू नका. नदीचा प्रवाह वाढून कधीही पूल वाहून जाऊ शकतो. म्हणजेच जे लोक आपल्या सोबत विश्वासाने राहण्याची खात्री नसते अशा लोकांवर कधीच भरोसा ठेवू नये.
4/ 7
शस्त्र बाळगणार्या माणसावर भरोसा नको- जी माणसं स्वतःबरोबर शस्त्रास्त्र बाळगतात त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. कारण रागाच्या भरात ते तुमच्यावर हल्ला करू शकतात. याचा अर्थ ज्या लोकांचा आपल्या रागावर ताबा नसतो अशा लोकांची संगत कधीच करू नये.
5/ 7
चंचल स्वभावाची स्त्री- नीति शास्त्रानुसार ज्या स्त्रीचा स्वभाव चंचल आहे. तिच्यावर भरोसा करू नका कारण, अशा स्त्रिया आपल्याला अडचणीमध्ये टाकण्याची शक्यता असते.
6/ 7
वरिष्ठांचे चमचे- ज्या माणसांचे संबंध वरिष्ठ माणसांशी असतात अशा ही लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये. कारण, तुमच्या मनातल्या गोष्टी जाणून ते आपल्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकतात. यामुळे तुमच्याच शब्दांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.
7/ 7
संयम नसलेली माणसं- संयमी स्वभाव नसेलेली माणसं नेहमी धोकादायक असतात. ज्या लोकांमध्ये संयम नसतो अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. संयम नसणारी माणसं रागाच्याभरात तुमचंही नुकसान करतील आणि स्वतःचंही नुकसान करतील