• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • निकोप वाढीसाठी, नको फक्त अभ्यास; खेळू द्या अंगणात

निकोप वाढीसाठी, नको फक्त अभ्यास; खेळू द्या अंगणात

त्यामुळेच लहान मुलांनी एकत्र खेळणे त्यांच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे

त्यामुळेच लहान मुलांनी एकत्र खेळणे त्यांच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे

Benefits Of Play For Children: अभ्यासाबरोबर लहान मुलांसाठी खेळणंही महत्त्वाचं आहे. तरच, लहान मुलांची योग्य पद्धतीने वाढ (Development) होऊ शकते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 1 ऑगस्ट :  बरेच पालक मुलं खेळत असतील तर त्यांना ओरडून अभ्यासाला (Study) बसवतात. मुलं वेगवेगळ्या क्लासेस किंवा अ‍ॅक्टिव्हीटीमध्ये (Extra Activates) गुंतल्याने खेळासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे मुलं एकलकोंडी बनतात. मुलांच्या निकोप वाढीसाठी खेळणं महत्त्व (Playing Is Important) आहे. एकत्र खेळल्याने मुलं क्रिएटिव्हिटी (Creative) होतात. याशिवाय समाजामध्ये वावरण्याची पद्धतही (Behavior in Society) त्यांना कळते. खेळताना मुलांची भांडण (Quarrel) होतात किंवा एकमेकांना सांभाळून घेतले जातात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता (Leadership) वाढायला लागते. लहान मुलांनी एकत्र खेळणं त्यांच्या विकासाच्या (Development) दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. घरामध्ये कोंडलेली मूलं जास्त चिडचिडी होतात. त्यांच्यामध्ये एकटेपणा वाढायला लागतो. त्यांना अ‍ॅडजस्टमेन्टची सवय रहात नाही. 2012 च्या एका अभ्यासानुसार लहान मुलांमध्ये खेळल्यामुळे ट्रेस (Stress) कमी होते. मुलांचं उत्तम आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यासाठी (Mental Health) एकत्र खेळणं महत्त्वाचा आहे. चांगल्या आरोग्यासाठी लहान मुलं अतिशय अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यामुळे त्यांना एका जागेवर बसायला आवडत नाही. खेळल्यामुळे मुलांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यांच्या हाडांना आणि स्नायूंना बळकटी मिळते. त्यामुळे बोन डेन्सिटी वाढते. मुलांचा उत्साह वाढतो आणि मानसिक त्रास ताण कमी होतो. (लिंबू चांगलं रसाळ आहे का हे कसं ओळखायचं? खरेदी करतानाच सोप्या टिप्स वापरून पाहा) क्रिएटिव्हिटी वाढते खेळताना मुलं मोठ्यांच्या खेळण्याच्या पद्धतीची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. याकरता वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. यामुळेच मुलं विचारपूर्वक वागायला लागतात. एकटं खेळण्यापेक्षा मुलांनी इतर मुलांसोबत खेळल्यामुळे त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी वाढते. याशिवाय स्वतंत्र विचार करण्याची क्षमता देखील वाढायला लागते. त्यामुळे भविषातल्या कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची ताकद त्यांच्यामध्ये येते. (पांढरं मध माहितेय? किती फायदेशीर आहे आरोग्यासाठी जाणून घ्या) चिडचिडेपणा कमी होतो घरामध्ये कोंडलेल्या मुलांच्या तुलनेत बाहेर खेळणाऱ्या मुलांपेक्षा चिडचिडेपणा आणि स्ट्रेस कमी झालेला पाहायला मिळतो. याशिवाय मुलं आनंदी राहतात आणि इतरांशी देखील सन्मानाने वागाला शिकतात. एकत्र खेळणाऱ्या मुलांमध्ये आव्हानं स्विकारण्याची क्षमता वाढते. (महत्त्वाची बातमी! वाहनाच्या PUC कडे दुर्लक्ष करू नका; नाहीतर भरावा लागेल दंड) मेंदूचा विकास होतो तज्ज्ञांच्या मते मेंदूच्या चांगल्या विकासासाठी खेळणं महत्वाचं आहे. याचा मुलांची बुद्धी, विचार करण्याची क्षमता यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो, मुलांना समाजामध्ये वावरण्याची सवय लागते, स्वतःच्या वागण्यावर ताबा ठेवण्याची क्षमता देखील वाढीला लागते.
  Published by:News18 Desk
  First published: