Home /News /lifestyle /

आता तरी ऐका! फ्रुट सॅलड अजिबात खाऊ नका; आधी ऋजुता दिवेकरचा हा Video पहा

आता तरी ऐका! फ्रुट सॅलड अजिबात खाऊ नका; आधी ऋजुता दिवेकरचा हा Video पहा

ऋजुता दिवेकर सांगतात की, अनेक फळं एकत्र खाऊ नयेत.

ऋजुता दिवेकर सांगतात की, अनेक फळं एकत्र खाऊ नयेत.

चुकीच्या पद्धतीने फळं खाणं किंवा चुकीच्या आहाराबरोबर फळं खाणं यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं.

  दिल्ली, 31 जुलै : फळं लोक आवडीने खातात. न्यूट्रिशन आणि व्हिटॅमिन्सचा (Nutrients & Vitamins)  स्त्रोत असलेली फळं चवीलाही छान लागतात. याशिवाय त्यामधील पाण्यामुळे शरीर हायट्रेट राहतं. फळांमध्ये मिनरल्स आणि फायबर (Minerals & Fibber)  असतात. त्यामुळे बद्धकोष्टतेची (Constipation) समस्या कमी होते. सिझनल फळं (Seasonal Fruit) खाल्ल्यामुळे शरीराला पुरेसे पोषक घटक मिळतात. फळांमुळे अन्नपचनालाही  (Digestion) मदत होते. (गणपतराव देशमुख यांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO VIRAL, तुम्ही पाहिलात का?) मात्र आपण जी फळं खातो त्यापासून आपल्याला पोषक घटक मिळणं अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने फळं खाणं किंवा चुकीच्या आहाराबरोबर फळं खाणं यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. अनेक फळं एकत्र खाल्ल्यामुळे खाल्ल्यामुळे शरीराला पचवणं कठीण (Difficult to digest) होऊन जातं. पचनव्यवस्थेवरही परिणाम (Effect on Digestion system) होतो. (नागपूरात मित्रानेच मित्राचा केला गेम; दगडानं ठेचून निर्घृण हत्या) त्यामुळेच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Celebrity Nutritionist Rujuta Divekar) यांनी फळं खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. ऋजुता दिवेकर नेहमीच त्यांच्या फॉलअर्सला आहार (Diet) आणि व्यायामा (Exercise)बद्दल सल्ले देत असतात. यावेळी त्यांनी फळं कशा प्रकारे खावीत याचा सल्ला इन्टस्टाग्रामवर रील्सवर (Instagram Reels) शेअर केली आहे. ऋजुता दिवेकर सांगतात की, अनेक फळं एकत्र खाऊ नयेत. त्यामुळे त्यातील पोषक घटक योग्य पद्धतीनी शरीरात पोहचत नाहीत शिवाय पचनाचेही त्रास होतात. (अजबच! चक्क कुत्रा चालवतोय सायकल; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक) त्यांच्यामते एकाच प्रकारचं फळं एकावेळी खावं. फळं नेहमी हाताने खावीत. त्याबरोबर सिजनेबल फळं खाण्याचा सल्ला त्या देतात. त्यांच्यामते फ्रिजमध्ये स्टोअर केलील फळ खाऊ नयेत.
  फळं खाण्याची योग्य पद्धत ऋजुता दिवेकर सांगतात फळं योग्य प्रकारे खाल्ली तर त्यामधून पोषक घटक चांगल्या प्रकारे मिळू शकतात. फळं रिकाम्या पोटी खावीत. दुपारच्या जेवणानंतर 3 ते 4 तासांनी म्हणजेच संध्याकाळी किंवा सकाळी उठल्यानंतर फळं खावीत. जेवणानंतर फळं खाल्ल्यास त्याचा चुकीचा परिणाम शरीरावरती होतो.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Health Tips, Instagram

  पुढील बातम्या