झोपेतून जागं होण्याची पद्धत बदलून तर बघा; उठल्याबरोबर हे काम कराल तर कायम फिट रहाल

स्ट्रेचिंग एक्सरसाईजमुळे शारीरिक वेदना आणि तणावातदेखील आराम मिळतो.

झोपेमधून जागं होताना अंथरुणात पडल्यापडल्याच काही एक्सरसाईज (wake up Exercise) जरूर करा.

  • Share this:
    दिल्ली,14 जून : झोपेत आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आणि स्नायू (Body & Mussels) रिलॅक्स झालेले असता मात्र, सकाळी उठल्यानंतर आपण दिवसभराच्या धावपळीत कामाला लागतो त्यामुळेच आपल्या स्नायूंवर अति दबाव (Excessive Pressure on Muscles) आणि ताण  येतो. याकरता बेडवरून खाली उतरण्याआधीच काही खासं एक्ससाइज (Exercise)  केल्या तर आपले स्नायू हळूहळू सक्रिय होऊन त्यांच्यावरचा ताण कमी होतो. झी न्युजने याबद्दल माहिती दिली आहे. याबरोबरच रक्त संचरण चांगल्या प्रकारे होऊन मेंदूला रक्त पुरवठा (Blood Circulation to Brain) सुरळीतपणे व्हायला लागल्यामुळे उत्साही वाटतं. या स्ट्रेचिंग एक्सरसाईजमुळे शारीरिक वेदना आणि तणावातदेखील आराम मिळतो. जाणून घेऊया स्ट्रेचिंग एक्सरसाईज. फिगर फोर स्ट्रेच याकरता बेड किंवा अंथरुणातच सरळ झोपा. आपला उजवा गुडघा दुमडून त्याची टाच नितंबीला टेकवा. त्यानंतर डावा पाय दुमडून उजव्या गुडघ्यावर ठेवा नंतर उजव्या हातने उजव्या पायाला पडा. आता वरच्या बाजून दुसऱ्या हाताने पडकडा.  दोन्ही हातांनी पाय मागे घेण्याचा प्रयत्न करा. पाय छातीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा श्वासोच्छवास करा. यामुळे कमरेवरचा ताण कमी होतो. नी-टू चेस्ट स्ट्रेच बेडवर झोपलेला असतानाच सरळ पाय ठेवून ताठ होण्याचा प्रयत्न करा. दोन्ही गुडघे एकमेकांना टेकून दुमडून छातीवर आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांनी दोन्ही गुडघे दाबून छातीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा श्वासोच्छवास करा. नंतर पाय सरळ करा. ही क्रिया सावकाश करायची आहे. यामुळे देखील कमरेवरचा ताण कमी होतो. (कोरोनामुक्त झाल्यानंतर मंदावलेली भूक, अ‍ॅसिडीटीकडे बिलकुल दुर्लक्ष नको कारण...) बेड टू फ्लोर स्ट्रेच बेडच्या कोपऱ्यावर बसून पाय जमिनीवर टेकवा. कमरेमध्ये वाकून आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवा. याच अवस्थेत 5 वेळा श्वासोच्छवास करा. यामुळे मेंदूला ऑक्सिजन पुरवठा चांगला होईल आणि त्यामुळे आपल्याला लगेचच उत्साही वाटायला लागेल. फुल बॉडी स्ट्रेच फुल बॉडी स्ट्रेच करण्यासाठी पाठीवर सरळ झोपा आणि शांतपणे श्वासोच्छवास करा. दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुंतवून हात छताकडे सरळ करा. हात वरच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करताना पाय देखील काढण्याचा प्रयत्न करा. पाच अंक मोजा आणि पूर्वस्थितीत अशाप्रकारे 3 वेळाना एक्सरसाईज करा. यामुळे संपूर्ण शरीरावरचा ताण कमी होईल. (आता Depression मधून बाहेर काढणार Laughing Gas; नैराश्येवर नवा उपचार) स्पाईन ट्विस्ट ज्यांच्या पाठीचा कणा कमजोर झालेला आहे. कणा कमकुवत झाल्यामुळे बॉडी पोश्चर देखील बदललं आहे. अशा लोकांसाठी ही एक्ससाईज अतिशय फायद्याची आहे.यासाठी दोन्ही गुडघे एकमेकांना जोडून उजव्या बाजूला न्या. उजव्या हाताने गुडघे उजव्या बाजुला दाबण्याचा प्रयत्न करा. याच वेळेस मान डाव्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा श्वासोच्छवास करा. विरुद्ध बाजूने देखील हीच क्रिया करा.
    Published by:News18 Desk
    First published: