• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • आता Depression मधून बाहेर काढणार Laughing Gas; नैराश्येवर नवा उपचार

आता Depression मधून बाहेर काढणार Laughing Gas; नैराश्येवर नवा उपचार

Depression and sadness

Depression and sadness

डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी लाफिंग गॅस (Laughing Gas) म्हणजे हर्ष वायू फायदेशीर ठरू शकतो, असं नव्या संशोधनातून सिद्ध झालं आहे.

  • Share this:
वॉशिंग्टन, 11 जून : मन प्रसन्न असेल की सगळं जग सुंदर दिसतं आणि मन उदास असेल तर जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. अनेकदा आयुष्यातलं अपयश, अपेक्षा पूर्ण न होणं यामुळे अनेक जण निराश होतात. याचं प्रमाण अधिक झालं तर डिप्रेशन  (Depression) म्हणजे नैराश्येसारखा गंभीर मानसिक आजारही बळावतो. यावर मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने उपचार केले जातात. पण यातून लवकर बाहेर पडणं  कठीण असतं. आता डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी लाफिंग गॅस (Laughing Gas) म्हणजे हर्ष वायू फायदेशीर ठरू शकतो, असं नव्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. आज तक ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. सामान्यपणे आपण हर्ष वायू नाकावाटे शरीरात गेला की माणूस काही काळ हसतच राहतो हे आपल्याला माहिती आहे पण आता हा वायू निराशेवर मात करायला मदत करणार आहे. नायट्रस ऑक्साइडला ( Nitrous Oxide) लाफिंग गॅस म्हटलं जातं. रुग्णाचा मूड सुधारण्यासाठी किंवा वेदना कमी जाणवाव्यात म्हणून हर्ष वायू आधीपासून रुग्णांनी दिला जातो. सामान्यपणे भूल देण्यासाठी डेंटिस्ट आणि काही डॉक्टर हर्ष वायूचा उपयोग करतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात निराशाग्रस्त रुग्णांना हर्ष वायूचा (Laughing Gas) छोटासा डोस देण्यात आला आणि दोन आठवड्यांनी त्या रुग्णांना नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी या डोसची खूप मदत झाली असं निरीक्षण शास्रज्ञांनी नोंदवलं. निराश व्यक्तीला हर्ष वायू दिल्यास तो एन-मिथाइल-डी-अस्पारेट (N-methyl-D-aspartate या NMDA) नर्व्हस सेलच्या मॉलिक्युल्सना ब्लॉक करतो. त्यामुळे निराशा कमी होते. किटामईन (ketamine) या औषधाचा मोठा डोस देऊन रुग्णाला बेशुद्ध केलं जातं ते किटामाइनही हेच काम करतं. निराश व्यक्तींना किटामाइन औषध म्हणूनही दिलं जातं. हे वाचा - अरे देवा! कोरोनानंतर आता Monkeypox; किती खतरनाक आहे हा व्हायरस पाहा न्यू सायन्टिंस्टच्या रिपोर्टनुसार अमेरिकेतील सेंट लुईसमध्ये असलेल्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनमधील भूलतज्ज्ञ पीटर नागेले आणि त्यांच्या टीमने 2014 मध्ये असा शोध लावला होता की श्वासावाटे लाफिंग गॅस शरीरात घेतला तर एक दिवसाहून अधिक काळासाठी डिप्रेशन कमी होतं. अँटिडिप्रेसंट औषधं घेणाऱ्यांसाठी हर्ष वायूची ट्रिटमेंट उपयोगी पडू शकते पण त्याचा परिणाम किती टिकतो हे स्पष्ट झालेलं नाही आणि हर्ष वायू जास्तकाळ श्वसनावाटे घेतला तर मळमळ आणि डोकेदुखीचा (Headache) त्रास होतो. त्यामुळेच ज्यांच्यावर सामान्य डिप्रेशन ट्रिटमेंटचा परिणाम होत नव्हता अशा 24 रुग्णांना पीटर आणि त्याच्या टीमने प्रयोगासाठी निवडलं. या 24 चे दोन गट करून पीटर यांनी एका गटाला हर्ष वायूचा अर्धा डोस आणि दुसऱ्या गटाला हवा आणि ऑक्सिजनचं मिश्रण याचा पूर्ण डोस दिला. या टीमना असाच डोस महिन्यातून एकदा असा तीन महिने दिला गेला. हर्ष वायू दिलेल्या पहिल्या गटातील रुग्णांमधील नैराश्य दोन आठवड्यांनी कमी झालं पण दुसऱ्या गटातील रुग्णांचं नैराश्य कमी होऊन परत वाढलं. त्यांच्यात डिप्रेशनचे साइड इफेक्ट्स पण दिसून आले. पहिल्या गटातील व्यक्तींना साइड इफेक्ट्स (Side effects) अजिबात जाणवले नाहीत. हे वाचा - माधुरी दीक्षितलाही आवरला नाही चहा-भजीचा मोह; खरंच योग्य आहे का हे कॉम्बिनेशन? पीटर म्हणाले, ‘किटामाईन आणि लाफिंग गॅस दोन्हीही माणसाचा मूड ठीक करू शकतात. पण ते कसं हे अद्याप लक्षात आलेलं नाही. NMDA रिसेप्टर्स कसं काय मूड बदलतात हे अजून कळालेलं नाही. किटामाईन हे चांगलं औषध आहे. पण हर्ष वायूने नैराश्य कमी होत हे स्पष्ट झालेलं नाही.’
Published by:Priya Lad
First published: