मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोनामुक्त झाल्यानंतर मंदावलेली भूक, अ‍ॅसिडीटीकडे बिलकुल दुर्लक्ष नको कारण...

कोरोनामुक्त झाल्यानंतर मंदावलेली भूक, अ‍ॅसिडीटीकडे बिलकुल दुर्लक्ष नको कारण...

Acidity

Acidity

एका अभ्यासानुसार, कोरोनामुक्त झाल्यावर रुग्णांमध्ये जवळपास 3 महिने अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात.

मुंबई, 11 जून : देशातील कोरोनाच्या (Coronavirus) प्राणघातक दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्याचे दृष्टीक्षेपात येत आहे. मात्र कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये सातत्याने आणि दीर्घकाळ लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी याला लाँग कोविड (Long Covid) म्हटलं आहे. लाँग कोविडमध्ये अनेक लक्षणे दिसून येऊ शकतात. त्यापैकी एक म्हणजे एखादा आजार होऊन गेल्यानंतर जठर आणि आतड्यांवर (gastrointestinal) परिणाम होतो. यामुळे भूक न लागणे, मळमळ, अ‍ॅसिडीटी आणि जुलाब अशा प्रकारच्या समस्या उदभवतात. एका अभ्यासानुसार, कोरोनामुक्त झाल्यावर आणि कोरोना टेस्ट निगेटिव्ह (Negative) आल्यानंतरही रुग्णांमध्ये जवळपास 3 महिने अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात.

न्यूज 18 ने डिकोडिंग लाँग कोविड अंतर्गत लाँग कोविडबाबत विविध तज्ज्ञांकडून माहिती घेतली आहे. त्यापैकीच एक आहेत, मनिपालमधील एचसीएमसीचे विभाग प्रमुख, कन्सल्टंट आणि गॅस्ट्रोइंडोलॉजिस्ट डॉ. कुणाल दास. कोरोनामुळे जठर किंवा आतड्यातील अ‍ॅसिडवर होणारा परिणाम आणि भूक कमी लागण्याची कारणं याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

डॉ. दास यांनी सांगितलं की, कोविड -19 हा प्राथमिक श्वसनप्रणालीपासून शरीरातील प्रत्येक अवयवांवर परिणाम करतो. गॅस्ट्रोइन्टेस्टाईनल लक्षणं जवळपास 60 टक्के रुग्णांमध्ये दिसून येतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बहुतेक कोविड रुग्णांमध्ये स्टोमॅक फ्लू (Stomach Flu) सदृश्य म्हणजेच मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि अतिसारासारखी लक्षणं आढळून आली.

हे वाचा - हुश्श! 'वाईट काळ संपला'; कोरोनाबाबत केंद्र सरकारने दिली पॉझिटिव्ह न्यूज

मे 2021 मध्ये लॅन्सेट गॅस्ट्रो हेपॅटोल या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासनुसार डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांपैकी 44 टक्के रुग्णांमध्ये जठर आणि आतड्यांवर गंभीर परिणाम झाला असल्याकडे दास यांनी लक्ष वेधलं. असे रुग्ण रुग्णालयात दाखल होतेवेळी किंवा कोरोनाची लक्षणं दिसण्यापूर्वी एक महिना अगोदर नाही तर  डिस्चार्ज दिल्यानंतर दिसून आलीत, असं डॉ. दास यांनी सांगितलं.

लॅन्सेटच्या अहवालानुसार अशी गॅस्ट्रोइंटेस्टाईनल स्थिती हायपोक्सियामुळे (Hypoxia) उद्भवू शकते. हायपोक्सिया म्हणजे ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे शरीराच्या एका भागावर परिणाम होऊन निर्माण होणारी स्थिती होय. रक्तातील ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होणं ही लक्षणं गंभीर न्युमोनिया आणि गॅस्ट्रोइंटेस्टाईनल सिक्लिलीशी (GI sequelae) संबंधित आहेत.

हे वाचा - पुढच्या आठवड्यात तुमचा जिल्हा अनलॉक होणार का? पाहा काय आहे सध्याची परिस्थिती

अभ्यासात असं म्हटलं आहे की हायपोक्सिया हा केवळ कोरोनामुळे तसंच डिस्प्नोआमुळे (Dyspnoea) होतो असं नाही. तर डिस्पोआ झाला नसेल तरी हायपोक्सिया होतो. डिस्प्नोआ ही श्वासासंबंधी एक वैद्यकीय संज्ञा आहे. जीआय सिक्वेलीची ओटीपोटात दुखणं, ढेकर देणं, उलट्या होणं अशी अल्प प्रमाणातही लक्षणं दिसून येतात. काही रुग्णांमध्ये शौचावाटे रक्त पडण्याचीही समस्या दिसून येते. अशा प्रकारची लक्षणं पोस्ट रिकव्हरी दरम्यान दिसल्यास रुग्णांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

First published:

Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Coronavirus symptoms, Covid-19