Home /News /lifestyle /

प्रेग्नेन्सीत निष्काळजीपणा नको; व्यंग असलेलं बाळ येईल जन्माला

प्रेग्नेन्सीत निष्काळजीपणा नको; व्यंग असलेलं बाळ येईल जन्माला

या काळामध्ये महिलांना अनेक प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतात. यापैकीच एक आहे ‘टॉर्च इन्फेक्शन’. या इन्फेक्शनमुळे गर्भावर गंभीर परिणाम होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या 5 आजारांना टॉर्च इन्फेक्शन म्हटलं जातं. याचे परिणाम इतके वाईट असतात की, बाळामध्ये व्यंगही येऊ शकतं.

या काळामध्ये महिलांना अनेक प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतात. यापैकीच एक आहे ‘टॉर्च इन्फेक्शन’. या इन्फेक्शनमुळे गर्भावर गंभीर परिणाम होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या 5 आजारांना टॉर्च इन्फेक्शन म्हटलं जातं. याचे परिणाम इतके वाईट असतात की, बाळामध्ये व्यंगही येऊ शकतं.

गर्भधारणेच्या काळात ही डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट करायला हव्यात. दुर्लक्ष केलं तर व्यंग असलेलं बाळ जन्माला (Birth of Deformed Baby) येऊ शकतं.

    नवी दिल्ली, 31 जुलै: बदललेली लाईफस्टाईल, आहारात बदल आणि सतत करिअरच्या मागे धावणारी पिढी यामुळेच प्रेग्नेन्सीमध्ये येणाऱ्या अडचणी (Difficulty in Pregnancy) वाढलेल्या आहेत. पुरुष आणि महिला दोघांमध्येही फर्टिलिटी रेट (Fertility Rate) कमी व्हायला लागलेला आहे. गर्भधारणा झाली तरी पूर्ण नऊ महिने बाळाची वाढ होऊन निरोगी बाळ (Healthy Baby) जन्माला येईपर्यंत या काळातही होणाऱ्या पालकांच्या मनावरचा ताण (Stress) कमी होत नाही. बऱ्याच वेळा करिअर करण्याच्या नादात फॅमिली प्लॅनिंग (Family Planning) केलं जातं आणि त्यामुळे वय वाढत राहतं. वाढत्या वयामुळे उशिरा गर्भधारणा झाली तरीदेखील त्याचे परिणाम बाळावरती (Effect on Baby) होऊ शकतात. नऊ महिन्याचा काळ पूर्ण करून निरोगी बाळ जन्माला यावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. मात्र, बाळाचा विचार करताना पुरुष आणि महिलांच्या काही टेस्ट करणं आवश्यक असतं. याशिवाय गर्भधारणेच्या काळात ही डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट करायला हव्यात. दुर्लक्ष केलं तर व्यंग असलेलं बाळ जन्माला (Birth of Deformed Babyयेऊ शकतं. गर्भधारणा झाल्यानंतर सुरुवातीला चक्कर येणं, उलट्या होणं, मळमळ होणं, पोटात दुखणं असे त्रास व्हायला लागतात. त्यानंतर डॉक्टरांच्या औषधाने हे त्रास कमी देखील होतात. गर्भधारणेच्या काळात डॉक्टर काही महत्त्वाच्या टेस्ट करायला सांगतात. या टेस्टकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. (चेहऱ्यावर निळे डाग येणं म्हणजे धोक्याची घंटा; दुर्लक्ष करू नका) थायरॉईड टेस्ट शुगर टेस्ट हिमोग्लोबिन टेस्ट यूरिन टेस्ट HIV टेस्ट हेपेटाइटिस बी, हेपेटाइटिस सी टेस्ट या टेस्ट त्यात्यावेळी करून घ्याव्यात. याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सोनोग्राफी करून घ्यावी. बाळ 6 ते 8 आठवड्यांचं झाल्यानंतर म्हणजेच पहिल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये सोनोग्राफी केली जाते. यामुळे गर्भधारणा झाल्याचं निश्चित करता येतं. (करा तुमच्या Fitness Journey ला सुरुवात, या सवयी सोडलात तर राहाल तंदुरुस्त) त्यानंतर बाळ 11 ते 14 आठवड्यांचं झाल्यानंतर म्हणजेच 3 ते 4 महिन्यानंतर दुसरी सोनोग्राफी केली जाते. यामुळे बाळामध्ये काही व्यंग आहे का? किंवा कोणता आजार आहे का? हे तपासलं जातं. तिसरी सोनोग्राफी बाळ 18 ते 22 आठवड्यांचं झाल्यावर 4 किंवा 5 महिन्यात केली जाते. यामध्ये बाळाचे डोकं पाठ, पोट, हृदय, हात, पाय, चेहरा यांची व्यवस्थित पाहणी केली जाते. (सोडून द्यायाल शिका! अन्यथा अपराधीपणाची भावना संपवेल तुमचा आत्मविश्वास) चौथी आणि शेवटची सोनोग्राफी बाळ 21 ते 32 आठवड्यांचं झाल्यानंतर 7 ते 8 महिन्यामध्ये केली जाते. यालाच ‘ग्रोथ स्कॅन’ असंही म्हणतात. यामध्ये बाळाची पूर्ण वाढ, गर्भ जलाची पातळी, बाळाचं वजन किंवा कोणतंही व्यंग आहे का? हे तपासलं जातं. या सोनोग्राफी डॉक्टरांच्या सल्ल्याने करूनच घ्यायला हव्यात. (एका चिठ्ठीने उलगडलं 'बाथरूम सिक्रेट'; वाचूनच महिलेला फुटला घाम) फॅमिली प्लॅनिंग करताना करावी टेस्ट खुप वेळा करिअरच्या नादामध्ये बाळ उशिरा जन्माला घालण्याचा निर्णय घेतला जातो. गर्भधारणा होऊ नये याकरता विविध प्रकारचे उपाय केले जातात. मात्र, डॉक्टरांच्या मते फॅमिली प्लॅनिंग करताना पुरुष आणि महिलेने आपली टेस्ट करून घ्यायला हवी. जास्त काळ फॅमिली प्लॅनिंग केल्यामुळे महिलेच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि गर्भधारणेत देखील अडचणी होऊ शकतात. (अस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री) याशिवाय फॅमिली प्लॅनिंग करून नंतर बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या दुष्परिणामांमुळे बाळामध्ये व्यंग येऊ शकतं. गर्भधारणा झाल्यानंतर महिलेला काही त्रास असतील तर, त्याचा परिणाम बाळाच्या विकासावर होतो. त्यामुळेच फॅमिली प्लॅनिंग करण्याआधी टेस्ट करून प्रेग्नेंसीमध्ये होणाऱ्या अडचणी टाळाव्यात असा सल्ला डॉक्टर देतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Pregnancy, Pregnent women

    पुढील बातम्या