Home /News /lifestyle /

करा तुमच्या Fitness Journey ला सुरुवात, या सवयी सोडलात तर राहाल तंदुरुस्त

करा तुमच्या Fitness Journey ला सुरुवात, या सवयी सोडलात तर राहाल तंदुरुस्त

Fitness Tips: यापैकी काही सवयी तुम्ही सोडल्या आणि काही लावून घेतल्या तर तुम्ही नक्की तंदुरुस्त राहू शकाल.

मुंबई, 27 जुलै: आरोग्य चागलं राखणं (Fitness) ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. कोरोना महामारीमुळे तर तंदुरुस्त राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आता सगळेच जण चांगल्या आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत. पण आपल्याला काही सवयी (Habits) असतात ज्यामुळे नकळतच आपलं आरोग्य बिघडण्यास हातभार लावला जातो. त्यामुळे जर आपण अशा सवयी सोडल्या तरीही तंदुरुस्त राहण्याच्या दृष्टीनं मोठं पाऊल टाकल्यासारखं होतं. आम्ही अशाच काही सवयींबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. काही जणांचा आहार फार नसतो पण त्यांचं वजन वेगानी वाढतं आणि कमी होतच नाही. अशा व्यक्तींनी हे लक्षात घ्यायला हवं की फक्त आहारामुळे वजन वाढतं असं नसून काही सवयीही (Bad Habits) त्रासदायक ठरतात. जर तुम्हाला खरंच तंदुरुस्त रहायचं असेल तर या सवयी तुम्ही सोडल्याच पाहिजेत. उपाशी राहू नका अनेकांना वाटतं की भरपूर आहार घेतल्यामुळेच वजन वाढतं पण तसं नाही आहे. तुम्ही बराच वेळ उपाशी राहिलात तरीही तुमचं वजन वाढू शकतं. त्यामुळे शरीर आतून कमकुवतही होतं. त्यामुळे डाएट भाग म्हणून किंवा सवय म्हणून अधिक काळ उपाशी राहू नका. जास्त खाऊ नका तसंच जास्त काळ उपाशीही राहू नका. त्यामुळे दिवसभरात थोड्या-थोड्या वेळाने फळं (Fruits), सॅलड, ज्युस किंवा काही स्नॅक्स खात रहा. हे वाचा-लय भारी! फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार आळसात लोळत पडू नका आरोग्यवान व्हायचं असेल तर झोप या घटकाकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. झोप प्रत्येकालाच आवडते. पण तंदुरुस्त राहण्यासाठी 8 तासांची झोप पुरेशी असते. पण रोज पलंगावर आळसात लोळत पडण्याची सवयही तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे स्थूलपणा (Obesity) वाढेल आणि इतर आजारही होतील. त्यामुळे विनाकारळ लोळत पडण्याची किंवा झोपण्याची सवय सोडून द्या. बेड टी टाळा अनेकांना सकाळी उठल्याउठल्या पलंगावरच चहा प्यायची सवय असते. सकाळी सकाळी चहा प्यायल्याने पोटात गॅस आणि असिडिटीचा (Gas & Acidity) त्रास होतो. रिकाम्यापोटी शरीरात साखर गेल्याने वजन वाढतं. त्यामुळे बेड टीला नको म्हणा. त्याला पर्याय म्हणून सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याची सवय लावून घ्या. रोज सकाळी उपाशीपोटी एक ते 4 ग्लास पाणी प्यायला हवं ही चांगली सवय आहे. व्यायामाची सवय हवी शरीरातील कॅलरी बर्न करायच्या असतील तर व्यायाम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीत असतं पण आपण व्यायाम करायची टाळाटाळ करतो. पण सध्याच्या वर्क फ्रॉम होम (Work From Home) जीवनशैलीत व्यायाम केला नाही तर पाठीचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्यामुळे रोज सकाळी उठून व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. हे वाचा-घरात लावा ही रोपं! आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा रात्री करा शतपावली रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करा असं आपल्या घरातील मोठी मंडळी सांगत असतात पण आपण जेवणानंतर लगेच झोपतो किंवा वेळ वाया घालवतो. पण या व्यायामामुळे तुमचं पचन सुरळीत व्हायला मदत होते. त्यामुळे रोज रात्रीच्या जेवणानंतर न चुकता शतपावली करायची सवय लावून घ्या. यापैकी काही सवयी तुम्ही सोडल्या आणि काही लावून घेतल्या तर तुम्ही तंदुरुस्त राहू शकाल.
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या