मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /एका चिठ्ठीने उलगडलं 'बाथरूम सिक्रेट'; वाचूनच महिलेला फुटला घाम

एका चिठ्ठीने उलगडलं 'बाथरूम सिक्रेट'; वाचूनच महिलेला फुटला घाम

महिलेच्या हाती तिच्या बाथरूमबाबत चिठ्ठी लागली आणि...

महिलेच्या हाती तिच्या बाथरूमबाबत चिठ्ठी लागली आणि...

महिलेच्या हाती तिच्या बाथरूमबाबत चिठ्ठी लागली आणि...

ब्रिटन, 26 जुलै :  आपल्या घरात सर्वात खासगी जागा कोणती असेल तर ते म्हणजे बाथरूम (Bathroom). ही एकमेव अशी जागा आहे, जिथं आपल्याशिवाय दुसरं कुणीच नसतं आणि तिथं फक्त आपणच असावं आणि आपल्याला दुसरं कुणी पाहू नये, असंच वाटतं. त्यामुळे बाथरूमची रचनाही तशीच असते. पण एका महिलेला याच बाथरूमबाबत (Bathroom window). असा राज समजला, ज्यामुळे ती हडबडलीच. हा राजसुद्धा तिला कुणी प्रत्यक्षात सांगितला नाही तर एका चिठ्ठीने उलगडा झाला.

इंग्लंडच्या ग्रेटर मॅनचेस्टरमधील ही घटना.  26 वर्षांची सारा येट्स. तिच्या घरातील बाथरूमबाबत (Letter about bathroom window) एक मोठा राज समजला. तिच्या घरातील बाथरूमबाबत तिच्या हाती एक चिठ्ठी लागली (Note about bathroom window). ही चिठ्ठी वाचून ती हडबडलीच.

हे वाचा - अंडे का हा असा कसा फंडा? फोडताच महिलेला बसला जबर धक्का

तुमच्या बाथरूममध्ये काहीतरी लावण्याची गरज आहे. तुमच्या बाथरूममधून सर्वकाही दिसतं (See everything from Bathroom window), असं या चिठ्ठीत सांगण्यात आलं होतं.  दरवाजा ठोकवून तुम्हाला अस्वस्थ वाटू द्यायचं नव्हतं असं नमूद करत यात धन्यवाद, असंही म्हटलं होतं. या चिठ्ठीवर कुणाचंही नाव नव्हतं. एका अज्ञाताकडून ही चिठ्ठी मिळाली होती.

हे वाचा - OMG! फिरत्या पंख्यात महिलेने आपली जीभ टाकली आणि...; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

रिपोर्टनुसार सारा सुट्टीवर होती. तेव्हा तिच्यासोबत या घरात राहगणाऱ्या तिच्या चुलत बहिणीला दरवाजातील लेटरबॉक्समध्ये ही चिठ्ठी मिळाली. तिने या चिठ्ठीचा फोटो साराला पाठवला.  साराच्या घराच्या मागच्या बाजूला राहणाऱ्या कुणीतरी सारा आणि तिच्यासोबत राहणाऱ्यांना मोठ्या संकटापासून वाचवण्याचा प्रयत्न केला.

First published:

Tags: Bathroom, Britain, England, Uk, World news