नवी दिल्ली, 25 जुलै : कधीकधी अचानक शरीरावर निळे डाग दिसायला लागतात. काही दिवसांनी ते गायबही होतात. मुका मार लागला तर, रक्त गोठल्यामुळे(Blood Clots)असे डाग पडतात मात्र, कोणताही त्रास होत नसताना असे डाग येत अतील तर, सायनॉसिस (Cyanosis) सारखा असू शकतो. ऑक्सिजन कमी (Oxygen Level) असलेल्या रक्ताचा रंग निळा होतो आणि जेव्हा हे रक्त त्वचेमध्ये प्रवेश करतं तेव्हा ते फुफ्फुस,हृदय आणि रक्ताभिसरणांसंबंधित (Blood Circulation) रोगाचं कारण बनतं.
सायनॉसिस झाला असेल तर, अशा डांगांबरोबर ऑक्सिजनची कमी असल्याने बेशुद्ध (Unconscious) होऊन लवकर शुद्ध न येणं असाही त्रास होतो. इतकंच नाही तर त्यावर वेळेत उपचार न केल्यास ते तब्बल,ब्रेन स्टेम रिफ्लेक्स किंवा व्यक्ती ब्रेन डेडदेखील होऊ शकते. खरंतर, सायनॉसिस हा शरीरातील काही त्रांसांचं लक्षण असतो. सायनॉसिस वेगवेगळे प्रकार असतात.
पेरिफेरल सायनॉसिस- यात आपल्या बाह्य भागात पुरेसा ऑक्सिजन रक्त प्रवाह कमी असल्याने किंवा काही लागल्यामुळे होऊ शकतो.
सेंट्रल सायनोसिस - ज्यात आपल्या शरीरात ऑक्सिजन कमी असतं कमी ब्लड प्रोटीन किंवा कमी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होतं.
(सावधान!पावसाळ्यात मासिक पाळीच्या काळात होऊ शकतं इनफेक्शन; अशा प्रकारे घ्या काळजी)
मिक्स्ड सायनॉसिस - हे पेरीफेरल आणि सेन्ट्रल सायनॉसिसमुळे दोन्हींची लक्षणं एकत्र दिसायला लागतात.
एक्रोसायनॉसिस - यात शरीर खुप थंड होतं आणि आपले हात व पायांच्या सभोवताल निळ्या रंगाचा डाग दिसतात यात शरीराला तात्काळ उष्णतेची गरज असते.
सायनॉसिसची कारणं
बऱ्याच काळापासून श्वसनासंबंधी आजार असेल, दमा किंवा सीओपीडी सारखा त्रास होत असेल किंवा न्युमोनिया झाला तर, लगेच लक्ष द्या.
(पावसाळ्यात मुलांना निरोगी ठेवायचंय? तर करून पाहा या 4 सोप्या गोष्टी)
गंभीर स्वरूपाचा अॅनीमिया झाल्याना रेड ब्लड सेल्स कमी होतात.
काही वेगळ्या प्रकारच्या औषधांचा अधिक वापर.
सायनाईड सारख्या विषाच्या संपर्कात आल्याने.
रेनॉड्स सिंड्रोम म्हणजे बोटांच्या पंजाचा रक्तप्रवाह आकुंचन पावला असेल तर.हायपोथर्मिया मुळे शरीराचं तापमान अत्यंत कमी झाल्यास.
(कच्चं दूध आरोग्यासाठी घातक; दुष्परिणामांमुळे होतील पोटाचे विकार)
लगेच करा उपाय
लगेचच डॉक्टरांना संपर्क करा. त्यामुले तात्काळ इलाज होईल.
डॉक्टर चाचण्यांच्या आधारे सायनॉसिसचे उपचार करतील. यासाठी एक्स-रे,सीटी स्कॅन,ईसीजी यासारख्या इमॅजिंग स्कॅनद्वारे आपलं हृदय किंवा फुफ्फुसांचं परीक्षण करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle