Home /News /lifestyle /

अस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री

अस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री

व्हॅनिलाच्या सुगंधाने वार्म आणि रिलॅक्स वाटू लागतं.

व्हॅनिलाच्या सुगंधाने वार्म आणि रिलॅक्स वाटू लागतं.

खुश राहण्यासाठी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी परफ्युमचा (Perfume) वापर करू शकता. डेटवर जातांना व्हॅनिला परफ्युम वापरा.

    नवी दिल्ली, 27 जुलै : आपण आनंदी राहण्यासाठी आणि स्ट्रेस फ्री (Stress Free) जगण्यासाठी काय काय करत नाही. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ घालवतो. मित्रांबरोबर फिरायला जातो, एखाद्या सिनेमा पाहतो किंवा चांगली गाणी ऐकतो. पण, सध्या कोरोनामुळे (Corona) आपल्याला घरातच रहावं लागतं. त्यामुळे मनावर ताण (Stress) वाढलेला आहे. त्यामुळे चिडचिडेपणा वाढतो (Increases Irritability)आहे, घरात भांडणं वाढली आहेत. त्यामुळे मूड (Mood) चांगला करायचा असेल तर, परफ्युमचाही (Perfume)वापर शकतो.संशोधनानुसार (Research) असं दिसून आलं आहे की, सुगंध आपली मनःस्थिती बदलू शकतो आणि आपल्याला चांगलं वाटतं. याने आपल्या भावनांवर देखील परिणाम होतो आणि आपण दिवसभर फ्रेश राऊ शकतो. तर, जाणून घेऊया कोणत्या परफ्युमच्या मदतीने आपण आपला मूड चांगला करू शकतो. व्हॅनिलाचा फ्रेग्रन्स व्हॅनिलाच्या सुगंधाने वार्म आणि रिलॅक्स वाटू लागतं. या सुगंधात थोडासा गोडवा आहे. ज्यामुळे मूड प्रसन्न होतो. डेटवर जातांनाही व्हॅनिला परफ्युम वापरू शकता. (दहावीत केवळ 44% मिळवणारे अविनाश शरण; मेहनतीने झाले IAS ऑफिसर) बर्गामॉट फ्रेग्रन्स उदास वाट असेल आणि थकवा जाणवत असेल तर, बेर्गमॉट आपल्याला फ्रेश करण्यात मदत करू शकतं. याचं झाड संत्र्याच्या प्रजातीचं आणि छोटसं असतं. हिवाळ्यात या झाडावर फळं येतात. ही फळं खुप आंबट आणि कडवट असतात. पण, याचा सुगंध अतिशय गोड आहे. त्यामुळे आपल्याला स्पार्किंग आणि फ्रेश फिल येतो. (घरात लावा ही रोपं! आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा) चंदन फ्रेग्रन्स याचा सुगंध वुडी, मिल्की आणि अतिशय आल्दाददायक असतो. यामुळे लगेच रिलॅक्स वाटते. मेडिटेशन करताना याचा वापर करतात.यामुळे लक्ष केंद्रीत करण्यात मदत होते. (मायग्रेनचा त्रास घालवण्यासाठी करा ‘ही’ योगमुद्रा; कोणत्याही वेळी करू शकता ध्यान) व्हाइट मस्क फ्रेश फिलिंगसाठी व्हाइट मस्कच्या सिंथेटिक व्हर्जनचा वापर करता येतो. याचा सुगंध खुप लाईट असतो. एन्झायटीचा त्रास असलेल्यांनी हा परफ्यूम वापरावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या