जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पावसाळ्यात वाढत्या वजनाची चिंता नको; आहार नियंत्रित करण्यासाठी ’या’ आहेत जबरदस्त Tips

पावसाळ्यात वाढत्या वजनाची चिंता नको; आहार नियंत्रित करण्यासाठी ’या’ आहेत जबरदस्त Tips

पावसाळ्यात नेहमी रात्रीचं जेवण हलकचं घ्यावं. रात्रीच्या जेवणामध्ये आपण सूप,मूगाची डाळ,विविध भाज्यांचा समावेश करू शकता. तांदळाऐवजी ब्राउन राईस किंवा ओट्स खा. पावसात,रात्रीचं जेवण जास्त उशीर घेऊ नका. जेवण जेवढं उशीर घ्याल तितकचं पोट बाहेर येईल.

पावसाळ्यात नेहमी रात्रीचं जेवण हलकचं घ्यावं. रात्रीच्या जेवणामध्ये आपण सूप,मूगाची डाळ,विविध भाज्यांचा समावेश करू शकता. तांदळाऐवजी ब्राउन राईस किंवा ओट्स खा. पावसात,रात्रीचं जेवण जास्त उशीर घेऊ नका. जेवण जेवढं उशीर घ्याल तितकचं पोट बाहेर येईल.

पावसाळ्यात तुमचंही वजनही वाढत असेल तर,काही टिप्स वापरुन आपण आपलं वजन नियंत्रित आणू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 22 जुलै : आता पावासळ्याचं (Monsoon) खऱ्या अर्थाने आगमन झालं आहे. वाढता पाऊस आणि कोरोनामुळे बहुतेक लोक घरूनच काम करत (Work From Home) आहेत. घरी असताना पाऊस आला तर, त्याचा आनंद लुटण्यासाठी चहाबरोबर गरमागरम भजी आणि वडे किंवा समोस्यांचा फर्माईश होतेच. याशिवाय प्रत्येक घरात चटपटीत स्नॅक्स (Snacks) बनतच असता. हे पदार्थ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी चांगले असेल तरी त्याने  वजनही वाढायला लागतं.पावसाळ्यात वाढत वजन (Weight Gain) पाहून टेन्शन येतं. पण, वाढवण्याऐवजी आपण वजन कमी((Weight Loss)) करायचं असेल या टिप्स वापरा. सकाळी घ्या ग्रीन टी वजन नियंत्रणात आणण्यासाठी पावसाळ्यामध्ये दुधाच्या चहाऐवजी सकाळी ग्रीन टी किंवा लेमन टी घेण्याची सवय लावा. यामुळे मेटाबॉलिजम सुधारेल आणि आपलं वजन कमी व्हायला मदत होईल. याशिवाय कमी कॅलरी असलेल्या कुकीजही घेऊ शकता. ( आठवड्यातून केवळ तीन दिवस 40 मिनिटं वेगात चाला, होईल स्मरणशक्तीत वाढ ) असा असावा नाश्ता सकाळचा नाश्ता हेल्दी असावा पण, जास्त कॅलरींनी भरलेला नसावा. सकाळी कमी लो फॅट दूध घ्या आणि त्याबरोबर मोड आलेली कडधान्य खा. कडधान्य वाफवूही खाऊ शकता. ( फक्त ‘या’ 6 सवयी टाळा; त्वचेवर येईल इतका Glow की विश्वास बसणार नाही ) सीजनल फूड खा पावसाळ्यात सीजनल फूड खावं. पण, तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा भाज्या वाफवलेले किंवा कोशिंबीर बनवून खा किंवा जेवण बनवाताना कमी तेल वापरा करा. रात्री हल****का आहार घ्या पावसाळ्यात नेहमी रात्रीचं जेवण हलकचं घ्यावं. रात्रीच्या जेवणामध्ये आपण सूप,मूगाची डाळ,विविध भाज्यांचा समावेश करू शकता. तांदळाऐवजी ब्राउन राईस किंवा ओट्स खा. पावसात,रात्रीचं जेवण जास्त उशीर घेऊ नका. जेवण जेवढं उशीर घ्याल तितकचं पोट बाहेर येईल. ( ‘हा’ सुका मेवा दररोज खा; स्मरणशक्‍ती बरोबर वजनही वाढेल वेगाने ) लसूण खावा सकाळी उठून दररोज 1 लसूण पाकळी खाण्याची सवय लावा. लसूण खाऊन कोमट पाणी प्यायल्यास वजन वाढणार नाही. बदाम खा  सकाळी रिकाम्यापोटी भिजवलेले बदाम खाल्ले तर, शरीर निरोगी रहील आणि वजन वाढणार नाही. भिजवलेले बदाम खाल्ल्याने चरबी वाढवत नाहीत आणि आरोग्यही चांगलं राहतं. ( OMG! 15000 रुपयांना फक्त एक प्लेट फ्रेंच फ्राइज; इतकं त्यात आहे तरी काय? ) केळं खा कधीही भूक लागल्याने फास्ट फूड खायची इच्छा झाली तर, केळी खा. केळ्यामध्ये असलेले पदार्थ फास्ट फूडची क्रेविंग कमी करतात. याशिवाय पावसाळ्यात येणारी सगळी फळं खा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात