Home /News /lifestyle /

‘हा’ सुका मेवा दररोज खा; स्मरणशक्‍ती बरोबर वजनही वाढेल वेगाने

‘हा’ सुका मेवा दररोज खा; स्मरणशक्‍ती बरोबर वजनही वाढेल वेगाने

अनुवंशिकतेमुळे देखील आपली तब्येत जास्त वाढते किंवा खुप कमी होते.

अनुवंशिकतेमुळे देखील आपली तब्येत जास्त वाढते किंवा खुप कमी होते.

चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार (Diet for Health) महत्त्वाचा आहे. बरेच लोक आपल्या आहाराकडे लक्ष देत नाहीत. संतुलित आहार नसेल तर तब्येत कमी होऊन अशक्तपणा येतो.

    नवी दिल्ली, 20 जुलै :  आरोग्य तज्ज्ञांच्यामते (Health Expert) असंतुलित आहार ज्याप्रमाणे लठ्ठपणा (Obesity) वाढवतो त्याचप्रमाणे बारीकही करतो. खुप कमी तब्येत असेल तर, विकनेस (Weakness)येतो. जसं लठ्ठ असल्याने आवडते कपडे घालता येत नाहीत. तसंच बारीक तब्येतीच्या लोकांनाही आवडते ड्रेस वापरता येत नाहीत. शिवाय आपली व्यक्तीमत्वारही (Personally) परिणाम होतो. आत्मविश्वस (Confidence) कमी होतो. असंतुलित आहाराबरोबर अनुवंशिकतेमुळे देखील आपली तब्येत जास्त वाढते किंवा खुप कमी होते. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जेवढे प्रयत्न केले जाताता तेवढेच प्रयत्न वजन वाढवण्यासाठीही (Weight Gain) करावे लागतात. मात्र, एका सोप्या उपायामुळे (Easy Remedies) कमी प्रयासात वजन वाढवता येतं. वजन कमी असण्याची समस्या असेल तर, दररोज अक्रोड खायला सुरुवात करा. अनेक संशोधनानुसार (Research) अक्रोड खाण्यामुळे वजन वाढतं असं समोर आलं आहे. रिसर्च गेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार अक्रोड खाण्यामुळे स्मरणशक्‍ती बरोबर वजनही वाढतं असा दावा करण्यात आलेला आहे. या संशोधनासाठी काही माणसांवर अक्रोड खाण्याचा प्रयोग करण्यात आला. संशोधनात सहभागी झालेल्या माणसांना सहा महिने दररोज 35 अक्रोड खाण्यास सांगण्यात आलं. 6 महिन्यांनी त्यांचं वजन 3 किलोने वाढल्याचं लक्षात आलं. त्यामुळेच सडपातळ माणसांनी दररोज अक्रोड खाल्ले तर, त्यांचं वजन वाढतं असा दावा या संशोधकांनी केला आहे. वजन वाढण्यासाठी या पद्धतीने खा आक्रोड रोज रात्री 2 ते 3 अक्रोड पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खा.  दररोज याच प्रमाणामध्ये अक्रोड खाणं आवश्यक आहे. याशिवाय डायबिटीस रुग्णांना देखील अक्रोड खाण्याचा फायदा होतो. अक्रोडची स्मुदी बनवता येते किंवा सॅलडमध्ये देखील अक्रोडचा वापर करता येऊ शकतो. सोपा उपाय याशिवाय वजन वाढवण्यासाठी जेवणाआधी तूप साखर खाण्याने देखील फायदा होतो. दररोज दुपारी आणि रात्री जेवणाच्या अर्धा तासआधी 1 चमचा तूप साखर खावी. यामुळे वजन वाढेल याशिवाय दूध आणि केळ खाल्याने देखील फायदा होतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या