Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

OMG! 15000 रुपयांना फक्त एक प्लेट French fries; या फ्रेंच फ्राइजमध्ये इतकं आहे तरी काय?

OMG! 15000 रुपयांना फक्त एक प्लेट French fries; या फ्रेंच फ्राइजमध्ये इतकं आहे तरी काय?

World's most expensive french fries : इतक्या महागड्या फ्रेंच फ्राइजचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही झाला आहे.

World's most expensive french fries : इतक्या महागड्या फ्रेंच फ्राइजचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही झाला आहे.

World's most expensive french fries : इतक्या महागड्या फ्रेंच फ्राइजचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही झाला आहे.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 20 जुलै : फ्रेंच फ्राइज (French fries) खायला आवडत नाही अशी व्यक्तीच जगात दुर्मिळच असेल. प्रत्येकाला फ्रेंच फ्राइज आवडतं. फार फार तर फ्रेंज फ्राइज किती रुपयांपर्यंत मिळेल 100 रुपये, 200 रुपये. असं काही शेच्याच पटीत. तर नाही अगदी हजारो रुपयांनाही फ्रेंज फ्राइज विकलं जातं आहे आणि जगातील सर्वात महागडे फ्रेंच फ्राइज (World's most expensive french fries) तर तब्बल 15000 रुपयांना मिळत आहेत (French fries for Rs. 15000). काय किंमत वाचूनच चक्कर आली ना?

15000 रुपयांना फ्रेंच फ्राइझ. जगातील सर्वात महाग फ्रेंज फ्राइजची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद (Guinness world records) झाली आहे. आता हे फ्रेंच फ्राइझ इतकं महाग का? यात इतकं काय खास आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतकं महाग फ्रेंच फ्राइज मिळतं तरी कुठे? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील नाही का?

जगातलं सर्वात महाग फ्राइज मिळतं ते अमेरिकेच्या मॅनहट्टनमधील एका रेस्टॉरंटमध्ये. Serendipty3 नावाच्या रेस्टॉरंटमध्ये हे फ्रेंज फ्राइज बनवले जातात. क्रेमे डे ला क्रेमे पोमे फ्राइट्स असं या फ्रेंज फ्राइजचं नाव आहे. याची किंमत 200 डॉलर म्हणजे जवळपास 14,916 रुपये  आहे.

हे वाचा - Gold burger नंतर आता Gold biryani; रॉयल बिर्याणीची किंमत वाचूनच शॉक व्हाल

रेस्टोरेंटचे क्रिएटिव्ह शेफ जो काल्डेरोन आणि कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह शेफ फ्रेडिक स्कोएन-कीवर्ट या दोघांनी एकत्रितरित्या हे खास  फ्रेंच फ्राइज तयार केले आहेत.

सामान्यपणे फ्रेंच फ्राइझ बटाट्याचे छोटे उभे स्टिकसारखे काप करून उकडून, तळून किंवा बेक करून केले जातात. मग त्यावर मीठ किंवा फार फार तर आणखी टेस्टसाठी लाल मिरची पूड किंवा मिरी पावडर टाकली जाते. पण हे फ्रेंज फ्राइज मात्र वेगळ्या नव्या पद्धतीने बनवण्यात आले आहे. शिवाय यात बरेच मसाले वापरण्यात आले आहेत.

या फ्रेंच फ्राइजमध्ये काय आहे खास?

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या रेसिपीसाठी अपस्टेट चिपरबेक आलू, डोम पेरिग्नन शॅम्पेन, जे लेब्लांक फ्रेंच शॅम्पेन आर्डेन व्हिनेगर, ग्वेरांडे ट्रफल सॉल्ट, ट्रफल ऑइल, क्रेते सेनेसी पेकोरिनो टार्टुफ़ेलो पनीर, इटालियन शेव्ड ब्लॅक समर ट्रफल्स, ट्रफल बटर, ऑर्गेनिक जर्सी गायींपासून तयार केलेलं 100% ग्रास फ़ेड क्रीम या सामग्रीचा वापर करण्यात आला आहे.

बटाट्यांना सुरुवातीला डोम पेरिग्नन शॅम्पेन आणि जे. लेब्लांक फ्रेंच शॅम्पेन आर्डेन व्हिनेगरमध्ये ठेवण्यात आलं. जेणेकरून सुरुवातीला याची एक वेगळी आणि गोड अशी चव यावी.

आता हे गोल्डन फ्रेंज फ्राइज साध्या टोमॅटो सॉससोबत काय खाणार नाही का? त्यामुळे यासाठी स्पेशल सॉसही तयार करण्यात आला. मोर्ने सॉससोबत हे फ्रेंज फ्राइज खाल्ले जातात आणि ते साध्या सुध्या प्लेटमध्ये नाही तर बॅकरेट क्रिस्टल अरबीस्क प्लेटवर सर्व्ह केले जातात. त्यावर जो मुंडा ट्रफल, क्रेते सेनेसी पेकोरिनो टार्टुफेलो पनीरने गार्निशिंग करण्यात आलं.

हे वाचा - बापरे! साडेचार लाख रूपये किंमत; जाणून घ्या जगातील सर्वात महागड्या बर्गरची खासियत

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या मते, ज्या पदार्थाची रेकॉर्डसाठी नोंद केली जाईल तो जनतेसाठी उपलब्ध असायला हवा आणि एका ग्राहकाने ते खरेदी करायला हवं.

यानुसार एका महिलेनं हे रेकॉर्डब्रेक फ्रेंच फ्राइजची एक प्लेट खरेदी केली. जगातील सर्वात महाग फ्रेंज फ्राइज खाणारी ही पहिली ग्राहक आहे.

First published:

Tags: Food, Lifestyle, World record