मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फक्त ‘या’ 6 सवयी टाळा; त्वचेवर येईल इतका Glow की विश्वास बसणार नाही

फक्त ‘या’ 6 सवयी टाळा; त्वचेवर येईल इतका Glow की विश्वास बसणार नाही

लिंबू पाण्याने त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते. कोलेजन तयार करण्यासाठी त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी खूप चांगलं मानलं जातं. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

लिंबू पाण्याने त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते. कोलेजन तयार करण्यासाठी त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी खूप चांगलं मानलं जातं. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

आपल्या नकळत आपण काही चुका करतो, ज्यामुळे चेहऱ्याची रंगत हरवून बसतो. तुम्ही सुद्धा या चुका करत असाल तर, तात्काळ थांबवा.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली.20 जुलै :  सुंदर त्वचेसाठी (Skin Beauty) आपण काय काय करतो? फेस पॅक, फेस क्रीम लावतो कधी होम रेमेडीज (Home Remedies) करतो, महागडे कॉस्मेटिक्स (Cosmetics) वापरतो. पण तरीही चेहऱ्याला हवा तसा ग्लो (Glow) मिळत नाही. खुप वेळा आपल्या मैत्रिणीने किंवा ओळखीच्या व्यक्तीने सांगितलेली एखादी होम रेमेडी आपण आपल्या चेहऱ्यावर ट्राय करतो मात्र, तो घरगुती उपाय आपल्याला सूट होईलच असं नसतं आणि मग खुप मेहनत करूनही चेहऱ्यावर ग्लो आला नाही तर, आपण दुःखी होतो आणि याचा स्ट्रेस (Stress) देखील त्वचेवर दिसायला लागतो.

कोणत्याही उपायाशिवाय फक्त काही गोष्टींची काळजी घेतली तरी आपला चेहर्‍यावरची चमक आपण कायम ठेवू शकतो. पाहूयात ते सोपे उपाय.

(सावध व्हा! या 3 चुका केल्यास फोनच्या बॅटरीचा होऊ शकतो Blast)

त्वचेनुसार प्रोडक्ट निवडा

कोणतंही प्रोडक्ट खरेदी करताना आपल्या त्वचेचा पोत काय आहे याची माहिती घ्या. ड्राय, ऑईली किंवा कॉम्बिनेशन स्किन, सेन्सिटिव्ह आहे हे माहिती असायला हवं. त्यानुसार आपल्या स्किन टाईपला सूट होणारे प्रोडक्ट निवडा. प्रॉडक्ट निवडतांना त्यामध्ये वापरण्यात आलेल्या केमिकल्सची देखील माहिती घ्या. प्रॉडक्ट वापरताना कोणती काळजी घ्यावी याच्या सुचना लिहीलेल्या असतील तर, त्याची सुद्धा माहिती असायला हवी.

(पुण्यात भन्नाट इको-फ्रेंडली Forest School: प्रत्येक मजल्यावर झाडं)

झोपण्याआधी नाईट रुटीन फॉलो करा

रात्री झोपण्याआधी आपला चेहरा स्वच्छ करायला विसरू नका. त्यासाठी एखद्या फेसवॉशने चेहरा धुवून त्यावर मॉश्चरायझर लावा. बाहेरून आल्यानंतर आपला चेहरा धुवायला हवा. रात्री चेहरा धुतल्यामुळे त्यावर साठलेली धूळ आणि घाण निघून जाते. याशिवाय मॉश्चरायझर किंवा नाईट क्रीम वापरल्यामुळे रात्री आपली स्कीन रिपेयर होण्यास मदत मिळते.

(जंगलात फक्त एका रात्रीसाठी गेलं नवं जोडपं; 10 दिवस देत होते जीवनमृत्यूशी झुंज)

पूर्ण झोप घ्या

रात्रीच्या वेळी पूर्ण झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे चेहऱ्यावर रिंकल्स, डोळ्याखाली काळी वर्तुळं तयार होण्याचे त्रास व्हायला लागतात. झोप पूर्ण न होण्याची अनेक कारणं असली तरी देखील यावर उपाय शोधा. रात्री कमीतकमी 7 तास झोपायला हवं. चेहऱ्यावर कोणतंही क्रीम किंवा फेस पॅक लावून स्किन प्रॉब्लेम कमी करण्याआधी पूर्ण झोप घेण्याला महत्त्व द्या.

मद्यपान

मद्यपान करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. अतिरिक्त मद्यपान करण्यामुळे शरीराबरोबर त्वचेवर ही परिणाम दिसायला लागतात. त्वचेवरची चमक कमी होऊन स्किन प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. त्यामुळे मद्यपानावरती नियंत्रण करा.

(चिनी लोक गर्भनाळही सोडत नाहीत; बाळाला जन्म देताच आईसुद्धा पिते प्लेसेंटा सूप)

धूम्रपान

मद्यपानापेक्षा धूम्रपानामुळे त्वचेवर वाईट परिणाम दिसायला लागतात. धुम्रपानामुळे फुफ्फुसांना त्रास होतोच याशिवाय त्वचाविकार होतात. धूम्रपानाची सवय पूर्णपणे बंद करणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शरीराबरोबर त्वचेला देखील त्रास होतो.

योग्य प्रमाणात पाणी प्या

बऱ्याच जणांना कमी प्रमाणामध्ये पाणी प्यायची सवय असते. काही लोक केवळ घसा ओला होण्याइतकंच पाणी पितात. मात्र, ही सर्वात वाईट आणि घातक सवय आहे. आपल्या शरीराला दिवसभरात किमान 8 ग्लास पाण्याची आवश्यकता असते. कमी पाणी पिण्यामुळे आपलं शरीर डीहायड्रेशन होतं आणि त्याचे परिणाम चेहऱ्याच्या त्वचेवर  दिसायला लागून त्वचा कोरडी होते.

(पैसे चुकीच्या खात्यात जमा झाले? घाबरू नका, वापरा ही ट्रिक)

अति झोप

योग्य वेळी झोपण्याबरोबरच योग्य प्रमाणात झोपही अत्यंत आवश्यक आहे. काही लोकांना खुप जास्त वेळ झोपायची सवय असते. दिवस उजाडला तरी ते उठत नाहीत. ही अत्यंत वाईट सवय आहे. त्यामुळे कोणतंही कॉस्मेटिक वापरून तुमची त्वाचा सुंदर होणार नाही. त्यासाठी जास्त झोपायची ही वाईट सवय बंद करा. या शिवाय झोपताना आपल्या चेहऱ्यावरचा मेकअप काढून झोपा.

First published:

Tags: Home remedies, Skin care