मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आठवड्यातून केवळ तीन दिवस 40 मिनिटं वेगात चाला, होईल स्मरणशक्तीत वाढ

आठवड्यातून केवळ तीन दिवस 40 मिनिटं वेगात चाला, होईल स्मरणशक्तीत वाढ

ऑनलाइन खरेदी करताना त्यावर आलेल्या कमेंट जरूर वाचाव्यात. ऑफलाइन घेताना खऱ्या स्टोअरची माहिती घ्यावी.

ऑनलाइन खरेदी करताना त्यावर आलेल्या कमेंट जरूर वाचाव्यात. ऑफलाइन घेताना खऱ्या स्टोअरची माहिती घ्यावी.

ज्येष्ठांची कायमच आपल्या विसराळूपणाबद्दल तक्रार असते. पण, ही समस्या ब्रिस्क वॉकिंग म्हणजेच वेगाने चालल्यामुळे कमी होऊ शकते. आठवड्यातून तीन दिवस 40-40 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग (Brisk walk for memory) केल्यास बऱ्याच प्रमाणात स्मरणशक्ती वाढू शकते.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 20 जुलै: जसजसं वय वाढत जाईल, तसतसं स्मरणशक्ती कमी होत जाते. ज्येष्ठांची कायमच आपल्या विसराळूपणाबद्दल तक्रार असते. पण, ही समस्या ब्रिस्क वॉकिंग म्हणजेच वेगाने चालल्यामुळे कमी होऊ शकते. आठवड्यातून तीन दिवस 40-40 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग (Brisk walk for memory) केल्यास बऱ्याच प्रमाणात स्मरणशक्ती वाढू शकते. अगदी साठी ओलांडलेल्या ज्येष्ठांसाठीही हा उपाय फायदेशीर असल्याचा दावा कोलोरॅडो विद्यापीठातील (Colorado state university) एका अभ्यासात करण्यात आला आहे.

  दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, या अभ्यासानुसार डान्स किंवा इतर व्यायामाच्या तुलनेत ब्रिस्क वॉक हा स्मरणशक्तीला अधिक फायदेशीर ठरतो (Brisk walk benefit for memory). कोलोरॅडो विद्यापीठातील न्यूरोसायन्स आणि मानवी विकास विभागातील प्राध्यापिका एग्निझ्का बर्झिंस्का यांनी याबाबतचं संशोधन केलं. त्यांच्या पथकाने यासाठी 250 अशा ज्येष्ठ व्यक्तींचा अभ्यास केला जे कोणताही व्यायाम वा जास्त हालचाल करत नव्हते. न्यूरोइमेज (NeuroImage) या ई-जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे.

  यासाठी निवडण्यात आलेले लोक 60 ते 80 वर्ष वयोगटातील होते. त्यांचा अरोबिक फिटनेस आणि संज्ञानात्मक कौशल्य याची लॅबमध्ये तपासणी करण्यात आली. एमआरआय स्कॅनच्या मदतीने मेंदूतील व्हाईट मॅटरची (White Matter) स्थिती आणि कामकाज याचीही नोंद ठेवण्यात आली. या 250 जणांचे तीन ग्रुप करण्यात आले. पहिल्या ग्रुपला स्ट्रेचिंग आणि बॅलन्स ट्रेनिंग हे व्यायामप्रकार करण्यास सांगण्यात आले. दुसऱ्या ग्रुपला आठवड्यातून तीन वेळा ब्रिस्क वॉक करण्यास सांगण्यात आलं, आणि तिसऱ्या ग्रुपला डान्स आणि ग्रुप कोरिओग्राफी करण्यास सांगण्यात आलं.

  ‘हा’ सुका मेवा दररोज खा; स्मरणशक्‍ती बरोबर वजनही वाढेल वेगाने

  पुढे सहा महिन्यांपर्यंत त्यांच्या दिनचर्येचा अभ्यास करण्यात आला. विशेष म्हणजे या तीनही ग्रुपमधील लोकांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत सुधारणा दिसून आली. पण, ब्रिस्क वॉक करणाऱ्या ग्रुपमधील लोकांमध्ये अधिक प्रमाणात सुधारणा दिसून आली. यानंतर घेण्यात आलेल्या मेमरी टेस्टमध्ये ब्रिस्क वॉक ग्रुपने सर्वात चांगलं प्रदर्शन केलं.

  फक्त ‘या’ 6 सवयी टाळा; त्वचेवर येईल इतका Glow की विश्वास बसणार नाही

  प्रा. बर्झिंस्का यांनी दिलेल्या माहितीनुसार, एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय असेल, तर तिच्या मेंदूमधील व्हाईट मॅटर कमी होत जातं. पण, ती व्यक्ती सक्रिय झाल्यास हे व्हाईट मॅटर पुन्हा तयार व्हायला लागतं (Increase in White Matter) तसंच, याची गुणवत्ताही वाढते. व्हाईट मॅटर हे आपल्या मेंदू आणि मणक्याला नर्व्ह फायबरसोबत जोडण्याचं काम करतं. त्यामुळे मेंदूमधील ग्रे मॅटर एवढंच व्हाईट मॅटरलाही महत्त्व असतं.

  First published:

  Tags: Health Tips