मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम नसतं; तो असतो Hormones चा झोल!

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम नसतं; तो असतो Hormones चा झोल!

आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. तो चिडला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा.

आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. तो चिडला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा.

Love hormones: सायन्सनुसार प्रेमात पडलेल्या व्यक्तींच्या शरीरात काही बदल होत असतात. हार्मोन्सच्या गुंत्यामुळे, कमी-जास्त स्रवण्यामुळे ती व्यक्ती प्रेमात गुंतत जाते.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 14 मे: असं म्हणात की आपलं मन (Heart) जेव्हा एखाद्याबद्दल पॉजिटीव्ह (Positive) विचार करायला लागतं, त्याच व्यक्तीचे विचार मनात यायला लागतात तेव्हा समजावं की त्या व्यक्तीच्या प्रेमात (Love) पडलो आहोत. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची तशी अनेक कारणं असू शकतात. पण, सिनेमात दाखवतात तशी ही भावना मनातूनच येते असं नाही. प्रेमात पडण्याचा संबंध मनापेक्षा मेंदूशी जोडलेला असतो. म्हणूनच प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे नुसतं प्रेम नसतं, तर त्यामागे हार्मोन्सचा प्रचंड गुंता किंवा सध्याच्या भाषेत झोल असतो.

आपलं शरीर केवळ रिऍक्शन (Reaction) देत असतं. एखाद्याच्या प्रेमात पडण्याची जी कारणं असतात. त्यातलं महत्वाचं कारणं असतं हार्मोन्स (Hormones)  मजबूत होणं. हार्मोन्समुळे एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटायला लागतं.

(Black fungus वर प्रभावी ठरतोय 100 वर्षे जुना फॉर्म्युला; भारतीय डॉक्टरचा दावा)

प्रेमात पडण्याच्या 3 स्टेज असतात. लस्ट, अट्रॅक्शन, अटॅचमेंट ही ती महत्त्वाची कारणं आहेत. या तीनही गोष्टी हार्मोन्सशी जोडलेल्या असतात.

लस्ट

लस्ट हे एक लिम्बिक सिस्टीम आहे. ज्यात सुरुवातील शारीरिक आकर्षण वाटतं. आपण ज्या व्यक्तीचा विचार करतो त्यांच्याबद्दल ही भावना वाटत असंत. एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरोन हॉर्मोन या भावनेसाठी कारणीभूत असतात. . Norepinephrine  किंवा PEA हे  नैसर्गिक रूपात मिळणारं एम्फॅटेमिन आहे. यामुळे एखाद्या खास व्यक्तीबद्दल आकर्षण वाटायला लागतं.

(सावधान! ओल्या आणि दमट मास्कमुळेही वाढतो जीवघेण्या काळ्या बुरशीचा धोका)

अट्रॅक्शन

ही स्टेज फर्स्ट बायोलॉजिकल रिस्पॉन्स नंतर सुरु होते. त्याच्या जोडीने काही हॉर्मोनल रिस्पॉन्स ट्रिगर होतात. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणं शरीरातल्या स्ट्रेस रिस्पॉन्समुळे होतं. यात काही लक्षणं दिसतात. हृदयाची धडधड वाढणे, तोंड सुकणं, घाम येणं हे सगळ्या रिएक्शन ऍड्रेनालाईनला ट्रिगर करतात. तर, प्रेमात पडल्यामुळे न्यूरोट्रांसमीटर डोपामाइनच्या उत्पादनाला चालना मिळते. यालाच हॅप्पी हॉर्मोन म्हणतात. तर, मनातल्या आनंदाच्या भावनेला डोपानाइन कारणीभूत असतं. यामुळे उत्साह आणि कॉन्सनट्रेशन वाढत पण, भूक कमी होते. त्यामुळे आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल अट्रॅक्शन वाटतं.

(बापरे! 16 पत्नी, 150 मुलं; म्हणे, व्हायचंय 100 बायकांचा नवरा, 1000 पोरांचा बाप)

अटॅचमेंट

अटॅटमेंटच्या भावनेत ऑक्सिटोसिन हॉर्मोन वाढतात. ऑर्गेजममध्ये ऑक्सिटोसिनचा स्तर वाढतो. हेच एकमेकांबद्दल ओढ निर्माण करतं. यामुळेच बाळाच्या जन्मानंतर आई आणि मुलामध्ये भावनिक नातं तयार होतं. त्यामुळेच बाळाला भूक लागण्याच्या वेळीच आईच्या स्तनातून दुध पाझरायला लागतं. तर, वासोप्रेसिन नावाचं हार्मोनचंही उत्पादन शरीरात होतं. हे हार्मोन किडनीसंबंधी काम करतं. त्यामुळेचं तहान नियंत्रीत राहते. सेक्स आणि पार्टनरशी रिलेशनमध्ये या हार्मोनचा रोल असतो. हा हार्मोन सेक्सनंतर लगेच रिलीज होतो. त्याशिवाय रिलेशनशिपमध्ये हेल्दी बाँडिंग निर्माण करण्यासाठी आवश्यक असतं.

(Proning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं?)

ब्रेकअप

पार्टनर बरोबर ब्रेकअप होण्याची लक्षणं सुरवातीलाच दिसायला लागतात. या कामात डोपामाइन हॉर्मोन मेंदूला नियंत्रित करतं. त्यामुळेच ब्रेकअप नंतर लगेचच आपल्याला मान दुखावल्याची भावना वाटायला लागते.

First published:

Tags: Health Tips, Mental health, Relationship, Sexual health