मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Black fungus वर प्रभावी ठरतोय 100 वर्षे जुना फॉर्म्युला; भारतीय डॉक्टरचा दावा

Black fungus वर प्रभावी ठरतोय 100 वर्षे जुना फॉर्म्युला; भारतीय डॉक्टरचा दावा

Black fungus वर हा उपाय सर्वात स्वस्त, स्वस्त आणि अचूक असल्याचं या डॉक्टरने सांगितलं आहे.

Black fungus वर हा उपाय सर्वात स्वस्त, स्वस्त आणि अचूक असल्याचं या डॉक्टरने सांगितलं आहे.

Black fungus वर हा उपाय सर्वात स्वस्त, स्वस्त आणि अचूक असल्याचं या डॉक्टरने सांगितलं आहे.

  • Published by:  Priya Lad

भोपाळ, 12 मे : एकिकडे कोरोनाचं (Coroanvirus) संकट तर दुसरीकडे या रुग्णांना होणाऱ्या जीवघेण्या ब्लॅक फंगसचं (Black fungus). म्युकोरमायकोसिसमुळे (Mucormycosis) चिंता आता अधिक वाढली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका डॉक्टरने यावर प्रभावी आणि अगदी किफायशीर असा उपचार केल्याचा दावा केला आहे. या डॉक्टरने 100 वर्षांपेक्षा जास्त जुना फॉर्म्युला सांगितला आहे. हा उपाय सर्वात स्वस्त आणि अचूक असल्याचं या डॉक्टरने सांगितलं आहे.

महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेशमध्येही म्युकोरमायकोसिसचे रुग्ण सापडले आहेत. भोपाळ, इंदोर आणि जबलपूरमध्ये हे रुग्ण सापडल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. हा आजार जीवही घेत असल्याने त्यावर उपचारासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याचदरम्यान मध्य प्रदेशमधील एका डॉक्टरने या आजाराला रोखण्यासाठी स्वस्त आणि सोपा असा उपाय सांगितला आहे.

मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील डॉ. अमरेंद्र पांडे यांनी सांगितलं, त्यांनी आपल्या खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना या उपचारामार्फत ब्लॅक फंगससारख्या भयानक आजारापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा उपाय म्हणजे मिथलीन ब्लू. डॉ. पांडे यांच्या मते हे औषध अँटीफंगलचं काम करतं आणि अगदी सहजपणे उपलब्ध होतं.

हे वाचा - सावधान! ओल्या आणि दमट मास्कमुळेही वाढतो जीवघेण्या काळ्या बुरशीचा धोका

खाणीत काम करणाऱ्यांना किंवा गिर्यारोहकांना ऑक्सिजन पातळी वाढण्यासाठी हे औषध दिलं जातं. अगदी कमी मात्रेतही हे औषध ऑक्सिजनची पातळी वाढवतं. सोबतच अँटी फंगसचंही काम करतं. घरातील एक्युरियममधील माशांना फंगसपासून वाचवण्यासाठीही या औषधाचे ड्रॉप टाकले जातात.

डॉ. अमरेंद्र यांनी सांगितलं, "प्रयोगात हे औषध प्रभावी ठरलं आहे. आपल्या रुग्णालयासह 12 पेक्षा अधिक रुग्णालयांनी या औषधाचा प्रयोग सुरू केला आहे. ज्याचे परिणाम चांगले आले आहेत. या औषधाचे फक्त दोन डोसच पुरेसे आहेत. ज्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले"

हे वाचा - पहिली कोरोना लस मिळतानाच मुश्किल; तज्ज्ञ म्हणतायेत तिसरा डोसही घ्यावा लागेल

"पण या औषधाचा वापर करताना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णांच्या शरीरात हे औषध पोहोचवणारी व्हेंटिलेटर ट्युब आणि ऑक्सिजन ट्युब वारंवार स्वच्छ करत राहायला हवी. यामळे फंगस निर्माण होत नाही आणि रुग्ण पूर्णपणे सुरक्षित राहतो", असं डॉ. पांडे यांनी सांगितलं.

First published:

Tags: Coronavirus