कोरोनाची पहिली लाट (First Wave of Cororna) ओसरण्या आधीच दुसरी लाट सुरु झाली. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातच कोरोना बरोबर ब्लॅक फंगस (Black Fungus)चा धोकाही वाढलेला आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसच्या केस संपूर्ण भारतामध्ये दिसू लागलेल्या आहेत.
पेशंट कोरनाच्या लक्षणांकडेच लक्ष देत असल्याने ब्लॅक फंगस इन्फेक्शन (Black Fungus Infection) लक्षात येत नाही. कोरोना रुग्णांबरोबर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांमध्ये ब्लॅक फंगसची लागण होताना दिसत आहे. विशेषत: जे लोक ओला मास्क (Wet mask) वापरात त्यांच्यामध्ये ही बुरशी (Fungus)वाढण्याचं प्रमाण अधिक आहे. कोरोना आणि ब्लॅक फंगस यांचा अटॅक झाल्यास रुग्णाला गंभीर परिणाम भोगावे लागतात.
कोरोना रुग्णांना ब्लॅक फंगसचा धोका असरल्याने त्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी. कोरोना पेशंटने स्वच्छ आणि वाळलेला मास्क वापरावा. मास्क धुतल्यानंतर तो उन्हात वाळवावा. ज्यामुळे त्यातील बॅक्टेरीया (Bacteria) मरेल. आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
कोरोना पेशंटला स्टेरॉईड (Steroid) दिलं जात असेल तर, अशावेळी जास्त काळजी घ्यायला हवी. स्टेरॉईड घेणाऱ्या पेशंटमध्ये ब्लॅक फंगस वाढण्याची शक्यता जास्त आहे. याकाळात कोरोना पेशंटच्या नातलगांनी पेशंटची विशेष काळजी घ्यायला हवी.
कोरोना रुग्णाला ब्लॅक फंगस इन्फेक्शन झालं असेल तर, कोरोनाबरोबर त्यासाठीही उपचार घ्यावे लागतात. पेशंटसाठी ऍन्टी-बायोटीकची मात्रा वाढवावी लागते. एक महिना ऍन्टी-फंगल औषधं घ्यावी लागतात.
वयोवृद्ध व्यक्ती डायबेटीज पेशंटला कोरोना झाल्यास धोका वाढतो आणि याच पेशंटला ब्लॅक फंगस इन्फेक्शनची भीतीही जास्त असते. डायबेटीज पेशंटच्या शरीरात ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं. ऍन्टी-फंगल ट्रिटमेंटनंतरही जास्त काळ औषधोपचार घ्यावे लागतात.