मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं? जाणून घ्या प्रोनिंगविषयी

Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं? जाणून घ्या प्रोनिंगविषयी

Coronavirus च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचं प्रमाण फटकन खाली येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. डॉक्टर अशा वेळी Prone position चा सल्ला देतात. म्हणजे काय, ते कसं करायचं, किती वेळ करायचं?

Coronavirus च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचं प्रमाण फटकन खाली येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. डॉक्टर अशा वेळी Prone position चा सल्ला देतात. म्हणजे काय, ते कसं करायचं, किती वेळ करायचं?

Coronavirus च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचं प्रमाण फटकन खाली येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. डॉक्टर अशा वेळी Prone position चा सल्ला देतात. म्हणजे काय, ते कसं करायचं, किती वेळ करायचं?

मुंबई, 11 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Second wave of coronavirus) गंभीर रूप धारण केलं आहे. त्यामुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या लाटेत आजाराची तीव्रता पटकन वाढण्याचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून येत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी (SPO2) कमी होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच वेळी ऑक्सिजनच्या तुटवड्यातही (Oxygen Shortage) वाढ झाली आहे. म्हणूनच जास्तीत जास्त रुग्णांना प्रोनिंग एक्सरसाइजची (Proning Exercise) शिफारस डॉक्टरांकडून केली जात आहे. गृहविलगीकरणात (Home Isolation) असलेल्या, तसंच हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांसाठीही प्रोनिंग एक्सरसाइजेसची शिफारस केली जात आहे. प्रोनिंगमुळे रुग्णांना श्वसनाद्वारे ऑक्सिजन जास्त प्रमाणात घेण्यास मदत होते. 'दी इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.

प्रोनिंग (Proning)म्हणजे काय?

- प्रोनिंग म्हणजे पाठीवर झोपलेल्या (उताणी) पेशंटला सुरक्षित, काटेकोर हालचालींद्वारे पोटावर (पालथं) झोपायला लावण्याची प्रक्रिया. प्रोनिंग ही वैद्यकीयदृष्ट्या स्वीकारलेल्या पद्धत आहे.

- प्रोनिंगचे फायदे

- आरामदायी पद्धतीने श्वासोच्छ्वास घेता येतो. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. कोविड-19 रुग्णांमध्ये श्वसन प्रक्रियेवर परिणाम झालेला असताना, खास करून गृह विलगीकरणात असलेल्या पेशंटना ही पद्धत फायदेशीर ठरते.

- प्रोन पोझिशनमुळे फुप्फुसातली अॅल्व्हिओलर युनिट्स उघडी राहतात. त्यामुळे श्वासोच्छ्वास घेणं सुलभ होतं.

- प्रोनिंग केव्हा आवश्यक असतं?

- जेव्हा रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्याची SpO2 अर्थात रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा खाली येते, तेव्हा प्रोनिंग गरजेचं असतं.

- SpO2, तापमान, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी यावर गृह विलगीकरणात असताना कायम लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

- प्रोनिंगची स्थिती (Proning Position)

- प्रोनिंगसाठी दोन-चार उश्या लागतात. एक उशी मानेखाली,दोन उश्या छाती ते मांडीपर्यंतच्या भागात, तर दोन उश्या पायाच्या नडगीखाली. आपल्या आरामदायीस्थितीनुसार उश्यांची स्थिती थोडी बदलता येऊ शकते.

Toilet pipe मधूनही कोरोनाव्हायरस तुमच्या घरात घुसू शकतो का?

- सेल्फ प्रोनिंगसाठीही 4 -5 उश्या लागतात. आडवं पडण्याच्या स्थितीत साधारणतः दर अर्ध्या तासाने बदल करणं आवश्यक आहे.

काय करावं, काय टाळावं?(Do's & Dont's)

- एखाद्या व्यक्तीने दिवसभरात वेगवेगळ्या वेळी मिळून एकूण जास्तीत जास्त 16 तासांपर्यंत प्रोनिंग स्थितीत राहावं.

- एका वेळेस प्रोनिंग करताना सुसह्य होईल इतकाच वेळ त्या स्थितीत राहावं.

Virafin : कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरणार औषध; Zydus cadila ने जारी केली किंमत

- जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर तासभर तरी प्रोनिंग करू नये.

- अशा स्थितीत राहिल्यामुळे काही जखमा होत नाहीयेत ना, याकडे लक्ष ठेवावं.

- गर्भवती महिलांनी प्रोनिंग करू नये. तसंच, मांडीच्या किंवा कमरेच्या हाडात, तसंच मणक्यात फ्रॅक्चर झालेल्यांनी, तीव्र हृदयविकार असलेल्यांनी आणि डीप व्हेन थ्रॉम्बॉसिस असलेल्यांनी प्रोनिंग करू नये.

First published: