मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /स्वतःबरोबर जरा केसांसाठी करा चहा; दुपटीने वाढतील केस पाहा

स्वतःबरोबर जरा केसांसाठी करा चहा; दुपटीने वाढतील केस पाहा

सुंदर,लांब आणि निरोगी केस प्रत्येकाचं स्वप्न असतं.

सुंदर,लांब आणि निरोगी केस प्रत्येकाचं स्वप्न असतं.

केस मजबूत होण्यासाठी चहा पावडरचं पाणी (Tea Water for hair) वापरता येतं. यामुळे केसांना नैसर्गिक चमक (Natural Shine) आणि काळा रंग येतो. कशी वापरायची चहा पावडर?

नवी दिल्ली, 24 जून : केस सुंदर आणि मजबूत बनवण्यासाठी आपण कितीतरी ब्युटी प्रॉडक्ट वापरत असतो. यात आपला वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. मात्र, तरी चांगला परिणाम होण्याऐवजी साईड इफेक्टस भोगावे लागतात. केस निरोगी बनवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील करता येतात. चहा पावडरच फायदा माहिती झाला तर, हेयर कलर वापरणं बंद कराल. जाणून घेऊया चहा पावडर केसांसाठी वापरायची.

चहा पावडरचे फायदे

चहा पावडरच्या पाण्यामुळे आपले केस चांगले वाढतात. याशिवाय रेशमी आणि मुलायम बनतात.

या पाण्याने केस धुतल्यामुळे केसांचं गळणं, तुटणार बंद होतं.

चहा पावडरच्या पाण्याने केस धुतल्यामुळे यातील पॉलिफिनॉलमुळे केसांचं इन्फेक्शन कमी होतं.

इन्फेक्शनमुळे केसांवरील त्वचा निघत असेल तर, हे पाणी वापरल्यामुळे त्रास कमी होतो.

(नाश्त्याला खा हे 5 पदार्थ; दिवसभर नाही जाणवणार थकवा)

केसांमध्ये कोंडा झाला असेल तर, चहा पावडरच्या पाण्याने फायदा मिळतो.

चहा पावडरचं पाणी केसांसाठी वापरलं तर केसांची वाढ होते. केस मजबूत बनतात.

चहा पावडरचं पाणी केसांसाठी नॅचुरल कलर प्रमाणे वापरता येतं.

(7 Super foods करतील तुमच्या ब्रेस्टचं रक्षण; Breast cancer पासून करतील बचाव)

चहा पावडरचं पाणी

केस सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी घरच्या घरी चहा पावडरचं पाणी बनवता येऊ शकतं. याकरता 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 2 चमचे चहा पावडर टाका. त्यानंतर सात ते आठ मिनिटं गॅसवर चांगलं उकळून द्या. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा. हे पाणी थंड झाल्यानंतर केसांसाठी वापरता येतं.

(आहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड)

वापरण्याची पद्धत

केस धुवताना चहापावडरच्या पाण्याचा वापर करता येतो. केस शाम्पूने स्वच्छ धुवा. त्यानंतर हे पाणी केसांवर टाका. लक्षात ठेवा केस पूर्ण भिजले पाहिजेत. पाणी केसांवर टाकल्यावर 1 मिनिटं हाताने केसांना मसाज करा. यानंतर केसांना टॉवेल बांधा. हे पाणी केसांवर टाकल्यानंतर पाणी केसांवर टाकू नका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करता येतो.

(Delta plus असो की दुसरा व्हेरिएंट; कोरोनाच्या प्रत्येक रूपापासून बचावाचा उपाय)

चहापावडरचा हेअर कलर

केसांना कलर करण्यासाठी 1 मग पाण्यामध्ये 2 चमचे चहा पावडर घाला. आता हे पाणी चांगलं उकळवा. पाणी उकळून अर्ध झालं पाहिजे. त्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यावर हे पाणी कलर ब्रशचा वापर करून केसांना लावा. त्यानंतर एक तास केस वाळू द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केला तर केस काळे होतात.

First published:

Tags: Home remedies, Lifestyle, Woman hair