नवी दिल्ली, 24 जून : आपल्या शरीरातील 5 इंद्रियांपैकी घ्राणेंद्रिय (Olfactory sense of smell) म्हणजेच वास घेण्याच्या क्षमतेकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. मात्र, संशोधनानुसार (Research) आपल्या शरीराचा वास हा आपलं आरोग्य आणि आपल्या आहाराची (Health & Diet) पद्धत याबद्दल सगळं काही सांगतो. व्यक्तीच्या गंधाचा संबंध त्याच्या गुणसूत्रांशी (Genes) असतो. शरीराचा गंध आपला जोडीदार, सौंदर्य प्रसादनं यांची निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
गंधाबद्दल महत्वाची माहिती
ऑस्ट्रेलियाच्या मेक्वॅरी युनिव्हर्सिटीच्या ऑल्फॅक्श आणि गंध मनोतज्ज्ञ मेमट मोमेट यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या संशोधनानुसार शरीराचा वास त्या व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती देऊ शकतो. त्या व्यक्तीला कोणता आजार आहे हे त्याच्या वासावरून लक्षात येऊ शकतं. डायबिटीस झालेल्या व्यक्तीच्या शरीराचा वास गोड येतो यावरून डायबेटीसशी संबंधित आजार झाल्याचं कळतं. शिवाय एखादी व्यक्ती कोणत्या प्रकारचा आहार घेते हे त्यांच्या शरीराला येणाऱ्या वासावरुन कळतं.
(अरे बापरे! आयड्रॉपऐवजी डोळ्यात टाकला नेल ग्लू; महिलेची झाली भयंकर अवस्था)
मेमट यांच्यामध्ये जी व्यक्ती मांसाहारी असते तिच्या शरीराचा वास आकर्षक असतो. त्यांच्या संशोधनानुसार पुरुषांना मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीराचा गंध आकर्षक आणि चांगला वाटतो. तर पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण त्यांच्या शरीरातली सुगंध वाढवतात.
अनुवांशिकता
संशोधनानुसार आपलं खाणंपिण आणि आरोग्यचा परिणाम शरीराच्या सुगंधावर होतो. तसाच आपल्या अनुवंशिकतेचा परिणाम देखील शरीराच्या वासावर होतो. ज्यांच्या शरीराच्या सुगंधात समानता असते तितकीच त्या व्यक्तीच्या आवडीनिवडींमध्ये देखील समानता असू शकते.
(ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं योगासनांचं महत्त्व; दररोज करा ही 5 आसनं)
कॉस्मेटिकची निवड
पोलंडच्या व्रोक्लॉ यूनिवर्सिटी युनिव्हर्सिटीच्या मनोतज्ज्ञ एग्नीज्का सोरोकोव्स्का यांच्यामत व्यक्तीच्या वासावरून जेनेटिक माहिती देखील मिळू शकते. त्यांच्यामते एखाद्या व्यक्तीच्या वासावरून त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची ही माहिती मिळते. कॉस्मेटिकची निवड देखील अनुवंशिकतेच्या आधारावर केली जाते.
(मादीने घातलेली अंडी काही न खाता हा 50 दिवस ठेवतो तोंडात; किंमत तर ऐका माशाची)
विवाहाशी संबंध नाही
या संदर्भामध्ये 3700 जोडप्यांवर संशोधन करण्यात आलं. त्यानुसार लोकं लग्नासाठी एखाद्या व्यक्तीची निवड करताना त्यामध्ये शरीराच्या गंधाची कोणतीही भूमिका नसते. आपल्या शरीरात खास प्रकारचे प्रोटीन असतात ज्याला HLA म्हणतात. पण,HLA आपल्या जोडीदाराच्या निवडीवर परिणाम करत नाही. तर काही तज्ज्ञांच्यामते HLA सारखा असणारी जोडपी जेनेटिक दृष्टिकोनातून उत्तम मानली जातात. अशा जोडण्याची मूलं सुद्ढ असतात. महिला आपल्या जोडीदाराची निवड करताना त्याच्या शरीराच्या वासाचा उपयोग करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Research