मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

7 Super foods करतील तुमच्या ब्रेस्टचं रक्षण; Breast cancer पासून करतील बचाव

7 Super foods करतील तुमच्या ब्रेस्टचं रक्षण; Breast cancer पासून करतील बचाव

गर्भधारणे नंतर, स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढते. ज्यामुळे त्यांच्या स्तनांमध्ये वेदना होतात आणि स्तनांचं वजन वाढायला लागतं. स्तनाग्रांचा रंग गडद होऊ लागतो, त्याला खाज सुटणे किंवा टोचत असल्याची जाणीव होते.

गर्भधारणे नंतर, स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढते. ज्यामुळे त्यांच्या स्तनांमध्ये वेदना होतात आणि स्तनांचं वजन वाढायला लागतं. स्तनाग्रांचा रंग गडद होऊ लागतो, त्याला खाज सुटणे किंवा टोचत असल्याची जाणीव होते.

Foods for Breast health : हे सुपरफूड तुमच्या ब्रेस्टचं आरोग्य उत्तम ठेवतील.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 23 जून : आजार आणि त्यावरील उपचारापेक्षा कधीही त्याला प्रतिबंध करणंच योग्य असतं. हेच ब्रेस्टच्या (Breast) बाबतही लागू होतं.  महिलांनी आपल्या एकूण आरोग्यासह ब्रेस्टची (Breast Health) विशेष काळजी घेणंही गरजेचं आहे. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर (Breast cancer) मोठ्या प्रमाणात दिसून येतो. बराच वेळा सुरुवातीला याची लक्षणं दिसून येत नाहीत. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. पण तो होऊ नये, यासाठी पुरेपूर काळजी घेणं गरजेचं आहे. आपलं आरोग्य हे आपल्या आहारावरही अवलंबून आहे. त्यामुळे ब्रेस्टच्या आरोग्यासाठीही आहार (Food for breast health) तितकाच महत्त्वाचा आहे. असे काही पदार्थ आहेत, जे ब्रेस्ट कॅन्सरला दूर ठेवण्यात मदत करू शकतात. ब्रेस्टला कॅन्सरला दूर ठेवणारे असेच हे 7 सुपरफूड. ब्रोकोली - ब्रोकोलीमध्ये Sulforaphane हा घटक असतो. जो ब्रेस्ट कॅन्सर पेशींच्या वाढीला रोखू शकतो. त्यामुळे तुम्ही ब्रोकोली थोडीशी परतून किंवा उकडूनही खावू शकता. कॉफी - कॉफीमध्ये असेलेले अँटिऑक्सिडंट घटक ब्रेस्ट कॅन्सरच्या समस्येला दूर ठेवतं. दररोज एक कप कॉफी तुमच्या कॅन्सरचा धोका कमी करू शकतं. हे वाचा - सावधान!लहान बाळांच्या डोळ्यात काजळ घालू नका;होतो मेंदूवर परिणाम अक्रोड - अक्रोडमध्ये अँटि-इन्फ्लेमेटरी घटक असतो. दररोज अक्रोड खाण्याने ट्यमुरचा धोका कमी होऊ शकतो. यामधील अँटि-ऑक्सिडंट आणि इतर घटक ब्रेस्ट कॅन्सर पेशीशी लढण्यास सक्षम आहेत. साल्मन - साल्मन मासाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करू शकतो. यामध्ये ओमेगा-3 फॅट असतं जे ब्रेस्ट कॅन्सरला कारणीभूत ठरणारं इन्फ्लेमेशन कमी करतं. फिश ऑईल ब्रेस्ट कॅन्सरवर प्रभावी आहे. ऑलिव्ह ऑईल - यामध्ये ऑलिक अॅसिड असतं जे कॅन्सर पेशींची वाढ कमी करतं. त्यामुळे दररोजच्या जेवणात तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर केला तर ब्रेस्ट कॅन्सर पेशींची वाढ होण्यापासून बचाव करता येऊ शकतं. हे वाचा - ‘या’ पदार्थांमुळे होते Immunity कमी; आजच बंद करा खाणं पार्सली - पार्सली कॅन्सर पेशींचा खात्मा करण्यात सक्षम आहे. तुमच्या दररोजच्या आहारात चिमूटभर पार्सलीही ब्रेस्ट कॅन्सरला दूर ठेण्यास पुरेसं आहे. बीन्स - दररोजच्या आहारात फायबर असल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करता येतो. यातील अँटि-इन्फ्लेमेटरी घटक पचन प्रक्रिया सुरक्षित ठेवतात आणि शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर फेकतात.
First published:

Tags: Breast cancer, Food, Health, Lifestyle, Superfood, Woman

पुढील बातम्या