Vastu Tips: पतीपत्नीच्या भांडणांना वास्तूदोष असू शकतो कारण; हे उपाय करून पहा
वास्तूशास्त्रानुसार (Vastushastra) वास्तूदोषामुळे पती-पत्नीमध्ये वाद होतात. अशा घरात राहण्याची इच्छाही होत नाही. सतत निगेटिव्ह एनर्जी (Negative Energy) असल्याचा आभास निर्माण होतो.
पुजाअर्चा करावी - घरामध्ये वास्तूदोष असेल तर, पूजाअर्चा, होमहवन करा. त्यामुळे घरातलं वातावरण शुद्ध होतं आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते. याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करावी,दिवा लावावा. शक्य असेल तर घरातल्या लोकांनी एकत्र बसून पूजा करावी.
2/ 7
तुळस- घराच्या पूर्व दिशेला तुळशीच रोप जरूर ठेवावं. तुळशीसमोर सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावावा. या छोट्याशा उपायदेखील घरातले वास्तूदोष दूर होतात.
3/ 7
दरवाजे- घराला 2 दरवाजे असतील तर, बऱ्याच जणांना मागचा दरवाजा वापरायची सवय असते. मात्र, असं न करता मुख्य दरवाजाचा वापर येण्या-जाण्यासाठी करावा.
4/ 7
पौर्णिमा- वास्तूशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. या दिवसाला शुभ मानला गेलं आहे. पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये गंगाजल शिंपडावं. यामुळे नकारात्मकता संपते.
5/ 7
मीठ- नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी जाड मीठ वापराव. हे मीठ पाण्यात टाकून लादी पुसण्यासाठी करावं. यामुळे घरातले बॅक्टेरिया तर संपतात शिवाय सकारात्मक ऊर्जा येते.
6/ 7
लाफिंग बुद्धा- पॉजिटीव्ह एनर्जीसाठी फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धाला अतिशय महत्त्व आहे. ज्या घरामध्ये लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवली जाते. त्या घरात नेहमीच आनंदी आनंद नांदतो.
7/ 7
घरात कासव ठेवावं- तांब किंवा पितळेचा कासव घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं. हे कासव घरात उत्तर दिशेला पाण्याच्या भांड्यांमध्ये ठेवावं. त्यामुळे घरातल्या समस्या संपून, घरांत संपत्ती यायला सुरुवात होते.