• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • गर्भधारणेच्या काळात ‘या’ पद्धतीने खावेत बदाम; होईल बाळाला फायदा

गर्भधारणेच्या काळात ‘या’ पद्धतीने खावेत बदाम; होईल बाळाला फायदा

बदामांमध्ये फायटिक ऍसिडचं प्रमाण अगदी कमी असतं,ज्यामुळे ते लवकर पचतं.

बदामांमध्ये फायटिक ऍसिडचं प्रमाण अगदी कमी असतं,ज्यामुळे ते लवकर पचतं.

गर्भधारणेच्या काळात (During Pregnancy) ड्रायफ्रूट (Dry Fruit) खाणं आवश्यक असतं. पण, ते खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या.

 • Share this:
  नवी दिल्ली,1 ऑगस्ट :  गर्भवती महिलेचा आहार पौष्टिक (Health Diet in Pregnancy) असावा लागतो. कारण, बाळ आणि आई दोघांच्याही उत्तम आरोग्यसाठी (Health) ते  महत्त्वाचं आहे. आईचा आहार चांगला असेल तर, बाळाची वाढ चांगली (Growth) होते. तर, महिलेलाही प्रेग्नेंसीच्या (Pregnancy) काळात अशक्तपणा जाणवत नाही. या करतात गर्भवती महिलेने सकस आहार घ्यायला हवा. रोजच्या जेवणाबरोबर फळं आणि ड्रायफ्रूट (Dry Fruit) खायला हवेत. काही महिला बदामा सारखे ठराविक ड्रायफूट (Dry Fruit) जास्त खातात मात्र, प्रेग्नेंसीच्या काळामध्ये बदाम (Almond) खाणं योग्य आहे का ? बदाम कशा प्रकारे खायला हवेत ? याची माहिती जाणून घ्या. बदाम खाणं बाळासाठीही आवश्यक आहे. मात्र एखाद्या पदार्थांमध्ये घालून शिजवून बदाम खाण्यापेक्षा न शिजवलेले बदाम खावेत. यामध्ये आयर्न, कॅल्शिअम, फॉलिक अ‍ॅसिड, आणि फायबर सारखे पोषक घटक असतात. मात्र, ज्या महिलांना ड्रायफ्रुट्स खाण्याची ॲलर्जी (Allergy) आहे. त्यांनी बदाम देखील खाऊ नयेत. (पावसाळ्यात जास्त खाऊ नका पालेभाज्या; आजारांना मिळेल निमंत्रण) भिजलेले बदाम प्रेग्नेंसीच्या काळामध्ये भिजलेले बदाम खाणं उत्तम आहे. या काळात पचन शक्ती कमी होते. काही खाल्ल की उलट्या होत असतात. बदामामध्ये पचनशक्ती चांगली करणारे अ‍ॅन्झाइम रिलीज करण्याची क्षमता असते. वाळलेल्या बदामापेक्षा भिजलेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात. शिवाय रात्रभर भिजल्यामुळे पचायला हलके होतात. (प्रेग्नेन्सीत निष्काळजीपणा नको; व्यंग असलेलं बाळ येईल जन्माला) भिजलेल्या बदामाची साल काढून खाणं आवश्यक आहे. बदामाच्या सालीमध्ये असलेल्या टॅनिनमुळे पोषक घटकांच्या शोषणामध्ये अडथळा निर्माण होतो. भिजलेले बदाम वाळलेल्या बदामापेक्षा आरोग्यासाठी उत्तम असतात. गर्भधारणेच्या काळात अवश्यखारवलेले बदाम खाऊ नयेत कारण, त्यामध्ये अ‍ॅन्झाइम कमी करणारे घटक नष्ट झालेले असतात. (कोरोना काळात चहा ठरेल Immunity साठी फायद्याचा, सकाळी अशाप्रकारे प्या Cup of Tea!) बदामातल्या फायटिक अ‍ॅसिडमुळे मिनरलची कमतरता निर्माण होते. भिजलेल्या बदामामुळे फायटिक अ‍ॅसिड कमी होतं आणि फॉस्फरस रिलीज होण्यास मदत मिळते. ज्यामुळे हाडं मजबूत होतात, पचनशक्ती सुधारते. बदाम भिजल्यावर त्याची साल काढता येते. या सालीमध्ये टॅनिन असतं. साल काढल्यामुळे बदामाची चव जास्त वाढते आणि लवकर पचतात. (त्वचेवर ‘ही’ 3 लक्षणं दिसताच तपासा Blood Sugar; हालचाल करणंही होईल कठीण) बदाम खाण्याची योग्य वेळ प्रेग्नेंसीच्या काळामध्ये दररोज नऊ महिने बदाम खाऊ शकतात. सकाळी उपाशी पोटी किंवा रात्री झोपण्याआधी भिजवलेले बदाम खावेत किंवा भिजवलेले बदाम दुधामध्ये मिसळून खाऊ शकता.
  Published by:News18 Desk
  First published: