जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health Tips : जास्त प्रमाणात ब्लॅक किंवा लेमन टी घेताय? किडनी-लिव्हरवर होतात हे दुष्परिणाम!

Health Tips : जास्त प्रमाणात ब्लॅक किंवा लेमन टी घेताय? किडनी-लिव्हरवर होतात हे दुष्परिणाम!

जास्त चहा घेत करत असाल तर ते धोकादायक ठरू शकते.

जास्त चहा घेत करत असाल तर ते धोकादायक ठरू शकते.

एक व्यक्ती बराच काळ काळा किंवा हिरवा चहा पीत असे. त्यानंतर एके दिवशी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तुम्हीही जास्त चहा घेत करत असाल तर ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे किडनी आणि लिव्हरचेही नुकसान होऊ शकते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 जुलै : भारतातील बहुतेक लोकांना दररोज एक किंवा दोन कप चहा पिण्याची सवय असते. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर दिवसातून एक किंवा दोन कप चहाने काही विशेष नुकसान होत नाही, परंतु जर एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात चहा पिऊ लागली तर त्रास होणे निश्चितच आहे. मुंबईतील एका ४२ वर्षीय व्यक्तीला जास्त चहा पिण्याची इतकी वाईट सवय लागली की, त्यामुळे किडनी निकामी झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. वास्तविक, ही व्यक्ती रोज ग्रीन किंवा लेमन टीमध्ये व्हिटॅमिन सी टाकून घेत असे. कोरोना नंतर व्हिटॅमिन सीचा ट्रेंड इतका वाढला की, काही लोकांनी ते आपल्या आयुष्याचा भाग बनवले. परंतु चहासोबत व्हिटॅमिन सी घेतल्याने किडनी आणि लिव्हरवर वाईट परिणाम होतो आणि इतर अनेक आजारांचा धोका देखील वाढू शकतो. चला जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती.

Eating Tips : जेवण झाल्यानंतर अजिबात करू नका हे 3 काम, आरोग्यावर होऊ शकतो घातक परिणाम!

किडनी स्टोनचा धोका TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मुंबईतील संदीप चौहान या व्यक्तीच्या पायाला सूज येऊ लागली आणि भूक न लागल्यामुळे त्यांना वारंवार उलट्या होत होत्या. त्यांची तपासणी केली असता डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. रुग्णाची किडनी खूप काम करत होती. अनेक चाचण्यांनंतर डॉक्टर या निष्कर्षावर आले की, संदीप दररोज अनेक कप चहा आणि व्हिटॅमिन सी घेत असे.

News18लोकमत
News18लोकमत

मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या डीन डॉ. संगीता रावत यांनी सांगितले की, कोविड काळात ब्लॅक टी आणि व्हिटॅमिन सी घेण्याचा ट्रेंड वाढला होता. परंतु प्रत्येकाला त्याची गरज नसते. ज्यांना इतर काही समस्या आहेत, त्यांच्यासाठी जास्त चहा आणि व्हिटॅमिन सी अत्यंत घातक ठरू शकतात. संदीप कामाच्या ठिकाणी व्हेंडिंग मशिनमधून दररोज अनेक कप ग्रीन किंवा लेमन टी प्यायचा. या चहामध्ये व्हिटॅमिन सी देखील मिसळले होते. संदीपला आधीच उच्चरक्तदाब होता, ज्याची त्याला कल्पनाही नव्हती. जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा त्याच्या केराटिनची पातळी 10 होती तर सामान्य 1 पेक्षा जास्त नसावी. एवढेच नाही तर मूत्रपिंडाची बायोप्सी केली असता, त्यात ऑक्सलेटचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आढळून आले, जे किडनी स्टोनचे प्रमुख कारण आहे. डॉ. तुकाराम जमाले, ईएम रुग्णालयाच्या नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख म्हणाले की, रुग्णाला अनेक कप काळा चहा पिण्याची धोकादायक सवय होती . या काळ्या चहामुळे आणि व्हिटॅमिन सीमुळे त्याच्या शरीरात ऑक्सलेटचे प्रमाण वाढले, हे त्याला माहीत नव्हते. व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीरात लोहाच्या वाढीसाठी आणि शोषणासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. आपल्याला दररोज 75 ते 90 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. हे मुख्यतः अन्नातून मिळते. जर कमतरता असेल तर डॉक्टर 1000 मिलीग्राम पर्यंत व्हिटॅमिन सी सप्लिमेंट घेण्याची शिफारस केली जाते.

Bone Health : आत्ताच स्वतःला लावून घ्या ‘या’ चांगल्या सवयी, वृद्धत्वातही हाडं होणार नाहीत कमकुवत

जास्त चहा आणि व्हिटॅमिन सीमुळे होतात अनेक आजार डॉक्टरांनी सल्ला दिल्यास हे सुरक्षित असते. पण जर व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेतले तर शरीरात व्हिटॅमिन सीचे विघटन होऊन त्याचे ऑक्सलेटमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि त्यातून किडनीमध्ये स्टोन्स तयार होतात. एवढेच नाही तर व्हिटॅमिन सीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास लिव्हर, संधिवात आणि किडनीचे आजार होऊ शकतात. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम करते आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात