मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

UPSCच्या तयारीसाठी वडिलांनी विकलं घर; प्रदीप सिंहांनी IAS होऊन कष्टाचं केलं चीज

UPSCच्या तयारीसाठी वडिलांनी विकलं घर; प्रदीप सिंहांनी IAS होऊन कष्टाचं केलं चीज

आयएएस ऑफिसर प्रदीप सिंह (IAS Officer Pradeep Singh) यांनी केवळ 22व्या वर्षीचं पहिल्या प्रयत्नात . UPSC परीक्षेत यश मिळवलं.

आयएएस ऑफिसर प्रदीप सिंह (IAS Officer Pradeep Singh) यांनी केवळ 22व्या वर्षीचं पहिल्या प्रयत्नात . UPSC परीक्षेत यश मिळवलं.

आयएएस ऑफिसर प्रदीप सिंह (IAS Officer Pradeep Singh) यांनी केवळ 22व्या वर्षीचं पहिल्या प्रयत्नात . UPSC परीक्षेत यश मिळवलं.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 09 ऑगस्ट : देशातली सगळ्यात कठीण परीक्षा म्हणजे यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) देशभरातून लाखो विद्यार्थी ही परिक्षा देतात. तरी फार कमी विद्यार्थ्यांना या यश मिळतं. या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मेहनत, जिद्द, सातत्याने अभ्यास करणं आवश्यक असतं. UPSC परीक्षा पास होऊन आयएएस ऑफिसर (IAS Officer) होण्याचं स्वप्न पूर्ण करणं अतिशय कठीण गोष्ट आहे. प्रत्येकालाच चांगले कोचिंग क्लास, मार्गदर्शन मिळतंच असं नाही. IAS ऑफिसर होणारे असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांची हालाखीची परिस्थिती असूनही त्यांनी अभ्यास करून यश मिळवलं आहे. इंदौरमध्ये (Indore) राहणारे प्रदीप सिंह याचे वडिल पेट्रोल पंप कर्मचारी (Petrol Pump Worker) आहेत. अतिशय हालाखीची परिस्थिती असूनही अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी IAS होण्याचं वडिलांचं स्वप्न पूर्ण केलेला आहे.

2018 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी 93वा रँक मिळवला आहे. ते 2018 मध्ये USC परीक्षा पास होणारे सगळ्यात कमी वयाच्या  विद्यार्थ्यांमध्ये प्रदीप यांची गणना केली जाते.

(अपयश येऊनही सोडले नाहीत प्रयत्न; IAS गुंजन द्विवेदी यांची ‘Smart Study Strategy’)

प्रदीप यांचे वडील मनोज सिंह बिहारच्या गोपालगंजचे(Gopalganj, Bihar)राहणारे आहेत. ते एक पेट्रोल पंप कर्मचारी आहेत तर, आई गृहिणी आहे. त्यांची कौटुंबिक परिस्थिती इतकी बिकट होती की, प्रदिप यांच्या UPSCच्या तयारीसाठी त्यांनी राहतं आपलं घरीही विकलं आणि भाड्याच्या घरात राहयला सुरूवात केली.

(ड्राय स्किन,थकवा येणं ; ‘Low Blood Sugar’ मुळे होतात अनेक त्रास)

प्रदीप यांचं शिक्षण सीबीएससी स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी बीकॉम केलं. लहान वयातच त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.आपल्या यशाचं श्रेय प्रदीप आपल्या पालकांना देतात. ते सांगतात, लहानपणी UPSC परीक्षा म्हणजे काय? आणि आयएएस अधिकारी काय असतो? त्याची कल्पनाही नसताना वडील त्यांच्या प्रेरणादायी कहाण्या सांगून माझ्या मनामध्ये ऑफिसर होण्याची इच्छा निर्माण करत होते.

(IIT ते UPSC सोपा नव्हता प्रवास; गाव खेड्यातल्या खुशबू गुप्तांनी कसं मिळवलं यश?)

लहानपणी पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठं झाल्यानंतर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. UPSC परीक्षेचा अभ्यास त्यांनी दिल्लीमध्ये (Delhi) राहून केला. त्यांच्या कोचिंग क्लास आणि शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी आपलं घर विकून भाड्याच्या घरात राहण्यास सुरुवात केली त्यांनी वडिलांच्या कष्टांचं चीज करत 2018साली पहिल्या प्रयत्नात यश मिळवलं.

First published:

Tags: Ias officer, Inspiration, Success story, Upsc exam