मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कधी हे ऐकलं होतं का? लिव्हर, किडनी, डोळ्यांसारख्या प्रत्येक अवयवासाठी असतो वेगवेगळा आहार

कधी हे ऐकलं होतं का? लिव्हर, किडनी, डोळ्यांसारख्या प्रत्येक अवयवासाठी असतो वेगवेगळा आहार

फॅटी फिश, ड्रायफ्रूट आणि रताळे खाल्ल्याने केस मजबूत होतात.

फॅटी फिश, ड्रायफ्रूट आणि रताळे खाल्ल्याने केस मजबूत होतात.

जसं शरीरातल्या प्रत्येक अवयवाचं काम वेगवेगळं असतं. तसंच त्याच्या पोषणासाठी खायला पाहिजे असा पदार्थही वेगळा असतो.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : आपलं आरोग्य उत्तम (Health) राहण्यासाठी आहार (Diet) चांगला असावा लागतो. म्हणूनच आपण वेगवेगळ्या पदार्थांचा  आहारामध्ये (Different Type of Food For Diet)  समावेश करतो. फळं, भाज्या, डाळी, तांदूळ, पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स, ज्युस यासारख्या पदार्थांमुळे आपल्या शरीराला वेगवेगळे मिनरल्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स मिळतात. आपण जो आहार घेतो तो संपूर्ण शरीरावर (Effect on Body) परिणाम करत असतो. मात्र प्रत्येक अवयवासाठी एक ठराविक आहार असतो. असं देखील तज्ज्ञांचं मत आहे.

प्रत्येक अवयवासाठी ठराविक पदार्थ

शरीरातल्या प्रत्येक अवयवाचं काम वेगवेगळे आहे त्यामुळे त्यासाठी आवश्यक असणारे पोषक (Nutrition) घटक देखील वेगवेगळे असतात. म्हणूनच प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळ्या पदार्थाची गरज असते.

(हा गाडीवाला रोज तयार करतो ‘खुनी ज्यूस’! 'भयंकर हेल्दी' ज्यूसचा VIDEO होतोय VIRAL)

डोळ्यांसाठी गाजर

डोळ्यांसाठी गाजर फायदेशीर मानलं जातं. यामध्ये बिटा केरोटीन, व्हिटॅमिन ए आणि अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट (Antioxidant) असतात. ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं, इन्फेक्शन किंवा कोणतेही आजार दूर राहतात. याशिवाय केळं,पालक,लाल रंगाची शिमला मिरची देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली आहे.

(‘ही’ आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्टही देतात हाच सल्ला)

तल्लख मेंदूसाठी अक्रोड

आपला मेंदू आपलं शरीर कंट्रोल करत असतो. त्यामुळे मेंदू तल्लख असणं महत्त्वाचं असतं. मेंदूच्या आरोग्यासाठी आक्रोड,साल्मन फिश खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड व्हिटॅमिन, अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट असतात. याशिवाय आवळा, हळद, ब्रोकोली आणि भोपळ्याच्या बिया देखील खायला हव्यात.

हृदयासाठी टोमॅटो

हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी पोटॅशियमची आवश्यकता असते. टोमॅटोमध्ये पोटॅशियम भरपूर मात्रेमध्ये असतं. टोमॅटोमधील लायकोपीन शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणतात. याव्यतिरिक्त आवळा, हिरव्या भाज्या, डार्क चॉकलेट, अवकाडो देखील खाऊ शकता.

(कितीही रडलं,चिडलं तरी जेवण भरवा!बाळासाठी पोषण महत्त्वाचं; हे आहेत Healthy पर्याय)

फुफ्फुसांसाठी हळद आणि शिमला मिरची

फुप्फुसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हळद आणि शिमला मिरची खाणं उत्तम मानलं जातं. हळदीमध्ये इन्फॉमेशन कमी करणारे घटक असतात. शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असतं. यामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. आवळा, सफरचंद, बीट, भोपळा, टोमॅटो खाण्याने फायदा होतो.

हाडांसाठी डेअरी प्रोडक्ट आणि सलम फि

हाडांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी असतं. याशिवाय सालमन फिशमध्ये देखील व्हिटॅमिन डी असतं. ब्रोकोली, सोयामिल्क, डाळ, अंजीर, मनुका यामुळे हाडं मजबूत राहतात.

(तुम्हालाही वाटतो भाजी चिरणं हा Task? ही पद्धत वापरून वाचवा वेळ, वाढेल पोषण)

पोटा करता दही आणि पपई

पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पचन व्यवस्था चांगली असावी लागते. यासाठी दही, पपई खावी. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आहेत. पपई खाल्ल्यामुळे बद्धकोष्टता दूर होते. पोट फुगणं यासारखे त्रास कमी होतात. याव्यतिरिक्त सफरचंद, सब्जा आणि फायबर असणारे पदार्थ घ्यावेत.

यकृताच्या आरोग्यासाठी पपई आणि लिंबू

लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पपई,लिंबू जरूर खावं. पपई लिव्हर डिटॉक्स करते तर, लिंबू लिव्हर सेल्स सक्रीय करता. याशिवाय आवळा, लसूण, ग्रीन टी आणि हळद देखील खायला हवी.

किडनीसाठी लसूण आणि शिमला मिरची

रक्त स्वच्छ करून त्यातील टाकाऊ पदार्थ बाहेर फेकण्याचे काम किडनी करत असते. किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी लसूण आणि शिमला मिरची खाऊ शकता. लसणामध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस असतं तर, शिमला मिरची मध्ये व्हिटॅमिन आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट आहेत. याशिवाय आवळा,पालक, अननस, कोबी देखील खाणं कीडनीसाठी फायदेशीर आहे.

(चहा अतिप्रमाणात उकळू नका; या 7 पद्धतीने तयार करा Healthy Tea)

केसांसाठी अंड पालक

फॅटी फिश, ड्रायफ्रूट आणि रताळे खाल्ल्याने केस मजबूत होतात.

चांगल्या त्वचेसाठी

सूर्यफुलाच्या बिया, आक्रोड, टोमॅटो, लिंबू आणि ग्रीन टी घेतल्याने त्वचा चांगली होते.

मजबूत दातांसाठी

दूध,दही, ड्रायफ्रूट्स, सफरचंद, हिरव्या पालेभाज्या खाव्यात.

स्नायूंच्या मजबुतीसाठी

अंड, चिकन ब्रेस्ट, दूध, क्विनोआ, टोफू, चणे असणे हे पदार्थ खाणं फायदेशीर आहे.

First published:

Tags: Fitness, Food, Health Tips, Lifestyle