नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: इंटरनेटवर बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video Khooni Juice) होत असतात. यामध्ये फूड व्हिडिओज म्हणजेच खाद्यपदार्थांच्या व्हिडिओंचाही समावेश असतो. विविध फूड ब्लॉगर्स (Food Bloggers) ठिकठिकाणच्या फूड जॉईंट्सवरील खास डिशेसचे व्हिडिओ बनवून ते यूट्यूबवर शेअर (Food videos on Youtube) करत असतात. यामुळे कित्येक लहान ठिकाणं, तेथील स्थानिक पदार्थ आणि ते पदार्थ बनवणारेही जगभरात प्रसिद्ध होतात. हरियाणात असणाऱ्या फरिदाबादमधील एक ‘खूनी ज्यूस’ही (Haryana Khooni Juice) असाच सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. याला यूट्यूबवर जवळपास दोन कोटी व्ह्यूव्ज (Khooni Juice viral video) मिळाले आहेत. याचं नाव खूनी असलं, तरी हा ज्युस मात्र अगदी हेल्दी असल्याचं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजतंय.
फरिदाबादमधील भगतसिंह चौकात (Faridabad Khooni Juice) रस्त्याच्या कडेला हे ज्युस सेंटर आहे. या ठिकाणी नदीम (Nadim Khooni Juice) हा खूनी ज्युस बनवतात. पालक, कोथिंबीर, कारलं, कच्ची हळद, संत्र, गाजर, बीट, आवळा यापासून हा ज्युस तयार होतो. हा ज्युस तयार झाल्यानंतर त्यामध्ये काळं मीठ आणि लिंबू पिळून तो सर्व्ह करतो. आर यू हंग्री (Are you Hungry) नावाच्या फूड व्हॉगिंग चॅनलने यूट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. याला 1 कोटी, 89 लाख, 28 हजार 248 व्ह्यूव्ज (Khooni Juice video views) मिळाले आहेत.
यामधील बीट आणि इतर घटकांमुळे या ज्युसला रक्तासारखा लाल रंग आला आहे. या लालभडक रंगामुळेच या ज्युसला खूनी ज्युस (Khooni Juice) नाव मिळालं आहे.
‘ही’ आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्टही देतात हाच सल्ला
या ज्युसचा मोठा ग्लास 50 रुपयांना, तर लहान ग्लास 20 रुपयांना उपलब्ध आहे. खूनी ज्युसचा हा व्हिडिओ (Khooni Juice video) भरपूर लोकांना आवडतो आहे. नदीमची (Nadim Khooni Juice Video) ज्युस बनवण्याची पद्धत आणि त्यातील सामग्रीही लोकांना आकर्षित करत आहे. पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांचा हा हेल्दी कॉम्बो अगदीच विशेष असल्याचे नेटीझन्सचे (Healthy Khooni Juice) म्हणणे आहे. आपल्या आय़ुष्यात आपण एवढा पौष्टिक ज्युस पाहिला नसल्याचेही लोक कमेंट्समध्ये म्हणत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Video viral