मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्हालाही वाटतो भाजी चिरणं हा Task? ही पद्धत वापरून वाचवा वेळ, वाढेल पोषण

तुम्हालाही वाटतो भाजी चिरणं हा Task? ही पद्धत वापरून वाचवा वेळ, वाढेल पोषण

हल्ली मुलांना स्वयंपाक करायची आवड लागली आहे. मुलांना जेवण बनवायचं असेल एखादी डिश करायची असेल तर, त्यांना त्यात मदत करा किंवा त्यांची मदत घ्या.

हल्ली मुलांना स्वयंपाक करायची आवड लागली आहे. मुलांना जेवण बनवायचं असेल एखादी डिश करायची असेल तर, त्यांना त्यात मदत करा किंवा त्यांची मदत घ्या.

जेवणासाठी भाज्या कापणं फार झंझटचं काम वाटत असेल तर,हे किचन हॅक्स (Kitchen Hacks)वापरा.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,10 ऑगस्ट : उत्तम आरोग्यासाठी (Health) जेवढं उत्तम पद्धतीने तयार केलेला आहार आवश्यक असतो. तितकाचं त्यासाठी भाज्या चिरणं म्हणजे कटिंगही (Vegetable Cutting) महत्त्वाच आहे. बरेच लोक भाजी चिरताना काही चुका (Mistake) करतात की त्यामुळे भाज्यांची खरी पोषणमुल्य (Nutritional Value of Vegetables) कचऱ्याच्या डब्यामध्ये जातं. अनेक लोक भाज्यांची साल काढून भाजी कापतात काही भाज्यांच्या सालीत जास्त न्युट्रिशन्स असतात.

हल्ली बाजारात वेळेची बचत (Time saving) करण्याचा दावा करणारे भाज्या चिरण्यासाठी अनेक टुल्स आले आहेत. खरं तर, भाज्या करण्यासाठी जेवढा वेळ लागतो,त्यापेक्षा जास्त वेळ त्या कापण्यासाठी लागतो. त्यामुळे स्वयंपाकात सर्वात मोठी चॅलेन्जिंग (Challenging) गोष्ट असेल तर ती म्हणजे भाजीपाला चिरणे. आपण अशाच काही किचन हॅक्सची (Kitchen Hacks) माहिती घेऊयात. ज्यामुळे चॉपिंग स्किल (Chopping Skill) सुधारेल आणि भाज्या कमी वेळेत सहज चिरू शकाल.

(आज आहे वर्षातली पहिली मंगळागौर; काय आहे या व्रताचं महत्त्व आणि पूजा विधी)

या प्रकारे चिरा कोबी

कोबी कापण्यासाठी वेळ लागू नये असं वाटत असेल तर, त्यासाठी ही पद्धत वापरा. आधी कोबी मध्यभागी कापून घ्या. त्यानंतर त्यातील देठ कापा आणि पानं बाजुला करा. आता ही पानं एकत्र करा आणि थोडीथोडी एकत्र करून बारीक चिरा. त्यामुळे कोबी लवकर चिरला जाईल आणि वेळही वाचेल. कोबी बारीक चिरून धुतला तर, त्यातील पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात. त्यामुळे कोबीची पानं कापण्याआधी स्वच्छ धुवा.

(फक्त या 7 सवयी लावा; स्मरणशक्ती वाढेल, मेंदू होईल तल्लख)

असे कापा कांदे

कांदा कापताना त्याचं पुढचं आणि मागचं देढ कापून घ्या. साली काढून चॉपिंग बोर्डवर ठेवा. त्यानंतर मधल्या तीन बोटांच्या मदतीने धरून सुरीने बारीक करा. त्यामुळे वेळही वाचेल. कांदा कापताना डोळ्यांमधून पाणी येत राहीलं तर, कापायला वेळ लागतो. त्यासाठी कांदा मधे कापल्यानंतर पाण्याने धुवून घ्या किंवा थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा.

(खराब झालेल फर्निचर चमकवा अवघ्या काही मिनिटांत; वापरा ‘या’ सोप्या Tips)

फरसबी कापण्याची पद्धत

फरसबी सारख्या शेंगा कापण्यासाठी 8 ते 10 शेंगा एकत्र घ्या आणि कटिंग बोर्डवर पकडून सुरीने बारीक करा. याच पद्धतीने भेंडींही चिरता येतील.

(झाडासाठी खत आणि सजावटीसाठीही उपयोगी कॉफी बिया; घरात पडून असल्यास अशा वापरा)

पालेभाज्या

पालेभाज्या चिरण्यासाठी त्या आधी निवडाव्या लागतात. त्यासाठी मेथी किंवा कोथिंबिर सारखी भाजी निवडताना हातामध्ये देठ धरून पानं देठासकट बाजूला करावीत. पालेभाज्या चिरण्यासाठी आधी धुवून घ्याव्यात. त्यातली माती निघून जाईल अशा प्रकारे धुवाव्यात. पालेभाज्या ओल्या झाल्या की त्या चिरताना त्रास होतो. अशा वेळी कात्रीने कट कराव्यात, वेळही वाचेल.

First published:

Tags: Easy hack, Lifestyle, Tips