Home /News /lifestyle /

या सुकामेव्यात आहे कॅन्सरला दूर ठेवण्याचे गुण; आहेत अगणित फायदे

या सुकामेव्यात आहे कॅन्सरला दूर ठेवण्याचे गुण; आहेत अगणित फायदे

नियमितपणे थोडेतरी आक्रोड खावेत.

नियमितपणे थोडेतरी आक्रोड खावेत.

अक्रोडमुळे (Walnut) पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या कमतरतेसारख्या (Lack of Sperm) समस्या दूर होण्यास मदत होते. रोज अक्रोड खाल्ले तर, डायबेटीज (Diabetes) नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

    नवी दिल्ली,24 जून : आजच्या धावपळीच्या काळात, घर, नोकरी आणि कुटूंबाच्या जाबाबदाऱ्या सांभाळून आहाराची काळजी घेणं कठीण जातं. त्यातच कामामधून वेळ काढूव व्यायाम करणं किंवा वॉकला जाणं सगळ्यांनाच शक्य होत नाही. त्यामुळे किमान आपल्या आहारात हेल्दी फूडचा (Healthy Food) समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. निरोगी राहण्याचा पहिला नियम म्हणजे आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं. यासाठी फळं आणि भाज्या व्यतिरिक्त ड्राय फ्रुट (Dry Fruit) ही आहारात असावेत.काजू, बदाम पिस्ता,मनुका यांच्याबरोबर आक्रोड खाण्यानेही फायदा होतो. आक्रोड (Walnut) हाडांसाठी चांगले असतात. त्यामुळे वायानुसार हाडं कमजोर (Bone Density) होण्याचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर,  अक्रोड खावेत. अक्रोड चवीला चांगले असतात आणि अनेक व्हिटॅमीनचा खजिना आहेत. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई,लोह,मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि झिंक सारखे घटक असतात. (बाळंतपणानंतर वाढलेलं वजन कमी करा; ही 5 योगासनं आहेत फायदेशीर) अक्रोड खाल्याने झोप चांगली लागते. शिवाय रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळेच नियमितपणे थोडेतरी आक्रोड खावेत. अक्रोड कच्चे खाल्ले तरी फायदा होतो. पण, बदल म्हणून काही वेगळ्या प्रकारे आक्रोड खाता येतात. अक्रोड सॅलडअक्रोड खाण्याचा हा एक सोपा आणि उत्तम मार्ग आहे. आपल्याला थोडी भूक लागली असेल. तेव्हा आपण अक्रोड सॅलड बनवू शकता. अक्रोड सॅलडसाठी चीज, बीट,चणे आणि आपल्या आवडीच्या इतर भाज्या देखील घालू शकता. (OMG! जीभ आहे की काय; तरुणाच्या Long Tongue चा रेकॉर्ड) चटणी किंवा जॅम अक्रोडची चटणी,जॅम,स्प्रेडर किंवा डिपही बनवता येतं. त्यामुळे इतर अनेक डिशसह अक्रोड सर्व्ह करू शकता. एखादी चटणी बनवताना त्यात अक्रोड घालावेत. अक्रोड,लसूण,आलं,लिंबाचा रस,तेल,मीठ आणि मिरपूड एकत्र करून अक्रोडची चटणी घरी बनवू शकता. स्टफिंगमध्ये घाला नुसते आक्रोड खाता येत नसतील तर, त्याचं स्टफिंग बनवू शकता. त्यासाठी आक्रोडचे बारीक तुकडे किंवा पूड बनवा. पराठे,सँडविचमध्ये स्टफिंग म्हणून वापरा. त्यामुळे चविष्ठ आणि हेल्दी आहार मिळेल. (रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाळू मुलाची अवकाश झेप! वायुदलात Flying Officer) स्मूदी बनवा अक्रोड वाटून त्याची स्मूदी बनवता येते. दूध किंवा दह्यात अक्रोड टाका, चवीसाठी मधही घालता येतं किंवा आवडीचं कोणतेही फळ घालून टेस्टी स्मूदी तयार करा. ओटमीलमध्ये बरेच लोक नाश्ता म्हणून ओटमील घेतात. ओट्सचं पीठ बनवताना त्यात अक्रोड देखील घालू शकता. अक्रोडमुळे ओट्सची चव वाढेल. यात जायफळ,दालचिनी, ब्राऊन शुगर घालता येते. (लग्नात येत आहे अडचणी?;‘या’ वास्तू उपायाने होईल दोष दूर) अक्रोडचे फायदे अक्रोड मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात. अक्रोडमुळे स्मरणशक्ती वाढते.  अक्रोड हृदयासाठी देखील लाभदायक आहे. यामुळे आपले हृदय निरोगी राहते व आपल्या हृदया संबंधी आजार बरे करायला मदत मिळते. शरीरातील कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या हृदयाला खूप फायदा होतो. अक्रोडमुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या कमतरतेसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. रोज अक्रोड खाल्ले तर, डायबेटीज नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. ऍन्टीऑक्सिडंन्ट असल्याने अक्रोडला ऍन्टी कॅन्सर फूड मानलं जातं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Superfood

    पुढील बातम्या