दिल्ली, 24 जून: बाळंतपणानंतर महिलांचं वजन वाढतं. कधीकधी डिलीव्हरीनंतर घेतलेल्या हेल्दी आहारामुळेही वजन वाढत. सी सेक्शन डिलिव्हरी (C Section Delivery) म्हणजेच सिझेरियन नंतरही महिलांचं वजन जास्त वाढायला (Weight Gain) लागतं. या वजनावर वेळीच नियंत्रण (Control) मिळवलं नाही तर, कायमचा लठ्ठपणा येतो. बॉडी फॅट (Body Fat) एकदा वाढल्यानंतर कमी करणं अतिशय कठीण असतं. योग्य आहार आणि योगासनं केल्याने वजन कमी करता येतं. वजन कमी करण्यासाठी योगासनांचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो. जाणून घ्याव्यात अशी 5 योगासन ज्यांच्यामुळे वजन कमी होऊ शकतं.
भुजंगासन
भुजंगासनालाच सर्पासन किंवा कोब्रा आसन किंवा सर्प मुद्रा ही म्हटलं जातं. या मुद्रेमध्ये शरीर सापाच्या आकृती सारखं बनतं. हे असन करणं अतिशय सोपं असतं. त्यासाठी योगा मॅटवर पोटावर झोपा. हात सरळ पुढे घ्या. आता हात जमिनीवर टेकवून पोटापर्यंतचा भाग पाठीमागे उचलण्याचा प्रयत्न करा. थोड्यावेळाने पूर्व स्थितीत या. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री माधुरी दीक्षितने योग दिनानिमित्त या आसनाचा व्हीडिओ शेअर केला होता.
(ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं योगासनांचं महत्त्व; दररोज करा ही 5 आसनं)
नौकासन
या आसन स्थितीत शरीराचा आकार एखाद्या नावे प्रमाणे तयार होतो म्हणून त्याला नौकासन म्हटलं जातं. योगा मॅटवर पाठीवर झोपा. आता हात वर घ्या. पाय आणि संपूर्ण शरीर वर उचण्याचा प्रयत्न करा. यात शरीराचा भार कमरेवर येतो. त्यामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येतो. हे आसन केल्यामुळे पोटाचे स्नायू मजबूत बनतात.
उष्ट्रासन
आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी उष्ट्रासन अतिशय फायदेशीर आहे. उष्ट्रासनामध्ये शरीराचा आकार उंटाप्रमाणे होतो. त्यामुळे त्याला उष्ट्रासन म्हटलं जातं. गुघघ्यांवर बसा. शरीर ताठ करा. आता हातांच्या आधाराने मागे जाण्याचा प्रयत्न करा. हाताने पायाच्या टाचा पकडा.
(मादीने घातलेली अंडी काही न खाता हा 50 दिवस ठेवतो तोंडात; किंमत तर ऐका माशाची)
मत्स्यासन
यात शरीराचा आकार माशाप्रमाणे होतो. म्हणून त्याला मत्स्यासन म्हणतात. मत्स्यासनामुळे छातीचे स्नायू मजबूत बनतात. दोन्ही गुडघे जास्तीत जास्त दुमडून तळवे वर घ्यावेत. कोपराच्या आधाराने पाठ-खांदे उचलून टाळू टेकावी. मान उलटी ताठ करावी. हातांनी पायांचे अंगठे धरावेत. मांड्या जमिनीवर टेकल्या पाहिजेत. त्यामुळे पोटावर ताण पडेल.
मार्जरासन
मार्जरासन म्हणजेच कॅट पोझ. यामध्ये शरीराचा आकार एखाद्या मांजरी प्रमाणे केला जातो. यामुळे पाठीचे स्नायू मजबूत आणि लवचिक होतात. योगामॅटवर गुडघ्यांवर बसा. आता हातांच्या आधाराने पुढे जा. श्वास घेत मान वर करा. श्वास सोडत मान खाली आणा. यावेळी आपलं पोट आत घेत पाठ वर करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pregnancy, Pregnent women, Women, Yoga