मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /OMG! जीभ आहे की काय; तरुणाच्या Long Tongue चा रेकॉर्ड

OMG! जीभ आहे की काय; तरुणाच्या Long Tongue चा रेकॉर्ड

आपल्या लांब जिभेचा (Longest Tongue) वापर करून हा तरुण वेगवेगळी कौशल्य दाखवतो.

आपल्या लांब जिभेचा (Longest Tongue) वापर करून हा तरुण वेगवेगळी कौशल्य दाखवतो.

आपल्या लांब जिभेचा (Longest Tongue) वापर करून हा तरुण वेगवेगळी कौशल्य दाखवतो.

    चेन्नई, 24 जून: आपल्यापैकी बहुतेकांनी आपल्या नाकावर स्वतःची जीभ (Tongue)  टेकवण्याचा प्रयत्न केला असेल. पण नाकाला टेकवणं दूर आपल्यापैकी कित्येकांची तरी जीभ नाकाच्या जवळही पोहोचत नाही. अशात एका तरुणाची जीभ मात्र (Long Tongue) टाळूच्या मागील भागापर्यंत 10.8 सेंटीमीटर लांब (Longest Tongue) आहे. तो कितीतरी वेळा आपली जीभ नाकाला टेकवू शकतो. इतकंच नव्हे तर जिभेने तो चित्र काढतो आणि लिहितोसुद्धा.

    तामिळनाडूतील (Tamilnadu) विरुथुनगर जिल्ह्यातील थिरुथंगल येथील रहिवासी के. प्रवीण (K. Pravin) याची जीभ भारतात सर्वात लांब आहे . प्रवीण हा बी.ई. रोबोटिक्स (B.E. Robotics) शाखेचा विद्यार्थी आहे.  प्रवीणने जिभेसाठी इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Indian Book Of Records) स्थान पटकावलं आहे. विशेष म्हणजे गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) स्थान मिळावं यासाठी प्रविण स्वतःला प्रशिक्षण देत आहे.

    सर्वसामान्यपणे पुरुषांच्या जिभेची लांबी सरासरी 8.5 सेंटिमीटर असते तर महिलांच्या जिभेची लांबी 7.9 सेंटिमीटर असते. सध्या जगातील 10.1 सेंटिमीटर अशी सर्वात मोठी जीभ असलेल्या व्यक्तीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. प्रवीणची जीभ 10.8 सेंटिमीटर लांब असून आपल्या जिभेचा वापर करून वेगवेगळी कौशल्य दाखवतो. जिभेच्या सहाय्याने तो सुंदर चित्रे रेखाटतो, तामिळ अक्षरं लिहितो, नाकाला अनेकवेळा जिभेने स्पर्श करतो.

    हे वाचा - लग्नाआधी हसतहसत नवरा-नवरीने केलं एकमेकांचं मुंडण; कारण ऐकून आवणार नाही अश्रू

    प्रवीण आपल्या जिभेच्या सहाय्याने पेटिंग (Painting) करण्याची अनोखी पद्धतही जाणतो. तो आपल्या जिभेचा अर्धा भाग झाकण्यासाठी हातमोज्याचा छोटा तुकडा वापरतो आणि नंतर चार्ट पेपरवर तामिळ अक्षरं लिहितो. त्याने दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासह अनेक प्रसिध्द व्यक्तींची चित्रं रेखाटली आहेत.

    इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या म्हणण्यानुसार प्रवीण जीभ ही देशातील सर्वात मोठी म्हणजेच 10.8 सेंटिमीटर आहे. ती एका मिनिटात सरासरी 110 वेळा नाकाला स्पर्श करते. एका मिनिटात त्याच्या कोपराला सरासरी 142 वेळा स्पर्श करते. तसंच तामिळ भाषेत 1 तास 22 मिनिटं आणि 26 सेकंदात सर्व 247 अक्षरे तो जीभेच्या सहाय्याने लिहू शकतो. प्रवीणने एक मिनिटात 219 वेळा जिभेने नाकाला स्पर्श करून स्वत:चा विक्रम मोडत ग्रँड मास्टर ऑफ द आशिया बुक ऑफ रेकॉर्डस हा पुरस्कार मिळवला आहे.

    हे वाचा - झोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स

    प्रवीण सांगतो, जरी माझ्या कर्तृत्वाची नोंद भारतात झालेली असली तरी मला माझं कौशल्य जगासमोर न्यायचं आहे. तामिळ भाषेची आवड असल्याने येत्या काही दिवसांत सर्व 1330 तिरुव्कुरल जिभेने लिहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचं माझे लक्ष्य आहे. जिभेच्या सहाय्याने डोळ्यांना स्पर्श करता यावा यासाठी मी कठोर मेहनत करत आहे. यामुळे माझे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले जाईल आणि तामिळनाडूचा सन्मान वाढेल. तामिळनाडू सरकारने (Tamilnadu Government) मला मदतीचा हात दिला तरच हे शक्य आहे. कारण माझी अर्थिक स्थिती कमकुवत असल्याने मी माझे कौशल्य जगाला दाखवू शकत नाही.

    First published:

    Tags: Lifestyle, Record, Tamilnadu