• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाळू मुलाची अवकाश झेप! वायुदलात Flying Officer

रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाळू मुलाची अवकाश झेप! वायुदलात Flying Officer

प्लाईंग ऑफिसर बनणं हेच त्यांचं स्वप्न होतं.

प्लाईंग ऑफिसर बनणं हेच त्यांचं स्वप्न होतं.

गोपीनाथ सांगतात त्यांची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. वडील 25 वर्षांपासून रिक्षा (Rickshaw Driver) चालवायचे. तरी त्यांनी एअरफोर्समध्ये जायचं स्वप्न पाहिलं आणि पूर्ण केलं.

 • Share this:
  विशाखापट्टणम 23,जून : स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी मनात ध्यास असावा लागतो. लहानपणीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झपाटल्यासारखी मेहनत केली तर, कोणतंही ध्येय्य अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे विजागमध्ये राहणाऱ्या जी गोपीनाथ ने. आपल्या आजोबांप्रामणे देशाची सेवा करण्याचं स्वप्न त्याने फार लहानपणीच पाहिलं होतं. मात्र त्याने इंजिनियर व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण, घरची परिस्थिती बिकट होती. वडिल रिक्षा चालवायचे. आंध्रे प्रदेशच्या विझाग जिह्यात (Vizag district of Andhra Pradesh) राहणारा जी.गोपीनाथ आज भारतीय वायुसेनेत उच्चपदावर दाखल झालाय. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 तेलुगू राज्यांमधून भारतीय वायुसेने (Indian Air Force) मध्ये गोपीनाथ फ्लाईंग ऑफिसर (Flying Officer) आहेत.त्यांनी त्यांच्या आईवडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या सेरेनमीमध्ये त्यांना फ्लाईंग ऑफिसरची पदवी बहाल करण्यात आली. (चहा विकणाऱ्या वडिलांचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात झाला IAS; देशल दान यांची प्रेरणा) गोपीनाथ सांगतात त्यांची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. वडील 25 वर्षांपासून रिक्षा (Rickshaw Driver) चालवायचे. अभ्यासा हुशार असूनही वडिलांवर आर्थिक भार पडायला नको म्हणून वडिलांनी बॅंकेचं कर्ज घेऊन शिकवण्याची तयारी दाखवूनही  त्यांनी इंजिनियरींगला ऍडमिशन न घेता आंध्र विद्यापिठातून ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय घेतला. ‘माझ्या शिक्षणासाठी आईवडिलांनी सगळ्या अडचणींचा सामना केला त्यामुळे मी शिकलो’ हे सांगायला गोपीनाथ विसरत नाहीत. (नाक मुरडणं बंद करून खा वांगं; आजार जातील पळून) दहावीत असल्यापासून अभ्यासासाठी गोपीनाथ यांनी परिश्रम घेतले. कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेत यश मिळाल्यानंतर त्यांना IAFमध्ये प्रवेश मिळला. आजोबांप्रमाणे देश सेवा करण्यासठी प्लाईंग ऑफिसर बनणं हेच त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा पदवी प्रदान कार्यक्रम पाहिल्यावर अनेक जण शुभेच्छ देत आहेत. तर, त्यांची बहिण गौरीलाही भावाला फ्लाइंग ऑफिसर बनतान पाहुन आनंद झालाय. आज त्यांच्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज झालंय.
  Published by:News18 Desk
  First published: